ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
marathi-engagement-look-for-bride

साखरपुड्यासाठी विविध ब्रायडल लुक्स | Marathi Engagement Look For Bride

साखरपुडा आणि लग्न हे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील खास दिवस असतात. यादिवशी प्रत्येक मुलीला खास दिसायचं (sakharpuda look in marathi) असतं. केंद्रबिंदू म्हणून वावरायचं असतं. मग अशा दिवसी होणाऱ्या नवरीचा लुकदेखील खास असायला हवा. साखरपुडा ही लग्नाची पहिली पायरी. नवरीला या दिवशी अत्यंत खास दिसायचं असतं. आपल्याकडे साखरपुड्यासाठी (sakharpuda look) आता फक्त पारंपरिक साडीच नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेसल्या जातात. साडी कशी नेसावी अथवा साखरपुड्यासाठी खास वेगळा लुक (marathi engagement look) कसा करावा याचे काही सोपे लुक्स देण्याचा आम्ही या लेखातून प्रयत्न करत आहोत. साखरपुड्यासाठी मराठमोळे (marathi sakharpuda look) असे काही लुक्स.

Marathi Engagement Look 1 – मराठी एंगेजमेंट लुक मल्टीकलर पैठणी

Marathi Engagement Look
Marathi Sakharpuda Look – Instagram

मराठमोळ्या लग्नामध्ये सहसा मराठमोळा लुकच अधिक वापरला जातो. मराठी एंगेजमेंट लुकसाठी पहिला लुक तुम्ही करू शकता तो म्हणजे पैठणी. अर्थात पैठणी (Paithani Saree) म्हटली की, डोळ्यासमोर येते ती अगदी पारंपरिक जर असणारी आणि पदरावर मोर असणारी साडी. मात्र आता साखरपुड्यासाठी वेगवेगळे लुक करताना तुम्ही पैठणीचाही वेगळा लुक करू शकता. 

  • बाजारामध्ये आता मल्टीकलर पैठणी मिळते. अत्यंत गडद रंगाची आणि संपूर्ण साडीवर डिझाईन असणारी ही पैठणी साखरपुड्यासाठी (Marathi Sakharpuda Look) खूपच सुंदर आणि वेगळा पर्याय आहे. नेहमीच्या पैठणीपेक्षा जरा हटके आणि आकर्षक अशी पैठणी तुम्ही मराठमोळ्या एंगेजमेट लुकसाठी (Marathi Engagement Look) नक्कीच वापरू शकता. 
  • याशिवाय या साडीवर तुम्ही खोपा अथवा अंबाडा अशी हेअरस्टाईल करून त्याप्रमाणे गजरे लावल्यास तुमचा लुक अधिक उठावदार दिसतो. 
  • या साडीवर तुम्ही साडीला साजेसे दागिने घाला. ही साडी संपूर्ण भरलेली असल्यामुळे यावर अधिक दागिने चांगले दिसणार नाहीत. त्यामुळे एक चोकर आणि एक लांब हार असे दागिने घालूनही तुम्ही तुमचा लुक पूर्ण करू शकता. 

Navari Look Caption In Marathi

Marathi Engagement Look 2 – मराठी एंगेजमेंट लुक बनारसी साडी

Marathi Engagement Look
Marathi Engagement Look – Instagram

मराठमोळा साखरपुडा (Marathi Sakharpuda Look) असला तरीही बनारसी साड्यांचा पर्यायही तुम्हाला नक्कीच चांगला ठरू शकतो. आजकाल अनेक प्रकारच्या आणि डिझाईन्सच्या बनारसी साड्या आपल्याला बाजारामध्ये दिसून येतात. तुम्हीही बनारसी साडी नेसून साखरपुड्यासाठी सुंदरसा लुक (Marathi Engagement Bride Look) करू शकता. 

ADVERTISEMENT
  • साखरपुड्याला नवरीला नक्कीच सर्वात सुंदर दिसायचे असते. त्यामुळे बनारसी साड्यांमधील गडद रंग आणि त्यावर डिझाईनर ब्लाऊजचा अथवा बनारसी साड्यांसह तुम्ही स्टायलिश डिझाईनर्स ब्लाऊजचा वापर तुम्ही केलात तर तुम्हाला साखरपुड्यासाठी एक वेगळा लुक मिळू शकतो. नेहमीच्या पारंपरिक लुकपेक्षा थोडा वेगळा आणि अधिक आकर्षक लुक तुम्ही करून घेऊ शकता. 
  • यामध्ये शट्टिर बनारसी, कोरा बनारसी, जॉर्जेट बनारसी, जांगला बनारसी,  तनचोई बनारसी, कटवर्क बनारसी आणि बुट्टीदार बनारसी अनेक प्रकार आहेत. तुम्हाला यापैकी कोणत्या प्रकारची बनारसी साडी हवी ते पण तुम्ही पाहून घ्या. 
  • यासह तुम्ही नैसर्गिक मेकअप लुक ठेवला तर तुम्ही साखरपुड्यामध्ये अधिक सुंदर दिसू शकता. 

Marathi Engagement Look 3 – मराठी एंगेजमेंट लुक कांजिवरम साडी

Marathi Sakharpuda Look
Marathi Sakharpuda Look – Instagram

कांजिवरम साडी ही खरं तर साऊथ इंडियन साडी अर्थात दाक्षिणात्य साडी म्हणून ओळखली जाते. पण हल्ली मराठमोळ्या लग्नामध्ये ही साडी अधिक प्रमाणात दिसून येते. याचा रंग आणि याच्या डिझाईन्समुळे हल्ली साखरपुडा आणि लग्नामध्ये कांजिवरम साड्यांचा (Kanjivaram Saree) वापर अधिक दिसून येतो. – कांजिवरम साड्यांनाही आजकाल डिझाईन्समध्ये मराठमोळा टच (Marathi Sakharpuda Look) देण्यात येतो. तर काही साड्या कस्टमाईज करून घेता येतात. 

  • साखरपुड्यासाठी तुम्हाला मराठमोळा लुक हवा असेल तर कांजिरवम साडी हा पर्यायही उत्तम आहे. कांजिवरम साड्यांवर मराठमोळ्या पद्धतीने हेअरस्टाईल करून तुम्ही तुमच्या साखरपुड्याचा लुक (Marathi Engagement Look) करू शकता. 
  • सुंदर, आकर्षक, बोल्ड आणि ग्लॅमरस अशी नवरी आपल्याला विविध ठिकाणी दिसून येते. साखरपुड्यांच्या विधींना सहसा होणारी नवरी ही लाईट मेकअप (Light Makeup) करणे अधिक सोयीस्कर समजते. 
  • तुमचाही लवकरच साखरपुडा होणार असेल आणि आपण अधिक आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही मिक्स लुक ठेवा. 

Marathi Engagement Look 4 – मराठी एंगेजमेंट लुक खादी बनारसी साडी

marathi engagement look
Marathi Engagement Look – Instagram

त्याच त्याच साड्यांचा आणि लुकचा जर तुम्हाला कंटाळा आला असेल आणि तुम्हाला तुमच्या साखरपुड्यासाठी जर वेगळा आणि अधिक आकर्षक लुक हवा असेल तर तुम्ही खादी बनारसी साडीचा (Banarasi Saree) पर्यायदेखील निवडू शकता. 

  • साखरपुड्यासाठी तुम्ही नेहमीच असा रंग निवडा जेणेकरून तुम्ही सर्वांमध्ये अधिक उठावदार दिसाल. यासाठी सध्या एक वेगळा पर्याय उपलब्ध आहे, तो म्हणजे खादी बनारसी साडी. 
  • या साडीचे डिझाईन, याचा लुक मराठमोळ्या साखरपुड्याच्या लुकसाठी उत्तम आहे. थोडा पारंपरिक आणि आधुनिकतेचा मेळ साधत तुम्ही या साडीची निवड आपल्या साखरपुड्यासाठी करू शकता. 
  • या साडीवर तुम्ही मोत्याचे मराठमोळे दागिने घालून साडीची शोभा अधिक वाढवू शकता. या साडीचे वैशिष्ट्य म्हणजे ही साडी सांभाळायला अधिक सोपी आहे. जड नसल्यामुळे नवरीला त्रास होत नाही. 
  • तसंच या साडीवर तुम्हाला डिझाईनर अथवा पारंपरिक असे दोन्ही ब्लाऊज डिझाईन्स शोभून दिसतील. 

प्रत्येक मुलीचे आपल्या साखरपुड्यात कसे दिसावे याचे एक स्वप्न असते. त्यानुसार तुम्हाला हा लुक करून बघायला काहीच हरकत नाही. 

Marathi Engagement Look 5 – मराठी एंगेजमेंट लुक पटोला साडी

sakharpuda look
Marathi Engagement Look – Instagram

साखरपुड्यासाठी लुक करताना पटोला साडी (Patola Saree). तुम्हाला पारंपरिकता आणि आधुनिकतेचे फ्युजन हवे असेल तर तुम्ही पटोला साडीची निवड आपल्या एंगेजमेंट लुकसाठी करू शकता (Marathi Engagement Look). 

ADVERTISEMENT
  • पटोला साडीमध्ये विविध रंग आणि डिझाईन्स उपलब्ध आहेत. 
  • त्याचप्रमाणे साखरपुड्याला त्याच त्याच लुकमध्ये राहण्यापेक्षा काहीतरी वेगळा लुक करायचा असेल तर स्टायलिश ब्लाऊजसह तुम्ही पटोला साडीचा लुक साखरपुड्यासाठी (Marathi Sakharpuda Look) करा. 
  • वरील लुकमध्ये नवरीला साजेसा बॉटल ग्रीन अर्थात गडद हिरवा, डेनिम ब्लू अर्थात निळा, जांभळा असे आकर्षक आणि कोणाचेही लक्ष वेधून घेणारे रंग उपलब्ध आहेत. 
  • तसंच यावर कमीत कमी दागिने परिधान करून आणि मिनिमल मेकअप करून तुम्ही तुमच्या साखरपुड्याचा लुक पूर्ण करू शकता. यासाठी तुम्ही POPxo कलेक्शनमधील मेकअप अथवा MyGlamm.com वरून तुमच्या आवडीचा मेकअप मागवून तुमचा लुक पूर्ण करू शकता. 

Marathi Engagement Look 6 – मराठी एंगेजमेंट लुक डिझाईनर साडी लुक

marathi engagement bride look
Marathi Sakharpuda Look – Instagram

साखरपुड्यासाठी मराठी लुक (Marathi Sakharpuda Look) हवा असेल आणि नेहमीचा पारंपरिक लुक नको असेल तर डिझाईनर साडी लुकदेखील तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही डिझाईनर साडी निवडून त्याचा वेगळा लुक साखरपुड्यासाठी करू शकता. 

  • नेहमीचा पाचवारीचा पदर न काढता तुम्ही पदराला थोडासा ट्विस्ट देत ही साडी नेसा. 
  • तसंच डिझाईनर साडी नेसत असाल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. 
  • डिझाईनर साडी अति जड असू देऊ नका. 
  • डिझाईनर साडीवर अधिक टिकल्या अथवा झगमग असेल अशी साडी निवडू नका. अगदी डोळ्यात भरेल अशी साडी घेणे सहसा टाळा. 
  • या साडीवर तुम्ही जरा गडद मेकअप करा जेणेकरून तुमचा साखरपुड्याचा लुक अधिक खुलून येईल. 
  • तसंच तुमच्या साडीच्या रंगाप्रमाणे तुम्ही दागिन्यांची निवड करा. 

साखरपुडा लुकसाठी खास टिप्स – Tips For Marathi Sakharpuda Looks

साखरपुड्यासाठी लुक (Marathi Sakharpuda Look) ठरवत असताना तुम्हाला काही टिप्स जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे तुम्ही तुमचा लुक परिपूर्ण करू शकता

  • तुम्ही तुमच्या साखरपुड्यासाठी योग्य लुकचा विचार करत असाल तर आणि साखरपुड्याचे विधी जर संध्याकाळच्या वेळी असतील तर त्यासाठी स्मोकी आईज आणि पीच न्यूड लिपस्टिक लुक परफेक्ट आहे 
  • मस्काऱ्याचा वापर करताना तुम्ही पापण्या कर्ल करायला विसरू नका. कर्लिंग टूलचा वापर तुम्ही करू नका आणि मस्काऱ्याचा एकच कोट लावा
  • आपल्या चेहऱ्यावर मिनिमल मेकअप ठेवा आणि चकचकीत ब्लश अजिबात वापरू नका
  • ओठांच्या मेकअपसाठी तुम्ही गडद अथवा लाऊड लिपस्टिक शेड्सचा अथवा ब्राऊन लिपस्टिकचा वापर करू शकता. तुम्हाला न्यूड रंगाच्या लिपस्टिकचा वापर करायचा असेल तर तुम्ही बेबी पिंक अथवा लिप बामचा वापर करावा
  • लग्न असो वा साखरपुडा कोणत्याही कार्यक्रमामध्ये ग्लिटरी आईज हा सध्याचा ट्रेंड आहे. तुम्हाला जर साखरपुड्याला गुलाबी अथवा फिरोजी असा लाल रंगाचे कपडे घालायचे असतील तर तुम्ही आयमेकअप म्हणून हिरव्या ग्लिटरी आयशॅडोचा वापर करा
  • जर सोन्याचे दागिने घालण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्या डोळ्यांवरदेखील गोल्डन गिल्टरी आयशॅडो लावण्याची कल्पना उत्तम आहे
  • साखरपुड्यासाठी लुक करताना आम्ही ज्या साड्या तुम्हाला सांगितल्या आहेत याशिवाय तुम्ही कांचिपुरम साडी, उपाडा सिल्क साडी, खण साडी, नारायण पेठ साडी यांचाही वापर करू शकता
  • दागिन्यांचा तुम्ही साखरपुड्यासाठी विचार करताना अति दागिने घालू नका. तुम्ही कोणती साडी नेसणार आहात, त्यानुसार गळ्यातील हार आणि कानातले ठरवा 
  • सोन्याचे दागिने आहेत म्हणून भरभरून घालू नका. याऐवजी तुम्ही मोत्याचे दागिने अथवा इमिटेशन दागिन्यांचा वापर अधिक करा आणि मिनिमल ठेवता येईल तितका प्रयत्न करा
  • हेअरस्टाईल करताना तुमच्या चेहऱ्यानुसार तुम्ही हेअरस्टाईलिस्टकडून टिप्स घ्या आणि त्यानुसार हेअरस्टाईल करा. भारंभार अशी हेअरस्टाईल न करता सहज आणि सोपी असेल आणि अधिक वेळ लागणार नाही अशी हेअरस्टाईल तुम्ही साखरपुड्यासाठी निवडा 

प्रश्नोत्तरे (FAQs) 

प्रश्न 1 – मराठमोळ्या साखरपुड्याच्या लुकसाठी लेहंगा हा पर्याय चांगला आहे का?
उत्तर – लेहंगा हा पर्याय नक्कीच चांगला आहे. पण हा मराठमोळा पर्याय नाही. पण तुम्ही त्याला मराठमोळा लुक नक्कीच देऊ शकता. हेअरस्टाईल आणि मेकअपच्या सहाय्याने आणि लेहंग्याचा दुपट्टा मराठमोळ्या पद्धतीने घेऊन तुम्ही साखरपुड्यासाठी याचा वापर करू शकता 

प्रश्न 2 – साखरपुड्यासाठी कोणत्या पद्धतीचा मेकअप चांगला दिसतो?
उत्तर – तुमच्या साडीचा रंग कोणता आहे आणि त्यावरील दागिने तुम्ही कोणत्या पद्धतीचे घालणार आहात यानुसार तुमच्या चेहऱ्यावर मेकअप गडद हवा की मिनिमल मेकअप हवा ते ठरते. तसंच तुमच्या चेहऱ्याच्या टोनवरूनही तुमच्या साखरपुड्याचा मेकअप कसा हवा हे ठरवता येते. 

ADVERTISEMENT

प्रश्न 3 – साखरपुड्याच्या लुकसाठी ट्रायल करायची गरज आहे का?
उत्तर – हो तुमच्या कोणत्याही कार्यक्रमासाठी तुम्हाला कपड्यांची ट्रायल करायलाच हवी. साखरपुड्यात तुमच्याकडे सर्वात अधिक लक्ष असते. त्यामुळे तुम्हाला कपड्यांमध्ये व्यवस्थित फिटिंग आणि हेअरस्टाईल अथवा मेकअप व्यवस्थित असायला हवा. त्यामुळे या तिन्हीची ट्रायल नक्की तुम्ही आधी करून घ्या. 

16 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT