ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
tips-to-drape-saree-if-you-have-heavy-waist

कंबर असेल मोठी तर नेसा अशी साडी, दिसाल बारीक

घरात कोणताही खास कार्यक्रम असेल अथवा कोणताही सण असेल अनेक महिलांना साडी नेसणे अधिक आवडते. तर काही कार्यक्रमांसाठी मुद्दाम साडी नेसण्यात येते. सणासुदीला साडी नेसणे हा उत्तम पर्याय आहे. साड्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. मग कोणत्या कार्यक्रमासाठी कोणती साडी नेसायची याचाही विचार सुरू होतो. तुम्हाला जर असं वाटत असेल तर महाग साडी असेल तर त्या साडीचा लुक अधिक चांगला दिसेल. तर असं अजिबात नाही. तुम्ही साडी कशाप्रकारे स्टाईल करत आहात आणि तुमची शरीरयष्टी कशी आहे हेदेखील लक्षात घ्यायला हवे. तसंच तुम्ही जुन्या साड्यांपासून ड्रेसही शिऊ शकता. तर तुमची कंबर जर मोठी असेल आणि तुम्हाला साडी नेसायची असेल तर तुम्ही काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवायला हव्यात. तुम्ही या विशिष्ट पद्धतीने साडी नेसली तर तुम्ही बारीक दिसू शकता. प्रत्येक महिलेचे शरीर हे वेगळे असते. साडी नेसल्यानंतर कंबर पटकन कळून येते. त्यामुळे साडी नेसताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. तुमची मोठी कंबर लपविण्यासाठी नेसा अशा प्रकारे साडी. 

ब्लाऊजवर लुकची मदार (choose perfect blouse for the saree)

साडीचा लुक हा बऱ्याचदा तुमच्या ब्लाऊजच्या डिझाईननुसार ठरतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या साडीवरून नजर हटविण्यासाठी ब्लाऊजचा ट्विस्ट करायला हवा. तुमची कंबर मोठी असेल तर तुम्ही लहान हाताच्या ब्लाऊजऐवजी मोठ्या हाताचा ब्लाऊज (long sleeves blouse) घाला. तुम्ही मोठी कंबर झाकण्यासाठी हा लुक तुम्हाला अधिक फायदेशीर ठरतो. याशिवाय तुम्ही ब्लाऊज न घालता शर्ट स्टाईल करून त्यावर साडी नेसू शकता. यामुळे लोकांचे तुमच्या कमरेवरील लक्ष तुम्हाला नक्कीच हटविता येते. 

कपड्यावर करा लक्ष केंद्रित (make perfect saree option)

साडी नेसण्यापूर्वी तुम्ही कोणती साडी निवडत आहात हे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ तुमची कंबर जर थोडी मोठी असेल आणि तुम्हाला तुमचे पोट दिसायला नको असेल तर तुम्ही साडीचे थोडे जाड कापड निवडा. तसंच साडी पारदर्शक तर नाही ना हेदेखील पाहा. कारण पारदर्शक साडीमध्ये कंबर जास्त मोठी दिसते आणि पोटही दिसून येतं. शिफॉन (Chiffon Saree) अथवा नेटची साडी सहसा कंबर मोठी असणाऱ्यांनी नेसू नका. कारण यामुळे तुमचा खालचा भाग अधिक मोठा दिसतो. त्यामुळे ब्रोकेड, सिल्क साडी, क्रेप, प्रिंटेड जॉर्जेट अथवा जाडसर साड्यांचा पर्याय तुम्ही निवडा. यामध्ये सध्या ट्रेंडमध्ये असलेली खणाची साडी आणि खणाचे ब्लाऊज ही तुम्हाला अधिक सुंदर दिसू शकतात.

साडी नेसण्याची पद्धत (How to drape saree)

तुम्ही लांब हाताच्या ब्लाऊजवर साडी नेसणार असाल तर तुम्ही ती कशी नेसायची हे जाणून घ्यायला हवं. मोठ्या हाताचा डिझाईनर ब्लाऊज असेल तर साडीचा पदर मोकळा ठेवा. साडीच्या पदराच्या प्लेट्स काढल्यास, पोट आणि कंबर अधिक मोठी दिसते. त्यामुळे पदर एका हातावर राहील असा घ्या. यामुळे साडीला एक फॉल लुक मिळतो. तसंच ही साडी अत्यंत आकर्षक दिसते आणि तुम्ही अधिक बारीक दिसता. तसंच पोट दिसून येत नाही. 

ADVERTISEMENT

ही हॅक नक्की वापरा (Use Hack)

बऱ्याच महिलांना साडीचा पदर सांभाळणे कठीण जाते. त्यामुळे महिला साडीच्या प्लेट्स काढून पिनअप करतात. पण असं करण्याची आवश्यकता नाही. सर्वात पहिल्यांदा साडी तुम्ही नीट नेसून घ्या. त्यानंतर तुम्ही त्यावर लाँग जॅकेटची स्टाईल करा. पार्टीवेअर अथवा एम्ब्रॉईडेड जॅकेट साडीसाठी उत्तम पर्याय आहे.यामुळे तुमची कंबरही मोठी दिसणार नाही. पदरही नीट सांभाळला जाईल आणि तुम्हाला साडीचा एक वेगळा लुकही मिळतो. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

28 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT