ADVERTISEMENT
home / आरोग्य
या फळांच्या साली आरोग्यासाठी असतात फायदेशीर

या फळांच्या साली आरोग्यासाठी असतात फायदेशीर

फळ ही आरोग्यासाठी फारच चांगली असतात. फळांच्या सेवनामुळे संपूर्ण शरीराचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. विभिन्न प्रकारची फळे बाजारात मिळतात. संत्री. मोसंबी, सफरचंद, आंबा, पेरु, चिकू, पेर, नासपती, खरबूज,टरबूज आणि कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची फळ आपण खातो. या फळांच्या यादीत काही पाश्चिमात्य फळांचाही समावेश सध्या झालेला आहे. या सगळ्याच फळांची चव ही वेगळी असते. त्यानुसार त्याचे फायदेही वेगवेगळे असतात. आता काही फळांच्या साली या आरोग्यासाठी फारच लाभदायी असतात. अशा साली टाकून न देता त्यांचे वेगवेगळे उपयोग तुम्ही करु शकता किंवा त्याचे सेवन देखील करु शकता. ज्यामुळे तुम्हाला त्याचे फायदे मिळण्यास मदत होईल.

पावसाळ्यात आवर्जून खायला हवीत ही 5 चविष्ट फळं

फळांच्या सालीचे फायदे

फळांच्या साली का महत्वाच्या आहेत आणि कोणत्या फळांच्या सालींचा उपयोग करायला हवा हे जाणून घेण्याआधी या फळांच्या सालीचे फायदे जाणून घेऊया. 

  1. फळांच्या सालीमध्ये साखर आणि फायबर मोठ्याप्रमाणात असतात. त्यामुळे नाहक भूक लागत नाही. पोट भरलेले राहते. 
  2. वजन वाढू द्यायचे नसेल तरी देखील फळांच्या साली या खायला हव्यात. फळांच्या सालीमुळे पोट पटकन भरते आणि दुसरं काही खाण्याची इच्छा देखील होत नाही. 
  3. काही फळांच्या साली या खाता येत नाही पण त्यांचा उपयोग थोडा वेगळ्या पद्धतीने करता येतो. उत्तम त्वचेसाठी काही फळांच्या साली जसे की, संत्री, कलिंगड, केळी याची साल चेहऱ्याला लावता येते. त्यामुळे त्वचा सुंदर होण्यास मदत मिळते. 
  4. फळांच्या सालीमध्ये देखील फायबर असते त्यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. 
  5. फळांमध्ये असलेले घटक कॅन्सर आणि अनेक आजारांना दूर ठेवतात.

उन्हाळ्यात ही 5 फळं ठेवतील तुम्हाला ‘हायड्रेट’

ADVERTISEMENT

फळं ज्यांच्या साली आहेत फारच फायदेशीर

आता आपण जाणून घेऊयात अशी फळं. ज्यांच्या साली आहेत फारच आरोग्यदायी


सफरचंद- बारमाही मिळणारं असं हे फळ आहे. इट अॅपल अ डे किप डॉक्टर अ वे असे उगाच म्हणत नाहीत. सफरचंदामध्ये अनेक पोषक घटक असतात. सफरचंदाच्या सालीमुळे अतिनील किरणांपासून  बचाव होतो. ज्याच्यामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत मिळते.  या सालीमध्ये असलेले इसेन्शिअल मिनरल्स शरीरासाठी फारच फायद्याचे असतात. त्यामुळे सफरचंद हे खाणे फारच गरजेचे असते. 

आंबा – आंब्याच्या साली या तुम्ही खूप जणांना खाताना पाहिले असेल. आंब्याच्या साली या आरोग्यासाठी फारच फायद्याच्या असतात. आंबा कापल्यानंतर तुम्ही त्याच्या साली टाकून न देता आंब्याची साल चावून चावून खा. त्यामुळे आवश्यक असलेले  अनेक घटक तुम्हाला मिळू शकतील. 

केळी- केळीच्या साली देखील खूप जण खातात. ते खाताना पाहून खूप जणांना विचित्र वाटणं स्वाभाविक आहे. पण केळ्याच्या साली या फारच फायद्याच्या असतात.  केळ्याच्या सालीमध्ये असलेल्या घटकांमुळे कॅन्सरशी लढणारे घटक मिळतात. त्यामुळे केळ्याची सालं देखील खावू शकता. 

या शिवाय ज्या फळांच्या साली या खाण्यालायक असतात त्या सगळ्या सालींचे तुम्ही सेवन करु शकता. एखाद्या टणक फळांच्या साली या खाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्या मुळीच खाऊ नका.

अशी ओळखा केमिकल-फ्री फळं How to recognize chemical free fruits

पावसाळ्यात कोणती फळे खावीत (Fruits To Eat In Monsoon)

ADVERTISEMENT
01 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT