मराठी सिनेमा हा नेहमीचा चांगल्या कथा आणि मांडणीसाठी ओळखला जातो. त्यामुळे बॉलीवूड असो वा हॉलीवूड असो अनेकांना मराठी सिनेमासृष्टीची भुरळ पडली आहे. यातच आता अजून एका अभिनेत्रीचं नाव दाखल झालं आहे. त्यामुळे टीव्ही, नाटक आणि बॉलीवूड सिनेमानंतर ती लवकरच मराठीत पदार्पण करतेय.
बॉलीवूडनंतर आता मराठीत
‘काबिल’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री नीलम पांचाल आता लवकरच मराठीत पदार्पण करतेय. नुकत्याच झालेल्या 66 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात आपला गुजराती चित्रपट ‘हिलारो’मधल्या अभिनयासाठी नीलमला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
मराठीचे धडे गिरवतेय नीलम
इश्कबाज, वीरा, रूक जाना नही, हमारी देवरानी या हिंदी मालिकेत काम केलेल्या नीलम पांचालने हृतिक रोशनच्या काबिल सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. सध्या हिंदी नाट्यसृष्टीत गाजणा-या ‘भारत भाग्यविधाता’ या हिंदी नाटकात ‘कस्तुरबा’ यांची भूमिका नीलम साकारत आहे. यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात रजत कमल पुरस्काराने सन्मानित झालेल्या नीलम पांचालने नुकताच आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ टाकला आहे. या व्हिडीओत ती मराठीचे धडे गिरवताना दिसत आहे. त्यामुळे तिच्या मराठी पदार्पणाविषयीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
मराठी सिनेमांची चाहती
अभिनेत्री नीलम पांचालला याविषयी विचारले असता ती म्हणाली, “हो.. मी सध्या माझ्या मराठीसृष्टीतल्या पदार्पणाची तयारी करत आहे. मी मुंबईत राहत असल्याने आणि मराठी सिनेमांची चाहती असल्याने मला मराठी समजते. पण मला बोलता येत नाही. पण आता मराठीत पदार्पण करत असल्याने मराठीचे धडे गिरवणं सध्या सुरू आहे.”
भूमिकेबाबत मात्र सस्पेन्स
आता हा मराठी सिनेमा आहे की, वेबसीरिज, नाटक आहे की मालिका याविषयी मात्र नीलमने काही सांगण्यास सध्या नकार दिला आहे. नीलम म्हणते, “सध्या प्रोजेक्टवर काम सुरू आहे. मराठीतल्या एका नामवंत दिग्दर्शकाच्या प्रोजेक्टमध्ये मी काम करत आहे आणि निर्मात्यांकडून अनाउन्समेन्ट न झाल्याने मी याविषयी जास्त रिव्हील करू शकत नाही.”
#POPxoLucky2020 मध्ये आम्ही देत आहोत प्रत्येक दिवशी एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.
हेही वाचा –
लवकरच सिनेरसिकांच्या भेटीला येतोय ‘तत्ताड’ सिनेमा
‘दाह’ सिनेमा ‘व्हॅलेंटाईन डे’ला होणार प्रदर्शित,सुहृद वार्डेकर-सायली मुख्य भूमिकेत
बापलेकीच्या दृढ नात्याची कहाणी, ‘वेगळी वाट’ सिनेमाची पहिली झलक