लग्न म्हणजे सात जन्मांसाठी एकमेकांशी जोडलेले प्रेमाचे नाते. लग्नाआधी एकमेकांवरील प्रेमाची पुसरटशी कल्पनाही न देता विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी राजस्थानमध्ये शाही थाटामाटात लग्न केलं. लग्न ठरल्याची बातमी समजचताच लग्न कुठे होणार, लग्नात कोण कोण येणार असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाले होते. मात्र विकी आणि कतरिनाने 9 डिसेंबर 2021 रोजी जास्त गाजावाजा न करता काही मोजक्या पाहुण्या मंडळीच्या उपस्थितीत राजस्थानमध्ये शाही थाटात लग्न केलं. आता हे दोघं हनिमूनला कुठे आणि कधी जाणार हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
मेकअपचा अतिरेक झाल्यामुळे या अभिनेत्रीला गाठावे लागले हॉस्पिटल
या ठिकाणी जाणार विकी आणि कतरिना हनिमूनसाठी
लग्नाची बातमी लिक होऊ नये यासाठी विकी आणि कतरिनाने चांगलीच खबरदारी घेतली होती. मात्र त्यांच्या हनिमूनची बातमी चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लग्नानंतर 10 डिसेंबरला विकी आणि कतरिना मुंबईला परत येणार आहेत. मात्र दुपारी मुंबईवरून ते थेट मालदिव्जला जाण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी हनिमूनसाठी बेस्ट डेस्टिनेशन मालदिव्ज निवडलं आहे. त्यामुळे मुंबई एअर पोर्टवरून बाहेर न येता ते तिथुनच मालदिव्जसाठी रवाना होण्याची शक्यता आहे. हनिमूनही डेस्टिनेशनबाबत विकी आणि कतरिनाला कोणालाही काही कळू द्यायचे नाही. त्यामुळे मालदिव्जचे नाव व्हायरल होताच त्यांनी हनिमून डेस्टिनेशन बदलले आहे अशीही चर्चा सध्या सुरू आहे.
Bigg Boss Marathi: पुन्हा स्नेहा फसेल का जयच्या गोड बोलण्याला
वेडिंग लुक
लग्नानंतर हनिमूनला जाण्याची घाई प्रत्येक कपलला झालेली असते. लग्नाचा थाटमाट आवरताच विकी आणि कतरिनाही त्यांच्या हनिमूनला रवाना होतील. लग्नसोहळ्या शाही अंदाज पाहता दोघंही एकमेकांसोबत खूप खुश आहेत. लग्नाच्या फोटोत विकी कौशल खूपच रुबाबदार तर कतरिनाही सुंदर दिसत होती. कतरिनाने लाल लेंहगा, बिंदी, नथ, चोकर असा साजशृंगार केला होता. ज्यामुळे तिचा ब्रायडल लुक सर्वांना मोहून टाकणारा होता. राजस्थानमध्ये रॉयल डेस्टिनेनशन वेडिंगनंतर मुंबईत सर्वांसाठी ग्रॅंड रिसेप्शन असण्याची शक्यता आहे. आता या रिसेप्शननंतर हे कपल हनिमूनला जाणार की आधी हे मात्र आता सांगता येणार नाही.
कतरिना-विकीनंतर श्रद्धा कपूर अडकणार लग्नाच्या बेडीत, पद्मिनी कोल्हापुरेने दिली हिंट