ADVERTISEMENT
home / मनोरंजन
पुष्माची क्रेझ महाराष्ट्रात

साऊथच्या ‘पुष्पा’चा महाराष्ट्रात धुमाकूळ

‘ यन्ना रास्कला माईंड इट’  हा एक साऊथचा डायलॉग सगळ्यांना माहीत आहे. पण साऊथ म्हणजे एकच भाषा नाही. त्यात तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम अशा काही भाषांचा समावेश होतो. त्यामुळे अर्थात साऊथची इंडस्ट्री ही आपल्या तुलनेत खूपच मोठी आहे. हल्ली हिंदी भाषेत हे सगळे चित्रपट डब होत असल्यामुळे या चित्रपटांची आवड जगभरातील अनेकांना आहे. नुकताच पुष्पा नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अल्लू अर्जन स्टारर असलेला हा चित्रपट सध्या सगळीकडे धुमाकूळ घालत आहे.

अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’वर ओमिक्रॉनचं संकट, या महिन्यात नाही होणार प्रदर्शित

मै झुकुंगा नही

अल्लू अर्जुनची क्रेझ तरुणींमध्ये प्रचंड आहे. उत्तम डान्सर आणि अभिनेता अशी ओळख असलेला या अभिनेत्याचा या चित्रपटातील लुक हा खूपच वेगळा आहे. यामध्ये तो वाकडा चालणारा, केस वाढलेला, जंगलात राहून आणि गरिबीत वाढल्यामुळे त्याचा असलेला तो लुक फारच वेगळा दिसला. पण हिरो शेवटी हिरोच असतो. अल्लू अर्जुन या लुकमध्येही तितकाच माचो मॅन दिसत आहे. मै झुकुंगा नही हा त्याचा डायलॉग आता इतका हिट झाला आहे की, अनेकांनी त्यावर मीम्स देखील तयार केले आहेत. सध्या सगळीकडील चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाची क्रेझ आहे. 

 श्रेयसने दिला आवाज

पुष्पा हा साऊथचा मोठा चित्रपट असून तो वेगवेगळ्या भाषांमध्ये डब करण्यात आला आहे. हिंदीसाठी मराठमोळ्या श्रेयसने याचा आवाज दिला आहे. संपूर्ण चित्रपटात अल्लू अर्जुनच्या ओठी श्रेयस आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. इतकेच नाही तर काहीच दिवसांपूर्वी श्रेयसने या मागे लागणारी मेहनत त्याचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. जो अनेकांना आवडला होता. त्यामुळे खास श्रेयसचा आवाज ऐकण्यासाठीही अनेकांनी हा चित्रपट पाहिला आहे. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात तब्बल 45 कोटींची कमाई केली.

ADVERTISEMENT

रक्त चंदनाची अशी तस्करी

देशात अनेक गोष्टींची तस्करी होताना तुम्ही वाचली आणि ऐकली असेल. त्यापैकीच एक म्हणजे रक्त चंदन. याची किंमत बाजारात खूप आहे याची तस्करी करणारा अल्लू अर्जून लोकांचा राजा कसा काय होतो? हे सांगणारी ही कथा आहे. चुकीच्या कामातही चांगलं शोधून गरिबांसाठी काम करणारा हा पुष्पा आपलं काम कसं नेटाने करतो हे पाहणे मोठ्या स्क्रिनवर एकदम मस्त वाटते. आता साऊथचा सिनेमा कधी भांडणांशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे अगदी पहिल्यापासूनच तुम्हाला रक्ताचा थरार पाहायला मिळतो. काही जणांना हा चित्रपट केवळ भांडणांमुळे आवडणार नाही. पण तोच याचा युएसबी आहे असे म्हणायला हवे. 

येणार दुसरा पार्ट

 हा चित्रपट क्लायमॅक्सकडे येऊन थांबतो आणि जीव भांड्यात पडतो. कारण या भागात केवळ याची सुरुवात कशी झाले हे कळले आहे. पण आता याचा शेवट कसा होईल हे येणारा दुसरा भाग सांगणार आहे. त्यामुळे त्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. मेकर्स लवकरच याचा दुसरा भाग आणतील. 

तुम्ही अजून हा चित्रपट पाहिला नसेल तर नक्की बघा.

स्वप्नील जोशी दिसणार नव्या भूमिकेत, ‘अश्वत्थ’ चित्रपटाची घोषणा

ADVERTISEMENT
06 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT