दोन प्रेम करणारे जीव एकमेकांपासून वेगळे राहू शकत नाहीत ही म्हण तुम्ही ऐकली असेल. तुमच्यापैकी काहींनी ती अनुभवली देखील असेल. पण लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये ही बाब पूर्णपणे वेगळी ठरते, यामध्ये दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना काही कारणांमुळे एकमेकांपासून लांब राहावं लागते. इतर जोडप्यांप्रमाणे त्यांना रोज रोज भेटता येत नाही, एकमेकांचा सहवास मिळत नाही. एकमेकांशी भरभरून बोलता येत नाही. हल्ली व्हिडीओ कॉल मुळे बोलताना समोरच्या व्यक्तीचा चेहेरा तर दिसतो पण त्याला प्रत्यक्ष भेटीची सर येत नाही. Long Distance Relationship मध्ये असणारे लोक भलेली एकमेकांपासून वेगळे राहतात, खूप लांब राहतात पण तरीही त्यांच्यातले प्रेम टिकून राहते. कारण त्यांचा एकमेकांवर विश्वास असतो आणि त्यांच्या प्रेमावर विश्वास असतो. आपल्या प्रेमाच्या व्यक्तीला परत केव्हा भेटता येईल या दिवसाची ते आतुरतेने वाट बघत असतात त्या दरम्यान ते एकमेकांपर्यंत फोनवरून, मेसेजेसमधून आपल्या भावना, आपले प्रेम पोचवण्याचा प्रयत्न करत असतात. लांब असलेल्या प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवताना प्रेयसीच्या मनात भावना दाटून येतात. प्रेयसीचा वाढदिवस असतो तेव्हा तुमच्या प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश तुम्ही नक्कीच पाठवत असाल. आम्ही या सुंदर खऱ्या आणि भक्कम नात्याचे चित्रण करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हालाही जर तुमच्या प्रेमाच्या खास व्यक्तीपर्यंत तुमच्या भावना पोचवायचा असतील पण तुम्हाला त्यासाठी शब्द सापडत नसतील तर खालील Long Distance Relationship Quotes In Marathi वाचा. या शब्दांत तुमच्या नाजूक भावना गुंफण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातील काही संदेश तुमच्या खास व्यक्तीला पाठवण्यासाठी तुम्हाला नक्कीच आवडतील. हे अनोखे प्रेमप्रकरण तुम्हाला आवडेल अशी आशा आहे.वाचा Long Distance Relationship Quotes In Marathi
Table of Contents
- प्रेरणादायी लाँग डिस्टन्स रिलेशनशिप कोट्स मराठीत – Motivational Long Distance Relationship Quotes In Marathi
- हृदयस्पर्शी लाँग डिस्टन्स रिलेशनशिप लव कोट्स मराठीत – Heart Touching Long Distance Relationship Love Quotes In Marathi
- बेस्ट लाँग डिस्टन्स रिलेशनशिप स्टेटस मराठी – Best Long Distance Relationship Status In Marathi
- दुःखी लाँग डिस्टन्स रिलेशनशिप कोट्स – Sad Long Distance Relationship Quotes In Marathi
- आय मिस यू कोट्स मराठी – I Miss You Quotes In Marathi
प्रेरणादायी लाँग डिस्टन्स रिलेशनशिप कोट्स मराठीत – Motivational Long Distance Relationship Quotes In Marathi
लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप निभावणे सोपे नाही. कारण या नात्यात तुमच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि संयमाचा कस लागतो. जे खरे प्रेम असते तेच या कठीण परीक्षेतून तावून सुलाखून बाहेर पडते आणि सोन्यासारखे झळाळते. तुम्हालाही तुमच्या प्रेमाच्या व्यक्तीची खूप आठवण येऊन निराश वाटत असेल तर वाचा Motivational Long Distance Relationship Quotes In Marathi ज्यामुळे तुमच्या मनाला थोडी उभारी येईल.
