ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
अनुष्का शर्मा करतेय कमबॅक,नववर्षात लागोपाठ येणार तीन बिग बजेट चित्रपट

अनुष्का शर्मा करतेय कमबॅक,नववर्षात लागोपाठ येणार तीन बिग बजेट चित्रपट

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात आईबाबा झाले. अकरा जानेवारीला वामिकाचा जन्म झाला आणि तिच्या संगोपनासाठी अनुष्काने बॉलीवूडमधून चक्क ब्रेक घेतला. वामिका या जानेवारीत 11 तारखेला एक वर्षांची होणार. त्यामुळे आता अनुष्काला पुन्हा तिच्या करिअरवर फोकस करण्यासाठी वेळ काढता येणार आहे. अनुष्काला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यास चाहते देखील नक्कीच उत्सुक आहेत. मात्र अनुष्का छोटयामोठ्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांसमोर येणार नाही. ती तिच्या चित्रपटांच्या निवडीबाबत नेहमीच सावध असते. त्यामुळे अनुष्का सध्या तीन बिग बजेट चित्रपटांमधून कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. 

बिग बॉस फेम सोनाली पाटील होतेय दिवसेंदिवस हिट

अनुष्का शर्माचा बिग कमबॅक

अनुष्काच्या कमबॅकबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनुष्का 2022 मध्ये बिग कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. तिने तीन मोठे प्रोजेक्ट यासाठी साइन केले आहेत. यातील दोन प्रोजेक्ट चित्रपटगृहात प्रदर्शित होतील तर एक ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होणार आहे. ओटीटीवर येणारी हा एक आतापर्यंतचा सर्वात मोठा बिग बजेट प्रोजेक्ट असेल अशी सध्या चर्चा आहे. त्यामुळे एक चित्रपट ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होणार असला तरी तो ब्लॉकबस्टर असेल अशी आशा आहे. आतापर्यंत अनुष्काने या चित्रपटांच्या नावांची घोषणा केली नसली तरी लवकरच ती याबाबत अधिकृत माहिती चाहत्यांना देण्याची शक्यता आहे. 

‘वन फोर थ्री’ चित्रपटातील खलनायक अनंता देतोय साऊथच्या खलनायकांना टशन

ADVERTISEMENT

2022 मध्ये अनुष्का करणार तिच्या करिअरवर फोकस

अनुष्काने तिच्या बॉलीवूड करिअरमध्ये आजवर अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट केलेले आहेत. त्यामुळे ती चित्रपटांची निवड अगदी सावधपणे करते. जेव्हा तिला वाटतं की, जेव्हा एखाद्या चित्रपटाच्या स्किप्ट आणि पात्रांमध्ये लोकांना खिळवून ठेवण्याची ताकद आहे तेव्हाच ती ते चित्रपट स्वीकारते. आतातर तिला बाळंतपणानंतर खूप काळानंतर पुन्हा कमबॅक करायचा आहे. त्यामुळे ती चित्रपट निवडताना जास्तच सावध असणार यात शंका नाही. एखाद्या छोट्या मोठ्या चित्रपटातून कमबॅक करण्यापेक्षा बिग बजेट प्रोजेक्टमधून कमबॅक करणं तिला जास्त योग्य वाटत आहे. यातून ती पुन्हा एकदा तिच्या करिअरवर फोकस करताना दिसून येत आहे. त्यामुळे 2022 हे वर्ष अनुष्काच्या करिअरसाठी नक्कीच खास असेल. त्यामुळे चाहत्यांना अनुष्काचा नवा अवतार आणि नवीन भूमिका यावर्षी नक्कीच पाहता येण्याची शक्यता आहे. अनुष्काच्या सुल्तान, पीके, संजू अशा चित्रपटांमधून बॉलीवूडला चांगला बिझनेस मिळालेला आहे. त्यामुळे अनुष्काचा कमबॅक बॉलीवूडसाठीदेखील खास असेल.

अंकुश, वैदेही, सिद्धार्थचा ‘लोच्या झाला रे’

03 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT