बॉलीवूडचा जग्गू दादा याच नावाने जॅकी श्रॉफ यांना ओळखलं जातं. ते बऱ्याचदा रिअॅलिटी शोमधून गेस्ट म्हणून प्रेक्षकांसमोर येतात. अशा वेळी सेटवर नुसती धमाल मस्ती असते. कारण जग्गू दादाची एन्ट्रीच सर्वांना सुखावून जाते. मग त्यांच्या आयुष्यातील चांगले वाईट किस्से ऐकण्यात प्रेक्षक अश्ररशः दंग होतात. कारण जॅकी श्रॉफ जसं पडद्यावर वावरतात अगदी तसेच ते खऱ्या खुऱ्या आयुष्यातही वागतात. सर्वांना भिडू या नावाने हाक मारतात, वयाच्या साठीनंतरही बिनधास्त डान्स करतात त्यामुळे त्यांच्याविषयी आजही चाहत्यांना अपार प्रेम आहे. नुकतेच जॅकी श्रॉफ टेलिव्हिजनवरील इंडिअन आयडॉल सीझन 12 मध्ये सहभागी झाले होते. मात्र या सेटवर त्यांचा मुलगा टायगर श्रॉफ त्यांना असं काही बोलला की सर्वांचं मनोरंजन करणारे जॅकी श्रॉफ अक्षरशः ढसाढसा रडू लागले.
असं काय म्हणाला टायगर
या रिअॅलिटी शोमध्ये काही स्पर्धकांचा परफॉर्मन्स झाल्यावर जॅकी श्रॉफ यांना एक व्हिडिओ दाखवण्यात आला. ज्या व्हिडिओमध्ये जॅकी श्रॉफ यांच्यासाठी त्याची पत्नी आयशा श्रॉफ आणि मुलगा टायगर श्रॉफ यांनी एक खास संदेश व्हिडिओमधून पाठवला होता. आयशा श्रॉफ यांनी यावेळी जॅकी आणि त्यांच्या खाजगी आयुष्यातील खास प्रसंग शेअर केले. मात्र त्यानंतर टायगर जे काही बोलला त्यामुळे जॅकी श्रॉफ खूपच भावूक झाले.
कशी झाली आयशा आणि जॅकी यांची पहिली भेट
या शोमध्ये दाखवण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये आयशा श्रॉफ यांनी शेअर केलं की, ” तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की मी जेव्हा तेरा वर्षांची होते त्व्हा माझी आणि जॅकीची पहिली भेट झाली होती. आम्ही पहिल्यांदा एका रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये भेटलो होतो. त्यावेळी आम्ही फक्त दोनच मिनिटे एकमेकांशी बोललो. त्यानंतर मी घरी आले आईला सांगितलं की, मी आज अशा व्यक्तीला भेटले ज्याच्याशी मला लग्न करायचं आहे. या भेटीनंतर तीन वर्षांनी मी त्याला पुन्हा पाहिलं आणि आमचं एकमेकांशी बोलणं सुरू झालं. त्यानंतर आम्ही एकमेकांसोबत बाहेर फिरायला जाऊ लागलो. जॅकीशी लग्न करणं हा माझ्या आयुष्यातील एक सुंदर निर्णय होता असं मला वाटतं. कारण मी खूप भाग्यवान आहे म्हणूनच मला असा भला माणूस आयुष्यात मिळाला. माझ्या मते तो या जगातील सर्वात योग्य पती आणि एक चांगला पिता आहे”
आयशा श्रॉफनंतर लगेचच टायगर श्रॉफचाही व्हिडिओ दाखवण्यात आला. ज्यामध्ये त्याने शेअर केलं की, ” सर्वात आधी या शोच्या सर्व स्पर्धकांना ऑल दी बेस्ट आणि परिक्षकांना माझा नमस्कार, मला माहीत आहे की माझ्या कुटुंबाबद्दल बरंच काही तुम्हाला माहीत आहे. मी माझ्या वडिलांना फक्त एवढंच सांगू इच्छितो की, आय लव्ह यू वेरी मच डॅड! माझ्या जीवनाचे एकच उद्दिष्ट आहे की मी प्रत्येक दिवशी तुम्हाला अभिमान वाटेल असं काहीतरी करू. मला असं वाटत आहे की मी आता जे काही करत आहे त्याचा तुम्हाला नक्कीच अभिमान वाटत आहे” टायगरचे हे बोल ऐकून जॅकी श्रॉफच्या डोळ्यांमधून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्यांना त्यांच्या भावना स्क्रिनसमोर आवरता आल्या नाहीत. जग्गू दादा भावूक झाल्यामुळे काही क्षण सारं काही स्तब्ध झालं. त्यानंतर जॅकी श्रॉफ यांनी इंडिअल आयडॉलचे आभआर व्यक्त केले.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
प्रियदर्शन जाधवने शेअर केलेल्या फोटोचे गूढ सुटले, लव – सुलभचे पोस्टर प्रदर्शित
‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेने अखेर घेतला निरोप