तुम्ही एकमेकांपासून कोसो दूर आहात आणि जर तुमच्या नात्यात Long distance मुळे फरक पडत नसेल
तर समजून जा, भलेही तुम्ही शरीराने एकमेकांपासून लांब आहात पण तुम्ही मनाने एकमेकांच्या खूप जवळ आहात.
एखाद्याला मिस करणे हा त्यांच्यावर प्रेम करण्याचा एक भाग आहे. जर तुम्ही कधीही एकमेकांपासून लांब राहिले नसाल तर तुमचे प्रेम किती मजबूत आहे हे तुम्हाला कधीच कळणार नाही.
Long Distance Relationship मधे आपलं माणूस लांब जाण्याची भीती नसते. कारण ते आधीपासूनच लांब
असतात.. पण या अंतरामुळे ते मनाने अजूनच जवळ येतात.
या अंतराची पर्वा करू नकोस. जेव्हा तुला माझी आठवण येईल तेव्हा फक्त एक कॉल करून मला आवाज दे. मी तुझ्यासाठी एका हाकेच्या अंतरावरच आहे.
तुझ्यापासून दूर राहूनही तुझ्यावर मी इतकं प्रेम केलंय, की जवळ आल्यावर ते व्यक्त करायला मला शब्दच सापडत नाहीत…
मी कुठेही असलो तरी, मी कुठेही गेलो तरी, तुझे नाव माझ्या हृदयात असते आणि तुझी आठवण माझ्या मनात ताजी असते. जेव्हा जेव्हा मी नैराश्याच्या अंधारात जातो तेव्हा तुझ्या प्रेमाचा प्रकाश मला तुझ्यापर्यंत आणून सोडतो.
ज्यांचे प्रेम खरे आहे ते कुठलाही अडथळा पार करू शकतात. अंतर कधीही प्रेमाने जोडल्या गेलेल्या दोन हृदयांना वेगळे करू शकत नाही.
जेव्हा जेव्हा मला तुझ्यापासून लांब असल्याचे वाईट वाटू लागते, जेव्हा मला तुझी खूप आठवण येते, तेव्हा मी स्वतःला आठवण करून देतो की मी किती भाग्यवान आहे की मी खूप खास कोणाला तरी मिस करतो.
मी झोपेत असताना, मला तुझी स्वप्ने पडतात, आणि जेव्हा मी जागा असतो तेव्हा मला तुझ्याकडे यावेसे वाटते. मी तुझ्यापासून कितीही लांब असलो तरी मनाने कायम तुझ्या जवळच आहे आणि तुझा चेहेरा कायम माझ्या डोळ्यांपुढे आहे.
जेव्हा आपल्याकडे एखादी गोष्ट खूप जास्त असते किंवा आपल्याला एखादी गोष्ट सहज मिळते तेव्हा कदाचित आपल्याला तिचे खरे मूल्य कळत नाही. असेच प्रेमाचे देखील आहे. जेव्हा सहज मिळते तेव्हा त्या प्रेमाचे मूल्य हळूहळू कमी होते. एकमेकांपासून लांब राहिल्यावरच आणि त्या अंतराच्या काळातच तुम्हाला प्रेमाचा अर्थ खरोखर कळतो.
अधिक वाचा – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता.
हृदयस्पर्शी लाँग डिस्टन्स रिलेशनशिप लव कोट्स मराठीत – Heart Touching Long Distance Relationship Love Quotes In Marathi
आपल्या आजूबाजूला आपण जेव्हा आकंठ प्रेमात बुडालेली जोडपी बघतो तेव्हा आपल्याला त्यांचा हेवा वाटतो कारण ते मनात आले कि त्यांच्या प्रेमाच्या माणसाला भेटू शकतात. त्यांच्याशी बोलू शकतात. त्यांच्या प्रेमाच्या व्यक्तीला काही त्रास असेल तर ते जवळून त्यांची काळजी घेऊ शकतात. पण लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असलेल्यांना मात्र हे काहीच अनुभवायला मिळत नाही. अनेक दिवसांची , महिन्यांची तपश्चर्या केल्यानंतर त्यांना त्यांच्या प्रेमाच्या माणसाला प्रत्यक्ष भेटायला मिळते. एखाद्या क्षणी त्या व्यक्तीची कितीही आठवण येत असली, ती व्यक्ती आपल्या बाजूला साथ द्यायला, आपली काळजी घ्यायला हवी असली तरीही ती व्यक्ती लांब असल्याने येऊ शकत नाही. अशावेळी मनाला जो त्रास होतो तो शब्दांत व्यक्त करता येत नाही. तुम्हालाही तुमच्या भावना व्यक्त करायच्या असतील तर वाचा Heart Touching Long Distance Relationship Love Quotes In Marathi-
प्रेम हे तेव्हाच टिकते जेव्हा ते दोघांनाही हवे असते . प्रेम कमी होण्यासाठी अंतर हे कारण नसते. जर मनात अंतर आले नाही तर मग शरीराने एकमेकांपासून कितीही लांब गेलो तरी प्रेम कमी होत नाही. उलट ते आणखी वाढते.
प्रेम टिकवण्यासाठी दोघे भांडतातही आणि एकमेकांना समजुनही घेतात. एकमेकांपासून लांब असले तरी एकमेकांच्या मनात व हृदयात तेच असतात.
जगण्यासाठी पैसा गरजेचा असतो मला मान्य आहे, पण त्याहीपेक्षा अधिक महत्वाचा तू आहेस.कमी पैशात मी जगू शकते पण तुझ्याशिवाय नाही.
तू आहेस म्हणून मी आहे. माझ्यावर तुझ्याइतकं प्रेम कोणीही करत नाही, याची मला जाणीव आहे. म्हणूनच कितीही लांब असलो तरीही मी तुला कधीही सोडून जाणार नाही हे माझं तुला वचन आहे…
नशिबानेच आपण एकमेकांना भेटलो.आपण एकमेकांशी बोलायला लागलो. आपण एकमेकांना आवडू लागलो हे
कदाचित आपल्या नशिबातच लिहून ठेवलं असेल.इतक्या वर्षांनीही आज आपण आपलं प्रेम तसंच टिकवून ठेवलं आहे. आपण एकमेकांपासून लांब असलो तरीही आपलं प्रेम कायम तसच राहील हे मात्र वचन आहे तुला. काहीही होवो, आपलं हे नातं कधीही तुटणार नाही.
लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असणे म्हणजे पुन्हा एकदा शाळेत येण्यासारखे आहे: अंतर आपल्याला एकत्र घालवलेल्या दिवसांची प्रशंसा करण्यास आणि संयमाची व्याख्या कशी करावी हे शिकवते. हे आपल्याला आठवण करून देते की एकत्र आलेला प्रत्येक क्षण खास असतो आणि प्रत्येक सेकंदाची आपण कदर केली पाहिजे.
ती माझ्यापासून दूर आहे पण तिचाच चेहेरा माझ्या डोळ्यांत, माझ्या हृदयात आणि माझ्या मनात असतो. तीच माझ्या श्वासांत आणि ध्यासात असते. तिच्यापासून लांब राहण्याचा एक क्षण एका युगाप्रमाणे भासतो. पण हे अंतरच प्रेमाची खरी किंमत शिकवते.
आपली हृदये जोडली गेली पाहिजेत, आपले मन एक असले पाहिजे., प्रेमासाठी शरीरानेच एकमेकांच्या जवळ असणे आवश्यक नाही. जर मने एक असतील तर हे अंतर देखील एका क्षणात पार करता येते.
जर प्रेम काळाच्या कसोटीवर टिकू शकत नसेल तर ते प्रेमाच्या परीक्षेत अपयशी ठरले आहे असे समजावे. पण मला खात्री आहे, आपले प्रेम या कसोटीवर नक्की खरे उतरेल आणि आपल्यातले हे अंतर आपल्याला अधिक जवळ आणेल.
हे प्रेम खूप खास आहे, आणि ते प्रेम अनुभवण्यासाठी आपण शरीराने जवळ असणे गरजेचे नाही. तू लांब असलीस तरीही मनाने मी तुझ्या जवळच आहे.
अधिक वाचा – Relationship Quotes In Marathi
बेस्ट लाँग डिस्टन्स रिलेशनशिप स्टेटस मराठी – Best Long Distance Relationship Status In Marathi
हल्ली अनेक लोक आपल्या मनातल्या भावना सोशल मीडिया किंवा whatsapp स्टेटसवर व्यक्त करतात. स्टेटसच्या माध्यमातून लोक आपल्या भावना इतरांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतात. अशाच एखाद्या खास व्यक्तीसाठी तुम्हाला काहीतरी छान स्टेटस ठेवायचे असेल तर आणि ती व्यक्ती तुमच्यापासून लांब असेल तर पुढील Best Long Distance Relationship Status In Marathi वाचा आणि तुमच्या प्रेमाच्या व्यक्तीसाठी एखादे खास ,प्रेमळ स्टेटस ठेवा.
तुला माहित नाही तू किती गोड आहेस. तुझ्यात माझा जीव अडकलाय आणि तू मला जीवापेक्षा जास्त प्रिय आहेस.
आपल्यात कितीही अंतर असो, तू कालही माझी होतीस, तू आजही माझीच आहेस. माझे संपूर्ण आयुष्य तुझ्या अस्तित्वाने व्यापले आहे.
तुझ्या आणि माझ्यातले नाते जगावेगळे आहे, आपल्यात कितीही अंतर असले तरी आपले प्रेम काही कमी होत नाही.
अंतरामुळे नाती तुटत नाहीत. नाती टिकवण्यासाठी फक्त खऱ्या प्रेमाची आणि निष्ठेची गरज असते.
जर कोणी मला विचारले की दुःख म्हणजे काय?” तर माझ्या मते, जेव्हा प्रियजन एकमेकांपासून दूर होतात ते दुःख सगळ्यात मोठे असते.
मला दु:ख नाही की आपण शरीराने एकमेकांपासून दूर आहोत, जोपर्यंत आपल्या डोक्यावर एकच आकाश आहे आणि एकाच धरतीवर आपण चालतोय, तोवर आपण एक आहोत…
अंतर हे एखाद्या परीक्षेसारखे असते, जे ठरवते की आपलं प्रेम किती खरे आहे आणि ते किती पुढे जाऊ शकते…
मी इथे अन तू तिथे! आपल्यात अंतर आहे पण आपल्या हृदयात प्रेम आहे. म्हणूनच एक दिवस या अंतरांचा पराभव करून आपले प्रेम विजयी होईल.
Long Distance Relationship ची ही वेगळीच मजा असते. मी इकडे तर तू तिकडे! तुझ्याशी रोज बोलणं , तुझ्या फोनची वाट पाहणं.. दिवसभर मेसेजेस करून तुला त्रास देणं. कधीतरी भेटल्यावर तू उशिरा आल्यावर मी रुसून बसणं!
जेव्हा तुझी खूप आठवण येते पण तुझा फोन येत नाही ना मेसेज येतो…तुला माझ्यासाठी वेळ नसतो तेव्हा ती वेळ माझ्यासाठी काय असते हे फक्त मला माहित आहे.
दिवसरात्र तुझी वाट पाहतांना, तुझ्या फोनची , मेसेजची बघताना दिवस संपतात, पण माझं वाट पाहणं काही संपत नाही.
अधिक वाचा – Birthday Surprise Ideas For Boyfriend In Marathi
दुःखी लाँग डिस्टन्स रिलेशनशिप कोट्स – Sad Long Distance Relationship Quotes In Marathi
लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप सोपे नसते. आपल्या चांगल्या वाईट काळात आपल्याला प्रचंड गरज असताना देखील आपल्यासाठी सर्वात महत्वाची असलेली, आपल्या सगळ्यात जवळची व्यक्ती आपल्याजवळ येऊ शकत नाही. ती व्यक्ती शेकडो मैलांवर लांब असते आणि आपले सुखदुःख वाटून घ्यायला आपल्याजवळ येऊ शकत नाही. हे दुःख खूप तीव्र असते. एखाद्या हुरहूर लावणाऱ्या संध्याकाळी तर प्रेमाच्या व्यक्तीची जास्तच आठवण येते. अशावेळी मन कातर आणि हळवे होते. प्रेमाच्या व्यक्तीच्या विरहामुळे तुमचीही मनस्थिती अशी नाजूक असेल तर तुमच्या मनस्थितीचे वर्णन करणारे Sad Long Distance Relationship Quotes In Marathi वाचा.
आपल्यात भलेही शारीरिक अंतर खूप जास्त असेल पण आपल्या हृदयात एका इंचाचेही अंतर नाही.
तू माझी आठवण काढतेस म्हणून मला रोज उचकी लागते. पण मी ही तुझी आठवण काढतो म्हणून तुलाही उचकी लागत असेलच ना!
आपल्यातील हे अंतर तुझी नि माझी परीक्षा घेत आहे, या परीक्षेत आपण दोघे पास झालो तरच जवळ येऊ.
डोळ्यांच्या दृष्टीकोनातून बघितले तर आपण शरीराने एकमेकांपासून खूप दूर आहोत पण हृदयाच्या दृष्टीकोनातून बघितले तर आपण कधीच एकमेकांपासून लांब जाऊ शकत नाही. कारण मी तुझ्या हृदयात आहे आणि तुझी आठवण माझ्या हृदयात कोरलेली आहे.
प्रेम म्हणजे चोवीस तास कुणासोबत असणं नव्हे तर प्रेमाचा खरा अर्थ त्या खास व्यक्तीशिवाय जगू न शकणे हा आहे. तू माझ्या जवळ नसलास म्हणून काय झाले, तुझी आठवण एक क्षणही माझ्या मनातून जात नाही.
तू माझ्यापासून व मी तुझ्यापासून दूर आहे असे मी कसे म्हणू? मला तर प्रत्येक गोष्टीत तुझाच चेहरा दिसतो.
माझ्या आठवणींप्रमाणेच मी देखील तुझ्याकडे क्षणात येऊ शकलो असतो तर किती बरे झाले असते. तुझा सुंदर चेहेरा बघायला आणि तुझा गोड आवाज ऐकायला मला दिवसेंदिवस प्रतीक्षा करावी लागली नसती.
जरी आत्ता या क्षणाला मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, पण मला खात्री आहे की माझे प्रेम तुझ्यापर्यंत नक्कीच पोचले असेल. आय मिस यू!
तुझ्यापासून लांब असताना मी तुझ्याबद्दल इतका विचार करतो की मी तुझ्याशिवाय इतर कशाचाही विचार करू शकत नाही.
मला मान्य आहे की आपल्यात खूप अंतर आहे, पण माझ्यावर विश्वास ठेव, माझा तुझ्यावरील विश्वास आणि प्रेम जराही कमी झाले नाही.
आय मिस यू कोट्स मराठी – I Miss You Quotes In Marathi
आपल्या प्रेमाच्या व्यक्तीचा विरह हा सगळ्यांनाच त्रासदायक असतो. आपल्या खास माणसाची आठवण तर रोजच येते. पण एखाद्या क्षणी ती आठवण तीव्रतेने उफाळून येते आणि त्याच क्षणी आपल्याला आपल्या जवळच्या प्रेमाच्या माणसाजवळ जावेसे वाटते. पण ते शक्य नसते. मग आपण आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द शोधतो. तुम्हालाही तुमच्या जोडीदाराची आठवण सतावत असेल आणि तुम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटू शकत नसाल तर तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोचवा. वाचा I Miss You Quotes In Marathi-
असं वाटतं आत्ताच्या आत्ता तुझ्याकडे यावं आणि तुला मिठीत घेऊन सांगावं की किती त्रास होतो तुझ्यापासून दूर राहून जीवन जगतांना.. I Miss You
कोणास ठाऊक कशा जुळतात मनामनाच्या गाठी, अवतीभवती असतात लाख माणसं पण मन झुरतं फक्त तुझ्यासाठीच.. आय मिस यू!
आज खरंच खूपच तीव्रतेने तुझी आठवण येतेय, आत्ता तुला भेटावसं वाटतंय, भरभरून तुझ्याशी बोलावसं वाटतंय… पण नशिबाचा खेळ असा की मी इथे अन तू तिथे! आय मिस यु डिअर___!
आपलं मन खरंच किती वेडं असतं ना! कुणाच्या तरी आठवणीत जगतं आणि आशा करतं की त्या व्यक्तीनेही आपल्याला थोडंतरी Miss करावं.जशी मी झुरतेय तुझ्या आठवणींत, तुलाही येतेय का रे माझी आठवण? I Miss You ___…
माझं नशीब तरी किती खराब असावं…जी व्यक्ती हृदयाच्या सगळ्या कोपऱ्यांत आहे. त्या सर्वात जवळच्या व्यक्तीला मात्र दूर राहून फक्त Photo मध्ये बघून समाधान मानावं लागतंय! मिस यू_____
तुझ्या प्रेमाच्या ओढीने येईनच मी परत किंवा नियतीच्या खेळामुळे येऊ शकलो नाही तुझ्या भेटीला तरी तुझ्या आठवणी मात्र शेवटच्या श्वासापर्यंत हृदयात जपून ठेवीन. शेवटच्या क्षणापर्यंत तुझेच नाव माझ्या ओठी असेल. I Miss You____
तुझ्यात आणि माझ्यात कुठे दुरावा आहे? तुला माझी आठवण येते तिकडे आणि मला उचकी लागते इकडे…हाच आपल्या प्रेमाचा मोठा पुरावा आहे…
एका खास व्यक्तीच्या एका Call ची खूप वाट बघतोय.. कोणी तरी खूप प्रेमाने सांगितलं होत की वेळ मिळाल्यावर नक्की Call करेन..मिस यू___! कर ना कॉल!
सगळं खोटं असू शकतं पण अर्ध्या रात्री कोणासाठी तरी आपल्या डोळ्यात आलेले अश्रू कधीच खोटे नसतात. तुझी खूप आठवण येते गं! पण मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.
खुश राहण्यासाठी फार काही नाही लागत! फक्त एका special माणसाची साथ लागते.माझ्यासाठी ती स्पेशल व्यक्ती तू आहेस…I miss you.
लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप हे कमजोर मन असणाऱ्यांसाठी नाही. कारण या नात्यात संयमाचा, विश्वासाचा, प्रेमाचा आणि नात्याचा कस लागतो. ज्यांचे प्रेम खरे असते त्यांचेच नाते अंतर कितीही असले तरी टिकून राहते. उलट दूर राहिल्याने आपल्या प्रेमाच्या माणसाची आपल्याला जास्त किंमत कळते असे म्हणतात. म्हणूनच लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असणाऱ्यांना जोडीदाराच्या प्रेमाची, सहवासाची किंमत चांगलीच कळलेली असते. वाचा या नात्याचे वर्णन करणारे आणि ते नाते निभावणाऱ्या प्रेमवीरांच्या मनाची अवस्था सांगणारे Long Distance Relationship Quotes In Marathi.
फोटो क्रेडिट – istockphoto
अधिक वाचा – जोडीदारापासून दूर असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा (Long Distance Relationship Tips)