ADVERTISEMENT
home / मनोरंजन
पूनम पांडेने केली तक्रार

पूनम पांडे पुन्हा चर्चेत, पतीविरोधात केली तक्रार

कायम चर्चेत राहायला आवडणाऱ्या काही सेलिब्रिटींची यादीच आता खूप जणांकडे असेल त्यापैकीच एक नाव म्हणजे पूनम पांडे. पुनम पांडे इंडस्ट्रीमध्ये आल्यापासून तिच्या वादग्रस्त विधानांमुळे आणि तिने केलेल्या चॅलेंजेसमुळे चर्चेत आहे. सॅम बॉम्बेशी लग्न झाल्यानंतरही तिने यात खंड पडू दिला नाही. तिने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पतीविरोधात तक्रार केली आणि आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. यावेळी पुन्हा एकदा तिने पतीविरोधात तक्रार केली असून त्यामुळे सॅमला अटक झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जाणून घेऊया हे प्रकरण नेमकं आहे तरी काय?

Bigg Boss 15: शमिता शेट्टीला मिळतोय का अधिक फायदा, इतर स्पर्धकांवर होतोय अन्याय

पतीने केली मारहाण

मुंबई पोलिसांनी आणि काही खासगी संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी संध्याकाळी सॅम बॉम्बेला अटक करण्यात आली आहे. पूनमने पतीविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली होती.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूनमच्या डोळ्याला, डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर अशी दुखापत झाली होती. पोलिसांनी त्या आधारावरुन सॅमला अटक केले आहे. पण त्यांच्यामध्ये हे भांडण कशावरुन झाले याचा तपास अद्याप सुरु आहे. भारतीय दंडसंहितेच्या अंतर्गत सॅमवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नानंतरही केली होती तक्रार

पूनम पांडेने 2020 च्या सप्टेंबर महिन्यात सॅमशी लग्न केले होेते. अत्यंत रोमँटिक फोटो शेअर करत त्यांनी त्यांच्या लग्नाची बातमी दिली होती. तिचे असे अचानक लग्न अनेकांना धक्का देणारे होते. तिने लग्न केल्यानंतर अवघ्या काहीच दिवसात सॅम विरोधात तक्रार केली होती. सॅमने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, तिला मारहाण केली अशा स्वरुपाची तिची तक्रार होती. त्यामुळे सॅमला गोवा पोलिसांनी अटक केली होती. पण त्यानंतर पूनमने तक्रार मागे घेतली आणि ते पुन्हा एकत्र राहू लागले. पण आता साधारण एक वर्षानंतर अशी तक्रार पुन्हा आल्यामुळे आणि पूनमला मारहाण झाल्यामुळे नक्की दोषी कोण? असा प्रश्न पडला आहे. 

ADVERTISEMENT

बरीच वर्ष होते लिव्ह-इनमध्ये

 पूनम पांडे आणि सॅम बॉम्बे हे गेली बरीच वर्षे लिव्ह-इनमध्ये राहात होते. पूनम पांडे काही न्यूड आणि प्रायव्हेट व्हिडिओ करते ज्याचे शूटिंग सॅम करतो. त्यामुळे सॅम आणि पूनम एकत्र काम करतात. त्यांच्यामध्ये आधीपासूनन प्रेमाचे नाते होते. ते अनेक वर्ष एकमेकांना ओळखत आहेत. ते लिव्ह- इनमध्येही राहात होते. पण अचानक 2020 मध्ये त्यांनी लग्न केले आणि सगळ्यांना धक्का बसला. त्यानंतर त्यांच्यामध्ये झालेले प्रत्येक वाद हे असेच समोर आलेले आहेत. 

पूनम पांडेच्या पतीला झाली गोव्यात अटक, शोषणाचा आरोप

सोशल मीडियावर सगळे काही आलबेल

सेलिब्रिटींचे असे काही झाले की सगळे जण त्यांचा सोशल मीडिया चेक करायला अजिबात विसरत नाही. पूनम आणि सॅमच्या इन्स्टाग्रामवर कायम काहीना काही अश्लील व्हिडिओ असतात. पण त्यांचे काही चांगले व्हिडिओजही पाहायला मिळतात. ज्यामध्ये त्याचे खास नातेही दिसून येते. पण असे असले तरी एकूणच त्यांच्या व्हिडिओमध्ये अनेकदा अश्लीलताच दिसून येते.

आता पूनम पांडेच्या या नव्या तक्रारीनंतर काय होईल. सॅम बॉम्बेची सुटका होईल की नाही ते पाहावे लागेल.

ADVERTISEMENT

Bigg Boss Marathi : तृप्ती देसाई पडल्या घराबाहेर, जय सुरक्षित

09 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT