भाजी- आमटी अशा अनेक पदार्थांमध्ये आपण चिंच- गुळाचा वापर करतो. पण अनेकदा चिंच गुळाचा वापर करताना चिंच भिजत घालणे त्याचा कोळ काढणे…. गुळाचा ढेप काढून तो चिरुन घालणे यामध्ये बरेचदा खूप वेळ निघून जातो. जर तुम्हाला हा वेळ घालवायचा नसेल आणि चवही हवी असेल तर तुमच्यासाठी आम्ही झटपट अशी चिंच- गुळाची चटणी रेसिपी आणली आहे. खूप जण अशी चटणी घरात करुन ठेवत असतील. पण काहींना अजून ही ट्रिक माहीत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चिंच- गुळाची अशीच चटणी कशी करायची ते सांगणार आहोत. ही चटणी बरेच दिवस टिकते. शेवपुरी, भेळपुरी, पाणीपुरी करताना ही चटणी झटपट वापरता येते. चला मग करुया सुरुवात
बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरमध्ये काय आहे फरक
अशी करा चिंच-गुळाची चटणी
चिंच-गुळाची चटणी करण्यासाठी तुम्हाला फक्त दोनच साहित्याची गरज आहे ती म्हणजे चिंच आणि गुळ.. चला तर मग आता बघुया ही चटणी नेमकी कशी करायची
- चिंच- गुळाची चटणी करण्यासाठी तुम्हाला चिंचेच्या दुप्पट गुळ लागतो.
- चिंचामध्ये अनेकदा बिया असतात. त्यामुळे ती काढण्यासाठी चिंच पाण्यात भिजत घाला. चिंच चांगली भिजली की, ती त्यातून बिया निघणे फार सोपे होते.
- आता तुम्हाला दुप्पट गुळ घ्यायचा आहे. गुळाची पावडर असेल तर ठिक नाहीतर गुळ किसून घ्या.
- एका पॅनमध्ये चिंच- गुळ आणि अंदाजित पाणी घालून एकत्र करुन गॅसवर ठेवा.
- आता ही चटणी म्हणजे तुम्हाला चिंच- गुळ घोटवून घ्यायचे आहे. चटणी छान घोटत आली की, तिचा रंग आणि टेक्शचर ग्लॉसी दिसायला लागते.
- तुम्ही जर बाजारात मिळणारी चटणी कधी पाहिली असेल तर तुम्हाला त्याच्या टेक्श्चरचा अंदाज येईल.
- ही चटणी फ्रिजमध्ये जास्त काळासाठी टिकू शकते आणि त्याचा वापर तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांसाठी करु शकता.
टिप: चटणी करताना ती खूप घट्ट होणार नाही याची काळजी घ्या. कारण ही चटणी खूप घट्ट झाली की, ती पाकासारखी होते. ही चटणी वापरताना तुम्हाला सतत त्यामध्ये पाण्याचा वापर करावा लागतो किंवा तुम्हाला चटणीचा कमी वापर करावी लागेल.
अप्रतिम चवीच्या स्मूदी बनवा घरच्या घरी, स्मूदी रेसिपीज जाणून घ्या
खजूराचाही करु शकता वापर
ही चटणी करत असताना अर्धा कप चिंच, 1 कप खजूर, 1 कप गुळ याचाही वापर करु शकता. खजूरामुळेही चटणीचा स्वाद चांगला येतो. तुम्हाला या चटणीला अधिक चांगले करायचे असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडे जिरे किंवा ओवा घाला. तुमची चटणी अधिक चांगली लागेल.
या पदार्थांमध्ये करु शकता वापर
चिंच- गुळाची चटणी तुम्हाला अनेक पदार्थांसाठी वापरता येते. अळुवडी, भरलेले कारले, भरलेली वांगी, पाणीपुरी,शेवपुरी, रगडापुरी यासगळ्यामध्ये तुम्हाला चिंच- गुळ लागते. अशावेळी तुम्ही झटपट चटणी घालू शकता. या चटणीमुळे तुमच्या प्रत्येक पदार्थांची चव वाढते.
आता घरी नक्की करुन पाहा चिंच- गुळाची चटणी