होलिकेचे दहन करुन ‘होळी’ हा सण साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण म्हणजे ‘रंगपंचमी’. यालाच धुळवड असे देखील म्हणतात. या दिवशी रंगाची उधळण केली जाते. देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो. रंगपंचमी सणाची माहिती आणि साजरा करण्यामागे अनेक कारणं सांगितली जातात. त्यापैकीच एक म्हणजे वातावरणातील बदल. साधारण मार्च महिना सुरु झाला की, अंगाची लाहीलाही व्हायला सुरुवात होते. याशिवाय वातावरण बदलाचे स्वागत करण्यासाठी आणि येणाऱ्या नव्या पालवीसोबत आनंद व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो असे म्हणतात. होळी आणि रंगपंचमी या दिवसाला आपआपले महत्व आहे. रंगपंचमीचा हा सण अधिक चांगल्या पद्धतीने साजरा करण्यासाठी आम्ही रंगपंचमीच्या शुभेच्छा संदेश, रंगपंचमी कोट्स (Rang Panchami Quotes In Marathi), रंगपंचमी एसएमएस (rang panchami sms in marathi), रंगपंचमी स्टेटस (rangpanchami status in marathi), रंगपंचमी मेसेज (rang panchami messages in marathi) यांची एक यादी केली आहे. या रंगपंचमी शुभेच्छा (Happy Rangpanchami In Marathi) आप्तेष्टांना पाठवून तुम्हाला हा दिवस साजरा करता येईल.
रंगपंचमी कोट्स मराठी – Rang Panchami Quotes In Marathi
- रंगात रंगूनी जाऊया, सण रंगपंचमीचा आज साजरा करुया…Happy Rang Panchami 2021
- रंगपंचमीचे रंग जणू, एकमेकांच्या रंगात रंगतात
असूनही रंग वेगळे, रंगाचे महत्व अधोरेखित करतात - रंग रंगपंचमीचा, आनंदभऱ्या नव्या उत्सवाचा.. आला सण रंगाचा
- रंग नात्याचा, रंग आनंदाचा
आला रंगाचा सण
साजरा करुया सण रंगपंचमीचा…Happy Rang Panchami 2021 - प्रेमाचा रंग उधळू दे, आयुष्यामध्ये रंग येऊ दे
रंग आणो तुमच्या जीवनात आनंदाची लहर
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! - एक रंग मैत्रीचा
एक रंग आनंदाचा
सण आला उत्सवाचा
साजरा करुया चला सण रंगाचा
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! - सण रंगाचा घेऊन आला आनंद,
चला साजपा करुया हा आनंदोत्सव - रंगात रंगूनी साजरी करुया धुळवड..
आज आनंदाला नाही उरला पारावर…Happy Rang Panchami 2021 - सण आला रंगाचा, प्रेमाचा आणि हर्षाचा.. रंगपंचमीच्या शुभेच्छा
- लाल, हिरवा, पिवळा, निळा..आला सण हा रंगाचा
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
बुरा न मानो, होली है! होळीच्या शुभेच्छा संदेश
रगपंचमी मेसेज मराठी – Rang Panchami SMS In Marathi
- वेगवेगळे रंग घेऊन येऊ दे तुमच्या आयुष्यात रंगपंचमी आनंद.. रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
- रंगाची उधळण घेऊन आली रंगपंचमी… साजरा करुया सण एकमेकांंसंगे
- लाल, हिरवा, निळा रंग आणला तुझ्यासाठी रंगवून साजरी करुया यंदाची रंगपंचमी
- रंग हा गुलालाचा लावला तुझ्या गाली, आला आनंद हा माझ्या दारी
- बेरंग दुनियेत येऊ देत रंग.. चला साजरा करुया रंगाचा सण रंगपंचमी
- आठवण रंगाची करुन देईल तुला आनंदाची आठवण… चला करुया रंगाची उधळण
- रंगात रंगून रंगले मी… तुझ्या आनंदात भिजले मी.. रंगपंचमीच्या शुभेच्छा!
- आनंद हा मला झाला.. रंगाचा सण रंगपंचमी आला
- रंगात रंगले माझे हात… गाली तुझ्या लावून उमगली मला प्रेमाची वाट, रंगपंचमीच्या शुभेच्छा!
- रंग झाले ओले, त्याला चढली प्रेमाची लाली… चल साजरी करुया यंदाची होळी
आपल्या राशीनुसार कोणत्या रंगाने होळी खेळायला हवी जाणून घ्या
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा – Rangpanchami Wishes In Marathi
- आज आहे रंगाचा सण,
तुमच्या आयुष्यात येऊ दे आनंदाचे क्षण
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा ! - रंगू द्या मला या आनंदाच्या रंगात
आला आला रंगाचा सण रंगपंचमी आला - रंग मला तुझ्या गोड हासूची आठवण करुन देतात
- रोज मला या सणाच्या आठवणी प्रेमाची माया देऊन जातात
- मला आवडतात रंग खूप…चला साजरा करुया रंगपंचमी मनापासून
- रंगपंचमीचा सण हा करुया साजरा… आंनदोत्सव आला हा रंगाचा
- सण हा आनंदाचा… रंगाने साजरा करण्याचा… चला करुया साजरा सण रंगपंचमीचा
- मार्च महिन्यात लागते रंगाची चाहूल… उडून रंग साजरी करुया यंदाची धुळवड
- सण रंगाचा, सण आनंदाचा… सण नव्या उत्साहाचा… सण रंगपंचमीचा
- रंगात रंगूनिया आला हा आनंद… चला साजरा करुया रंगाचा सण रंगपंचमी
- रंगले मी रंगात झाले मी मग्न… रंगपंचमीचा सण घेऊन आला आनंद.
बौद्धपौर्णिमेसाठी खास शुभेच्छा
रंगपंचमी स्टेटस मराठी – Rangpanchami Status In Marathi
- चला यंदा साजर करु रंगपंचमीचा सण.. आणि आणू रंग नसलेल्यांचा आयुष्यात रंगाचे काही क्षण
- तुला पाहता रंग ही झाले फिके. … तू आयुष्यात आलीस तर रोजच साजरी होईल रंगपंचमी आनंदाने
- रंग घेऊनी तुझ्या आवडीचे यंदा साजरी करु रंगपंचमी.. त्यासाठी येशील ना तू माझ्या जवळी
- रंग येता हाती… झाला मला तुला रंग लावण्याचा मोह… चल ये ना साजरा करुया रंगपंचमीचा सण हा सोबत दोघं
- रंगपंचमीचा सण हा आला… रंगात न्हाऊन निघाण्याचा क्षण हा आला
- रंगुया रंगात रंगपंचमीच्या साजरा करु हा आनंद
- आज साजरा करुया सण रंगपंचमीचा… तुम्हा सगळ्यांना रंगपंचमीच्या शुभेच्छा!
- तुझा आवडता रंग कोणता? विचारतोय.. कारण आज त्याच रंगाने
- रंगात रंग तो शाम रंग…. रंगपंचमीच्या शुभेच्छा
- चला रंगात रंगूया.. चला रंगपंचमी साजरा करुया… रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
होळी आणि धुलिवंदन या दोन्ही दिवसांचे महत्व आहे वेगळे, जाणून घ्या इतिहास
रंगपंचमी चारोळ्या – Rangpanchami Charolya/Shayari In Marathi
- रंगात रंगुनी जाऊ
सुखात चिंब न्हाऊ
जीवनात राहु दे रंग
सौख्याचे आनंद तरंग
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! - रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा
रंग नात्यांचा , रंग बंधाचा
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा
रंग नव्या उत्सवाचा
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! - रंग लागू दे, स्नेह जागू दे
नाती जोडू चला
उल्हासाने साजरा करु
हा रंगोत्सव
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! - रंग न जाणती जात न भाषा
चला उडवू रंग
वाढू दे प्रेमाची नशा
साजरी करु धुळवड.. ही मनी आशा - तनमनाला रंगवून जाते ही रंगपंचमी
मनी आनंद आणते ही रंगपंचमी - रंगूनी जाऊ रंगात आता
अखंड उठू दे मनी तरंग
तोडून सारे बंध सारे
असे उधळुया आज हे रंग
रंगपंचमीच्या शुभेच्छा! - रंगपंचमीचे रंग जणू एकमेकांच्या रंगात रंगतात
असूनही वेगळे रंग, रंग स्वतरुच्या विसरुनी
एकीचे महत्व सांगतात
रंगपंचमीच्या शुभेच्छा! - रंगपंचमी येते सगळ्यांना रंगवून जाते
रंग निघून जातात
पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच टिकून राहतो - रंग काय लावायचा
जो आज आहे उद्या निघून जाईल
लावायचा तर जीव लाव
जो आयुष्यभर टिकेल. - रंगाच्या उत्सवात नाचत आहे मन माझे
रंगात मन माझे आज झुलत आहे
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
हे आनंदी शुभेच्छा संदेश पाठवून तुमचा आजचा दिवस साजरा करा. तुम्हा सगळ्यांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !