ADVERTISEMENT
home / Love
#Mystory: लग्नाआधीच त्याच्याबद्दल कळलं म्हणून बरं झालं

#Mystory: लग्नाआधीच त्याच्याबद्दल कळलं म्हणून बरं झालं

लग्नासाठी स्थळं पाहताना अनेक जण काही विवाहमंडळात मुला- मुलींचे नाव नोंदवतात. आता तर काही जण इतकी अॅडव्हान्स झाली आहेत की, ते थेट ऑनलाईन संकेतस्थळावरुन लग्न जुळवण्याचे काम करतात. हा पर्याय फारच सोपा आणि झटपट होणारा असतो. पण ऑनलाईन संकेतस्थळावर भेटलेल्या अमोघबद्दल नयनाला अशी काय गोष्ट कळली की, तिच्या पाया खालची जमीन सरकून गेली. अगदी थोडक्यात ती त्या नात्यातून बचावली जाणून घेऊया तिची #Mystory

#MyStory: ऑनलाईन झाली फ्रेंडशिप, प्रेमात पडले पण पुढे काय

shutterstock

ADVERTISEMENT

नयनाला लग्नासाठी स्थळं पाहण्याचे काम सुरु होते. पण मनासारखा जोडीदार तिला मिळत नव्हता. तिच्या अपेक्षा फार नसल्यातरी तिला तिची जबाबदारी अगदी लिलया हाताळू शकेल असा मुलगा नवरा म्हणून हवा होता. तिला योग्य स्थळ मिळावं यासाठी तिचे विवाहमंडळात नाव नोंदवण्यात आले. शिवाय काही संकेतस्थळांवरही तिने तिचे नाव नोंदवले होते. तिला चांगला नवरा अगदी हमखास मिळेल अशी अपेक्षा सगळ्यांनाच होती.घरातल्यांचा उत्तम जावई शोधण्याचा शोध सुरुच होता. असाच शोध सुरु असताना तिच्या आयुष्यात अमोघ आला. घरातल्यांना एका विवाह संकेतस्थळावरुन अमोघची प्रोफाईल आवडली. दिसायला देखणा, कमावता आणि नयनाच्या अपेक्षांना खरे उतरणारा असा अमोघ होता. त्यामुळे त्यांनी लगेचच अमोघ आणि नयनाची ओळख करुन द्यायचे ठरवले. 

नयनालाही घरातल्यांच्या निवडीवर विश्वास होता. म्हणून तिने अमोघला भेटण्यासाठी होकार दिला. एके दिवशी ऑफिसनंतर या दोघांनी एका कॅफेमध्ये भेटायचे ठरवले. घरातल्यांनीच सगळ्या गोष्टी ठरवल्या अगदी कॅफेपासून ते मेन्यूपर्यंत. एकदाचे अमोघ आणि नयना एकमेकांना भेटले. त्याला भेटून नयना घरी कधी येते असे झाले होते. घरातले नयनाची वाट पाहत होते. नयना घरी परतली ते हसत. तिच्या डोळ्यातच अमोघ तिला पसंत आहे हे घरातल्यांना कळले होते. पण नयनाला त्याच्यासोबत जास्त वेळ घालवायचा होता. त्याला लग्नाआधी जाणून घ्यायचे होते.  घरातल्यांनाही तशी घाई नव्हती. मुलीचे चांगले व्हावेच असे वाटत होते. म्हणून त्यांनीही होकार दिला. 

shutterstock

ADVERTISEMENT

दर आठवड्याला अमोघ आणि नयना भेटत होते. ते एकमेकांच्या जवळ येत होते. एकमेकांबद्दल जाणून घ्यायला त्यांनी सुरुवात केली होती. अमोघ दिसायला सुंदर होताच. पण तितकाच समजूतदार होता. इतका चांगला असून त्याचे लग्न झाले का नाही असा प्रश्न नयनाने त्याला अनेकदा विचारला. पण प्रत्येकवेळी तो ‘नयनासारख्या मुलीसाठी थांबला होता.’ असेच काही उत्तर तो देत होता. त्याचा तो मिश्कीलपणा नयनाला आवडला होता. नयनाच्या घरातल्यांशीही तो फार चांगला होता. त्यामुळेच आता या भेटीचे रुपांतर लग्नात करावे असे घरातल्यांना वाटत होते. त्यामुळेच त्यांनी अमोघच्या पालकांना लग्न ठरवण्यासाठी घरी बोलावण्याचे ठरवले. त्यानुसार अमोघचे पालक घरी आले. नयनाच्या घरातल्यांशी त्यांनी इतके जुळवून घेतले की, घरातल्यांनीही लगेचच लग्नाची तयारी सुरु केली. त्यांना लग्नाचा थाट नको होता. अगदी शांतपणे लग्न करायचे होते. त्याला नयनाच्या घरातल्यांचा विरोध होता. पण शेवटी त्यावरही दोन्ही कुटुंबांनी तोडगा काढला आणि त्यांच्या लग्नाची तारीख ठरवली. 

#MyStory: PG मध्ये राहून बॉयफ्रेंड असणं म्हणजे…

shutterstock

ADVERTISEMENT

नयना आनंदी होती. इतके दिवस सगळ्यांपासून लपवून ठेवलेली लग्नाची गोष्ट तिला सांगायची होती. अमोघची ओळख आपल्या मित्रांना करुन द्यायची होती. तिने ही गोष्ट अमोघला सांगितली. अमोघ हो नाही म्हणता म्हणता तयार झाला. नयनाच्या मित्रांना भेटण्याची वेळ ठरली. एका कॅफेमध्येच ती त्याची भेट घडवणार होती. कॅफेमध्ये तिच्या मित्रांनी अमोघला पाहिल्यानंतर लगेचच पसंती दिली. त्यांची छान भट्टी जमली. नयनाला आणखी आनंद झाला. आयुष्यात तिला आता अजून काहीच नको होते. 

कॅफेमध्ये अचानक एक महिला आली आणि तिने अमोलला हाक मारली.अमोघच्या चेहऱ्यावरचे भावच बदलून गेले. त्याच्या चेहऱ्यावरचे बदलले भाव नयनाने पाहिले. त्यावेळी ती काही बोलली नाही. पण काही दिवसांनी जेव्हा ती पुन्हा त्या कॅफेमध्ये गेली त्यावेळी ती महिला नयनाला पुन्हा दिसली. अमोघ कामानिमित्त बाहेर गेल्यामुळे त्याच्याशी  नयनाचा सतत संपर्क होत नव्हता. शिवाय घरी लग्नाची तयारी सुरु होती. त्यामुळे तिने अमोघला काहीच कळवले नाही. ज्यावेळी ती त्या महिलेशी बोलायला गेली. त्यावेळी ती काहीही न बोलता तिथून निघून गेला. आता मात्र नयनाला काहीतरी आहे असा संशय आला. तिने त्या महिलेला थांबवले तिला विचारले नक्की काय प्रॉब्लेम आहे… त्यावर ती महिला जे म्हणाली ते ऐकून नयनाला रडू कोसळले. ती महिला अमोघची लग्नाची बायको होती. तिच्याकडून पैसे घेऊन अमोघने तिला सोडून दिले होते. अमोघचे यावेळी अनेकदा लग्न झाले होते. त्याने सगळ्या महिलांकडून पैसे घेऊन त्यांना सोडून दिले होते. आधी नयनाला या गोष्टीवर विश्वास झाला नाही. पण ज्यावेळी त्या महिलेने काही पुरावे सादर केले त्यानंतर मात्र तिला सगळे कळून चुकले. 

तिने कोणालाही काहीही न कळवता घरी जायचे ठरवले. घरी जाऊन तिने सगळ्यांना हे सांगितले त्यांनाही धक्का बसला. त्यांना लगेचच अमोघची चौकशी करायचे ठरवले. अमोघच्या चांगलेपणाला भुलून त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होती. पण मनात शंकात आल्यानंतर त्याची चौकशी करण्याचे ठरवले. त्या चौकशीत अमोघ दोषी असल्याचे कळले. अमोघचे लग्न झाले होते. पण त्याने वेबसाईटवर खोटी माहिती टाकली होती. नयनाप्रमाणेच त्यांनी इतर मुलींनाही फसवले होते. नयनाच्या घरातल्यांनी आणि नयनाने खचून न जाता अमोघला धडा शिकवायचे ठरवले. त्यांनी पोलिसात तक्रार नोंदवली. तो कामावरुन जसा देशात परतला त्याच क्षणी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यासोबत त्याच्या आई-वडिलांनाही शिक्षा करण्यात आली. 

त्यानंतर ऑनलाईन वेबसाईटवरुन लग्न जुळवण्याचा नयनाने परत कधीही प्रयत्न केला नाही.

ADVERTISEMENT

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

09 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT