ADVERTISEMENT
home / मनोरंजन
सुझान खानने प्रियांकाला दिल्या शुभेच्छा ‘देसी गर्ल’ ठरतेय तिच्यासाठी प्रेरणा

सुझान खानने प्रियांकाला दिल्या शुभेच्छा ‘देसी गर्ल’ ठरतेय तिच्यासाठी प्रेरणा

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने आज बॉलीवूडप्रमाणेच हॉलीवूडमध्येही स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मात्र एवढंच नाही प्रियांकाने य प्रवासात एक महत्वाचा आणि यशस्वी टप्पा गाठला आहे. ज्यामुळे तिच्यावर सर्व चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्रियांकाने इंन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यासाठी बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता ह्रतिक रोशनची पत्नी सुझान खान हीने तर सोशल मीडियावर प्रियंकाला स्वतःचे प्रेरणास्थान असं म्हटलं आहे. यासाठी जाणून घ्या प्रियांकाने असं नेमकं काय केलं आहे. 

प्रियांकाने असं काय केलं ज्यासाठी मिळत आहेत शुभेच्छा

शुभेच्छा या वर्षावामागचं कारण असं की, बॉलीवूडच्या या देसीगर्लने मनोरंजन विश्वात तब्बल वीस वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे.प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया पोस्टवर तिचा हा वीस वर्षांचा प्रवास दर्शवणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यासोबतच तिने शेअर केलं आहे की, “मनोरंजन विश्वातील माझी वीस वर्ष”  करिअरच्या सुरूवातीपासून आतापर्यंतचा हा प्रवास मांडणाऱ्या प्रॉडक्शन कंपनी @ozzyproduction चे तिने धन्यवाद व्यक्त केले आहेत. शिवाय तिने असंही लिहीलं आहे की, कधीतरी तुम्हा सर्वांना नक्कीच भेटेन आणि या दिवसाचा उत्साह साजरा करेन. या तिच्या पोस्टवर अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सुझान खानने यासाठी तिला ‘इन्स्टिट्युशन ऑफ ग्रेस आणि परसिव्हयरन्स’ असं म्हटलं आहे. शिवाय तिने तिच्यासाठी प्रियांका एक प्रेरणा असून पुढील प्रवासासाठी तिच्यावर ईश्वराची कृपा सतत बरसत राहो असं म्हटलं आहे. सुझान प्रमाणेच अभिनेत्री लारा दत्ता, सोनाली बेंद्रे, भूमी पेडणेकर, करिष्मा तन्ना अशा अनेक कलाकारांनी प्रियांकाला याबाबत शुभेच्छा दिलेल्या आहेत. विशेष म्हणजे 2000 साली अभिनेत्री लारा दत्ता मिस युनिव्हर्स झाली होती तर प्रियांका चोप्रा मिस वर्ल्ड झाली होती. त्यामुळे तिच्या शुभेच्छाही प्रियांकासाठी खास आहेत. या व्हिडिओमध्ये प्रियांकाच्या केवळ मॉडलिंग, अभिनयावर प्रकाश टाकलेला नसून तिची सामाजिक कार्याची एक अनोखी बाजूही यातून जगासमोर दाखवण्यात आली आहे. 

प्रियांका आणि निक ची लव्हस्टोरी

प्रियांकाने बॉलीवूडप्रमाणेच हॉलीवूडमध्ये स्वतःची हटके ओळख निर्माण केली आहे. एवढंच नाही तर प्रियांका आता हॉलीवूडमध्ये तिच्या सुखी संसारातही नक्कीच गुंतली आहे. 2018 साली डिसेंबरमध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला होता. प्रियांका आणि निकचा चाहतावर्ग फार मोठा आहे. ज्यामुळे प्रियांका आणि निक सध्या बॉडीवूडप्रमाणेच हॉलीवूडचं एक हॉट कपल आहे. या दोघांच्या फोटो आणि मॅरीड लाईफची सोशल मीडियावर सतत चर्चा सुरू असते. प्रियांका निकपेक्षा मोठी आहे तरी त्यांच्या वैवाहिक जीवनावर याचा कोणताच परिणाम झालेला नाही. प्रियांका आणि निकच्या लव्हस्टोरीबद्दल जाणून घ्यायला चाहत्यांना नेहमीच आवडतं. प्रियांका आणि निक त्यांच्या वैवाहिक जीवनात फार खुश आहेत. लग्नानंतर सोशल मीडियावर ते त्यांचे फोटो आणि हॅपी मुव्हमेंट्स शेअर करत असतात. आता तर प्रियांकाच्या आयुष्यात आणखी आनंदाचे क्षण आलेले आहेत. मनोरंजन विश्वात यशस्वीपणे तिने वीस वर्ष पूर्ण केली आहेत. ज्यामुळे तिच्या आणि निकच्या आनंदात भरच पडली असेल. 

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

नेपोटिझम करु पाहणाऱ्याला मनसे देणार दणका, कलाकारांना मनसेचा दिलासा

अभिनेत्री अमृता रावचा गणेशोत्सवाबाबत ‘हा’ सल्ला पर्यावरणासाठी आहे मोलाचा

या साऊथ सुपरस्टारला जीवे मारण्याची धमकी

ADVERTISEMENT
05 Jul 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT