अनेक महिन्यांपासून ‘सिंघम’ फेम (Singham) अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Agrawal) आई होणार अशा वावड्या होत्या. पण आता खरंच काजल पहिल्यांदाच आई होणार आहे. अभिनेत्रीचा नवरा गौतम किचलू (Gautam Kitchlu) याने एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिच्या चाहत्यांना ही गोड बातमी सांगितली आहे. वर्षाच्या सुरूवातीलाच अशी गोड बातमी आल्यामुळे काजलचे चाहतेही नक्की आनंदी आहेतच. पण त्याचबरोबर काजल आणि गौतमच्या चेहऱ्यावरील आनंदही लपत नसल्याचे या फोटोमध्ये दिसून येत आहे. या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केल्याचे दिसून येते आहे. 2020 मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली होती.
अधिक वाचा – जाणून घ्या जानेवारीमध्ये जन्म झालेल्या व्यक्ती कशा असतात
काजलनेही बेबी बंपसह केला फोटो शेअर
काजलचा नवरा गौतमने सर्वात आधी तिच्यासह फोटो शेअर करत ही बातमी सांगितली आहे. याखाली गौतमने कॅप्शन दिले आहे की, ‘2022 तुझ्याकडे पाहात आहे’ यासह त्याने गरोदर महिला असणारा इमोजीही शेअर केला आहे. त्यामुळे सर्वांनीच त्यांना शुभेच्छा द्यायला सुरूवात केली. तर काजल अग्रवालनेही आपला हाच फोटो सोशल मीडियावर शेअर करत बेबी बंप (baby bump) फ्लॉन्ट केला आहे. हिरव्या रंगाच्या डिझाईनर गाऊनमध्ये आपल्या नवऱ्यासह काजल अत्यंत सुंदर आणि आनंदी दिसून येत आहे. काजलने याखाली कॅप्शन दिली आहे, ‘जुन्या गोष्टींसाठी मी डोळे बंद केले असून आता नव्या गोष्टींकडे पाहत आहे. नव्या वर्षाच्या शुभेच्छा. 2021 साठी अत्यंत आभारी आणि संपूर्ण आशा, विनम्रता आणि आपल्या हृदयात प्रेम घेऊन 2022 च्या दिशेने वाटचाल करत आहे.’ काजल आणि गौतम हे पहिल्यांदाच आई – वडील होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच आपल्या संपूर्ण कुटुंबासह सुट्टी मजेत घालविण्यासाठी काजल दुबईला रवाना झाली आहे. याचे अनेक व्हिडिओदेखील समोर आले होते. तर आता नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच ही बातमी आल्यामुळे काजलचे चाहतेही अत्यंत आनंदी आहेत. काजल सध्या आपल्या कुटुंबासोबत या आनंदाचा आस्वाद घेत आहे.
अधिक वाचा – ही दोस्ती तुटायची नाय… विशाल- विकासने घेतलं ज्योतिबाचं दर्शन
खासगी सोहळ्यात झाले लग्न
काजलने दक्षिणेत अनेक चित्रपट केले आहेत. तिचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. 2020 मध्ये कोरोनादरम्यान मुंबईतील ताज महाल पॅलेसमध्ये काजलने गौतम किचलूशी लग्नगाठ बांधली. हा अत्यंत खासगी लग्नसोहळा होतो. कोणताही गाजावाजा न करता आणि अत्यंत साध्या पद्धतीने काजल आणि गौतमने लग्न केले होते. आता लग्नाच्या दोन वर्षानंतर काजल आई होणार आहे. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरील आनंद लपत नाहीये. तर तिच्या चाहत्यांनाही अत्यानंद झाल्याचे तिच्या फोटोखाली आलेल्या कमेंट्समुळे दिसून येत आहे. काही दिवसांपासून काजल गरोदर असल्याच्या वावड्या उठत होत्या. काजलचा एअरपोर्टवर एक फोटो काढण्यात आला होता. त्यामुळे ती गरोदर असण्याचा अंदाज बांधण्यात येत होता. मात्र अभिनेत्रीने यावर आता आपण काहीही बोलू इच्छित नाही अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली होती. योग्य वेळ आल्यावर आपण जाहीर करू असेही तिने सांगितले होते. दरम्यान नव्या वर्षात काजलच्या नवऱ्याने या बातमीची पुष्टी देत तिच्या चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे.
अधिक वाचा – अनुष्का शर्मा करतेय कमबॅक,नववर्षात लागोपाठ येणार तीन बिग बजेट चित्रपट
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक