ADVERTISEMENT
home / Festival
Maharashtra Din Quotes In Marathi

100+ महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Maharashtra Din Wishes In Marathi

“जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या जयघोषातच दरवर्षी महाराष्ट्रात १ मे या दिवसाची सुरूवात होते. संपूर्ण महाराष्ट्रात १ मे रोजी ‘महाराष्ट्र दिन’ आणि ‘कामगार दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केले जातात. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. त्याचप्रमाणे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार चळवळीसाठीदेखील ओळखला जातो. महाराष्ट्राच्या स्थापना दिनानिमित्त राज्यात ठिकठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवश तुम्हाला शेअर करण्यासाठी महाराष्ट्र दिवस शुभेच्छा (Maharashtra Day Wishes in Marathi), महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Maharashtra Dinachya Hardik Shubhechha), महाराष्ट्र दिन कोट्स (Maharashtra Day Quotes in Marathi), महाराष्ट्र दिन मेसेज (Maharashtra Day Messages in Marathi), महाराष्ट्र दिन विशेष (Maharashtra Din Quotes in Marathi), महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश (Maharashtra Day Status in Marathi) शेअर करत आहोत. 

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Maharashtra Din Wishes In Marathi

Maharashtra Din Wishes In Marathi

Maharashtra Day Quotes In Marathi

महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा इतिहास मराठी माणून कधीच विसरू शकत नाही. म्हणूनच हेे संदेश मनात महाराष्ट्रीन असल्याचा अभिमान निर्माण करतात. खालील Maharashtra din quotes in marathi या दिवसाच्या निमित्ताने नक्की शेअर करा. 

महाराष्ट्र दिनाला तुमच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना पाठवा हे महाराष्ट्र दिवस शुभेच्छा

ADVERTISEMENT

भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा, शाहिरांच्या देशा, कर्त्यां मर्दांच्या देशा… जय जय महाराष्ट्र देशा 

बहु असोत सुंदर संपन्न की महा…प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

शिव निष्ठा येथ असे सतत जागती…अग्रेसर प्रांत महाराष्ट्र भारती… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा  

ADVERTISEMENT

पैठणचे प्रेम अमित देश कोकणा… पंढरीस ये विदर्भ देवदर्शना… अजरामर ऐक्यभाव येथ दृढमती…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

बाप महाराष्ट्राचा, महाराष्ट्राची माय, रयतेचा छत्रपती आमचा शिवराय…महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र… माझ्या राजाचा महाराष्ट्र…महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी… गुणगुणलो जे गीत गीत मराठी…. मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

महाराष्ट्रीयन असण्याचा मला अभिमान आहे. राज्य जे सर्वांसाठी आणि भारतासाठी अभिमानास्पद आहे. जय महाराष्ट्र

आजच्या शुभ दिवशी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी महाराष्ट्र दिन

महाराष्ट्रातील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना महाराष्ट्र राज्य स्थापना दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

महाराष्ट्राच्या या सुवर्ण दिवशी आपण एकत्र येऊन शपथ घेऊया की, महाराष्ट्राला येत्या वर्षात नव्या उंचीवर नेऊ. 

महाराष्ट्रात माझी जडणघडण झाली याचा मला अभिमान आहे. माझ्या माय मराठीचा मला अभिमान आहे. इथली संस्कृती तिचाही मला अभिमान आहे. महाराष्ट्र दिन 2021 च्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Maharashtra Din Wishes In Marathi

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा - Maharashtra Day Wishes In Marathi

Maharashtra Day Wishes In Marathi

महाराष्ट्र दिन विशेष साजरा करण्याठी आपण आपल्या प्रियजनांना Maharashtra Day Wishes In Marathi पाठवतो. यासाठी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या नक्कीच फायद्याच्या ठरतील. 

ADVERTISEMENT

जय जय महाराष्ट्र माझा… गर्जा महाराष्ट्र माझा…महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी… मराठी भाषिकांना आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

प्रिय अमुचा महाराष्ट्र देश हा ! महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा

मंगल देशा… पवित्र देशा… महाराष्ट्र देशा…प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

गर्जा महाराष्ट्र माझा…. जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा…. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

कपाळी केशरी टिळा लावितो… महाराष्ट्र देशा तुला वंदितो…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा… जय जय महाराष्ट्र माझा… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

ज्ञानाच्या देशा ,प्रगतीच्या देशा आणि संताचा देशा… महाराष्ट्र  दिनाच्या शुभेच्छा  

महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या सर्व मराठी बांधवाना मनपूर्वक शुभेच्छा 

इतरांना पडला असेल विसर पण या सोनेरी दिवसासाठी जे झाले हुतात्मा त्यांचं ही होऊ दे स्मरण महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची उज्वल दिशेकडे वाटचाल करूया. एकमेंकाना जपूया आणि महाराष्ट्राची धुरा सांभाळूया. महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश

ADVERTISEMENT

दगड होईन तर सह्याद्रीचा होईन
माती झालो तर महाराष्ट्राची होईन
तलवार झालो तर आई भवानीची होईन
जय भवानी जय शिवाजी
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

पुर्नजन्म घेतला तरी महाराष्ट्रात घेईन
आणि या मातीत जन्मलेल्या वीरांसारखा शूरवीर होईन
महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश

धन्य आहे ही महाराष्ट्राची माती
कोटी कोटी नमन या पवित्र धरणीला
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

कामगार दिनाच्या शुभेच्छा (International Labour Day Wishes In Marathi)

१ मे हा दिवस आंतरराष्टीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. यासाठी कामगार दिनासाठी शुभेच्छा संदेश किंवा maharashtra dinachya hardik shubhechha. 

ADVERTISEMENT
 • सर्व कष्टकरी, श्रमिकांना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
 • एकजुटीने काम करू कामावरती प्रेम करू कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 • काम करा हो काम करा कामावरती प्रेम करा…. कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 • कष्टाची भाकर मिळते कामातून, काम करा आणि मोठे व्हा… महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 • शेतकरी ते कष्टकरी प्रत्येकाला कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 • दिवस हक्काचा… दिवस कामगारांचा… कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 • कामगार कल्याणाचे राखू धोरण, करू या महाराष्ट्राचे निर्माण … कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 • काम असे करा की लोकांना म्हणायला हवं काम करावं तर यानेच… कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 • कराल कष्ट तर होईल दारिद्र्य नष्ट… कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
 • सर्व कामगार बंधू आणि भगिनींना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

वाचा – Kusumagraj Information In Marathi

नवीन महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा – Latest Maharashtra Din Wishes In Marathi

महाराष्ट्र दिन मेसेज - Maharashtra Day Messages in Marathi

Maharashtra Day Messages In Marathi

महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वजण आपल्या परिचयातील लोकांना Maharashtra Day Wishes In Marathi पाठवतात. त्यासाठी हे महाराष्ट्र दिवस शुभेच्छा नक्कीच उपयुक्त आहेत.

 • महाराष्ट्राची यशोगाथा, महाराष्ट्राची शौर्यगाथा, पवित्र माती लावू कपाळी धरणी मातेच्या चरणी माथा…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
 • आम्हाला  अभिमान आहे महाराष्ट्रीयन असण्याचा, आम्हाला  गर्व आहे मराठी भाषेचा… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
 • मराठा तितुका  मेळवावा… महाराष्ट्र अखंड राखावा…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
 • मराठी माणसाने मनात मनात जपला आहे महाराष्ट्र माझा… जय महाराष्ट्र 
 • महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा
 • माझे राज्य… मराठी माणसाचे राज्य….जय महाराष्ट्र 
 • महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एक घुमतो नाद… महाराष्ट्र आहे मराठी माणसांसाठी खास… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 • महाराष्ट्राच्या मातीसाठी अनेकांनी सांडलं रक्त, त्याच मातीतून निर्माण झालेले मराठी भाषेचे सारे भक्त
 • माझा महाराष्ट्र आणि मी महाराष्ट्राचा, मला आहे अभिमान मी मराठी असण्याचा 
 • जन्मोजन्मी होईन महाराष्ट्रीन, हे मातृभूमी तुझा मी सदैव मान राखीन, महाराष्ट्र दिवस शुभेच्छा
 • मर्द मराठ्यांचा हा मुलुख
  शांतता, आनंद आणि अभिमान असलेल्या
  महाराष्ट्राचा अभिमान आहे मला
  महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 • मी मराठी माझं राज्य मराठी
  महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश
 • एकत्र आलो तर मजबूत
  वेगळे राहिलो तर कमजोर
  एकत्र राहू आणि उंच जाऊ
  जय महाराष्ट्र
 • अभिमानाने भरलेली छाती, सळसळणारं रक्त
  रोमारोमात आहे भगव्या झेंड्याचा स्वाभिमान
  जय शिवाजी जय महाराष्ट्र
  महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
 • महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी प्राणांची आहुती दिलेल्या
  प्रत्येकाला मानाचा मुजरा
  अखंड महाराष्ट्राच्या सर्व जनांना
  महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

१ मे महाराष्ट्र दिन शुभेच्छा मराठी | Maharashtra Din Quotes Marathi

सोशल मीडिया स्टेटससाठी महाराष्ट्र दिन संदेश - Maharashtra Day Status In Marathi

Maharashtra Day Status In Marathi

ADVERTISEMENT

सध्या सोशल मीडियाचा ट्रेंड आहे तेव्हा सोशल मीडियावर स्टेटस अपडेटसाठी हे Maharashtra din quotes in marathi नक्कीच खास आहेत. 

 • महाराष्ट्र चिरायू होवो… महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 • मनोमनी वसला शिवाजी राजा, माझा माझा आहे महाराष्ट्र माझा
 • दगड झालो तर सह्याद्रीचा होईन माती झालो कर महाराष्ट्राची होईन…तलवार झालो तर भवानी मातेची होईन आणि पुन्हा मानव जन्म मिळाला तर मराठीच होईन…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 • महाराष्ट्र ही एक चाल आहे जी सर्वांनी मिळून गुणगुणावी…. जय महाराष्ट्र…
 • जय महाराष्ट्र जय मराठी…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 • राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य असे महान… या राज्याचे आम्ही नित्य गातो गुणगाण
 • महाराष्ट्राची गावी स्तुती दररोज पोटभरून…महाराष्ट्राने ठेवलं आहे आपल्या सर्वांना धरून
 • कृतज्ञता राष्ट्राची, कृतज्ञता इथल्या मातीची…. माझ्या महाराष्ट्राची… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
 • अनंत संकटे सहन करूनही कणखर असे माझे राष्ट्र, टाकावा ओवाळून जीव असा माझा महाराष्ट्र 
 • माझ्या राष्ट्राच्या मातीला सुंगध आहे मराठी माणसांचा, नेहमीच अग्रेसर राहील महाराष्ट्र माझा
 • नतमस्तक झालो ज्या वीरांपुढे
  ज्यांनी रचली शौर्याची गाथा
  जाणता होता आमचा राजा
  अशा महाराष्ट्र देशा
  तुझ्या भूमीला माझं वंदन
  महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 • इतिहास लिहीणं सोपं आहे
  पण आमच्या राजांनी इतिहास घडवला
  महाराष्ट्र घडवला आम्हाला घडवलं
  पवित्र देशा महाराष्ट्र देशा
  महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश
 • माझे कर्म महाराष्ट्र
  माझा धर्म महाराष्ट्र
  महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
 • ढोल ताश्याच्या गजरात व्हावा उत्सव
  उत्सव महाराष्ट्राचा, उत्सव माझ्या माय मराठीचा
  महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 • कपाळी लावूनी केशरी टिळा
  नमन करितो तुला महाराष्ट्र देशा
  जय महाराष्ट्र 

अधिक वाचा –

महाराष्ट्रातील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळे (Historical Places In Maharashtra In Marathi)

महाराष्ट्राची शान आहे महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे (Maharashtra Famous Mandir In Marathi)

ADVERTISEMENT

महाराष्ट्राची शान असलेले महाराष्ट्रातील किल्ले (Forts In Maharashtra In Marathi)

Labour Day Quotes in Hindi

30 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT