ADVERTISEMENT
home / लग्न फॅशन
jacket fashion

वेडिंग ड्रेसेससह तुम्ही वापरा असे जॅकेट्स, दिसा अधिक स्टायलिश

लवकरच थंडीही सुरू होणार आहे आणि लग्नाचा सीझनही. आपण थंडीमध्ये अनेकदा जॅकेट्सची फॅशन करतो. पण जॅकेट प्रत्येक ड्रेससह तुम्ही स्टाईल करू शकता. वास्तविक महिलांना जीन्स अथाव टॉपसह जॅकेट घालणं अधिक आवडतं. पण तुम्हाला माहीत आहे का? पारंपरिक साडी अथवा अन्य पारंपरिक लेहंगा अथवा ड्रेससह अर्थात वेडिंग ड्रेससहदेखील तुम्ही जॅकेट्सची स्टाईल करू शकता. तुम्हाला कोणत्याही घरच्या कार्यक्रमात अथवा पार्टीसाठी पारंपरिक साडी, गाऊन, प्लाझो सूट इत्यादी घालायचे असेल तर तुम्ही यासाह वेगवेगळ्या जॅकेट्सची स्टाईल करू शकता. या स्टाईल्सबाबत अधिक माहिती तुम्हाला या लेखातून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तुम्हीही तुमच्या वेगळ्या कार्यक्रमासाठी जॅकेट्सची स्टाईल नक्की करा.

बॉम्बर जॅकेट

तुम्हाला पंजाबी ड्रेसेस अथवा सूट्स घालणे आवडत असेल तर तुम्ही बॉम्बर जॅकेट (Bomber Jacket) प्लाझो सूट्सह नक्कीच कॅरी करू शकता. वास्तविक अनेक महिला बॉम्बर्स जॅकेट टी-शर्ट, जीन्ससह घालतात. पण तुम्ही प्लाझो सूटसह याची स्टाईल नक्कीच करू शकता. यामुळे तुम्हाला केवळ डॅपर लुक मिळेल असं नाही तर थंडीच्या दिवसात तुम्हाला ऊब देण्यासाठीही याचा चांगला उपयोग होतो. तसंच तुम्ही अधिक स्टायलिश दिसता. बाजारामध्ये तुम्हाला बॉम्बर जॅकेटच्या अनेक व्हरायटी मिळतील जसे सिंथेटिक, लेदर, पॉलीकॉटन इत्यादी. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार या जॅकेटची निवड करून कपड्यांनुसार त्याची स्टाईल करायची आहे. 

डेनिम जॅकेट 

Instagram

डेनिम जॅकेट (Denim Jacket) हे आपण नेहमीच घालत असतो. पण केवळ जीन्सवर डेनिम जॅकेटच चांगले दिसते असे नाही. तर तुम्ही ट्रेडिशनल ड्रेसवरही हे डेनिम जॅकेट नक्कीच घालू शकता. तुम्हाला बाजारात अनेक वेगवेगळ्या रंगाची डेनिम जॅकेट्स दिसतात. तुम्ही कोणते कपडे घालत आहात त्याप्रमाणे मॅच करून याची स्टाईल तुम्ही करू शकता. विशेषतः पिवळ्या रंगाच्या लेहंग्यावर अथवा फिकट रंगाच्या कोणत्याही लेहंग्यावर डेनिम जॅकेट सुंदर दिसते आणि तुम्ही अधिक स्टायलिश दिसता. 

शॉर्ट जॅकेट 

तुमच्याजवळ शॉर्ट जॅकेट (Short Jacket) असेल तर तुम्ही लग्नात अथवा कोणत्याही कार्यक्रमाला फ्लोरल लेहंगा अथवा एखाद्या कुरतीवर नक्कीच मॅच करू शकता. कारण लेहंगा असे आऊटफिट आहे जे तुम्ही लग्नासाठी असो वा अथवा पार्टीसाठी कुठेही वापरू शकता. बऱ्याच महिला या अगदी साध्या लेहंग्यासह मल्टीकलर ब्लाऊज घालण्याला प्राधान्य देतात. पण तुम्ही हे जॅकेटसहदेखील स्टाईल करून अधिक स्टायलिश दिसू शकता. 

ADVERTISEMENT

लेदर जॅकेट

लेदर जॅकेट (Leather Jacket) मध्ये महिला अधिक सुंदर दिसतात आणि अधिक आकर्षक दिसतात. तसं तर लेदर जॅकेट हे टॉप आणि जीन्ससह घालणे अधिकतम महिलांना आवडते. पण तुम्हाला माहीत आहे?  तुम्ही ट्रेडिशनल ड्रेससहदेखील लेदरच्या जॅकेटचा वापर करू शकता. तसंच तुम्ही साडीवरदेखील हे जॅकेट स्टाईल करू शकता. सध्या साडीवर लेदर जॅकेट वापरायचा अधिक ट्रेंड आहे. कारण हे जॅकेट तुम्हाला केवळ स्टायलिश लुक देत नाही तर तुम्हाला थंडीपासूनही वाचवते.

या जॅकेट्सचा तुम्ही अगदी सहजपणे वेडिंग ड्रेसेससह वापर करून अजून आकर्षक दिसू शकता. यावेळी घरच्या कार्यक्रमामध्ये स्टायलिश दिसण्यासाठी नक्की वापरा हा पर्याय. 

11 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT