ADVERTISEMENT
home / मनोरंजन
mermaid-in-m-town-reena-madhukars-underwater-photoshoot

Mermaid In M-Town! रीना मधुकरने केलेलं हे अंडरवॉटर फोटोशूट पाहाच…

कलाकार त्यांची कला ही वेगवेगळ्या माध्यमांतून दाखवत असतात, नवनवे प्रयोग करत असतात, कधी अभिनयात तर कधी त्यांच्या कामाच्या बाबतीत. असाच एक भन्नाट प्रयोग आणि कम्मालss ऍक्टिव्हिटी अभिनेत्री रीना मधुकरने केली आहे आणि ती म्हणजे रीनाने नुकतेच अंडरवॉटर फोटोशूट केले आहे. रीनाने पाण्याखाली जाऊन जे फोटोशूट केले त्याचे विशेष कौतुक तिच्या चाहत्यांकडून, सिनेसृष्टीतील कलाकारांकडून होतंय. रीनाच्या या WOW फोटोशूटमुळे ब-याच जणांनी तिची ‘मराठी सिनेसृष्टीतील जलपरी’ म्हणून देखील प्रशंसा केली.

अंडरवॉटर शूटची कमाल

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी अंडरवॉटर फोटोशूट केले आहे, पण मराठीत अंडरवॉटर फॅशन (Underwater Fashion Photography) फोटोग्राफी करणारी रीना ही पहिली मराठी अभिनेत्री आहे. पाण्याच्या खाली जाऊन फोटोसाठी पोज् देणे, चेह-यावरील हावभाव अगदी अचूक दाखवणे ही खरोखर एक कला आहे आणि रीनाने (Reena Madhukar) या सगळ्या गोष्टी अगदी परफेक्ट केल्या आहेत. या प्रकारच्या फोटोशूटमध्ये कपडे, मेकअप याला पण विशेष महत्त्व असते. रीनाची स्टायलिस्ट निकेता बांदेकर, मेकअप आर्टिस्ट निखिल पवार यांनी पण पाण्याखाली कोणत्या प्रकारचं फॅब्रिक जास्त रेखीव दिसेल, पाण्यातही ग्लो दिसेल असा मेकअप आदी गोष्टींचा विचार करुन त्यांनी त्यांची कलाकारी दाखवली. हे सर्वकाही जुळून आलं की खरी कसरत सुरु होते ती फोटोग्राफरची. कॅमेराचे सेट पाण्याखाली घेऊन जाणे, जसा हवा अगदी तसाच शॉट मिळवणे ही सगळी कला फोटोग्राफरची.

अधिक वाचा – मीरा जगन्नाथ, जय दुधाणे बिग बॉसनंतर पहिल्यांदाच एकत्र

रीनाने शेअर केला अनुभव

या कमाल फोटोशूटचा कमाल अनुभव रीनाने शेअर केला, “पाण्याच्या खाली जाऊन चेहऱ्यावर भाव आणणं, डोळे उघडे ठेवून कॅमेरा फेस करणं हे खूप ट्रिकी होतं. मला आणि फोटोग्राफर सुमीत, आम्हा दोघांनाही अशा प्रकारच्या फोटोशूटचा अनुभव नसल्यामुळे कसं होईल, काय होईल याची भिती होती पण काही तरी साहसी गोष्ट करतोय म्हणून उत्साह जास्त होता. मुळात, थंडी इतकी होती की काय सांगू. पण माझी टीम निकेता, निखिल, सुमीत, नवीन, दिपेश, हर्षल हे सर्वजण यांचा सर्वांचा मला पाठिंबा होता, त्यांनी मला संपूर्ण फोटोशूटच्या दरम्यान चिअर अप केलं. हे फोटोशूट एक टीम वर्क होतं. मला हे फोटोशूट करताना खूपच मजा आली” रीनाने आपला अनुभव सांगताना आपला आनंदही व्यक्त केला.

ADVERTISEMENT

अधिक वाचा – सुनिल ग्रोव्हरच्या उपचारांसाठी सलमान खानचा मदतीचा हात

फोटोग्राफीचा अनुभव

फोटोग्राफर सुमीत गुरवने (Sumit Gurav) त्याचा अनुभव सांगताना म्हटले की, “हा खूप वेगळा आणि छान अनुभव होता. फोटोशूट जेवढं इंटरेस्टिंग होतं तितकंच ते चॅलेंजिंग ही होतं. याआधी कधी असं अंडरवॉटर फोटोशूट मी केलं नव्हतं. त्यामुळे खरंतर हे शूट करताना आधी थोडं टेन्शन होतं तितकाच उत्साहदेखील होता.  शूट करताना पाण्याखाली जाऊन परफेक्ट टाईम वर क्लिक करणं तेवढा वेळ बॉडी पाण्याखाली स्थिर ठेवणं हे खूप कठीण आहे. पण आम्ही ते उत्साहाने, आनंदाने आणि समाधानाने पूर्ण केलं याचा आनंद आहे.”

‘Team Work Makes Dream Work’ चं उत्तम उदाहरण म्हणजे रीनाचं अंडरवॉटर फॅशन फोटोशूट!

अधिक वाचा – “माझं नाव त्यांनीच ठेवलं होतं “-अभिनेता नील नितीन मुकेशने शेअर केली लतादीदींची आठवण

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

07 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT