महिलांचे दोन्ही स्तन समान आकाराचे असतातच असं नाही. तुम्हाला माहीत आहे का याबाबत? बऱ्याच महिलांचे स्तन हे समसमान आकाराचे नसतात. प्रत्येक स्तन हा दुसऱ्या स्तनापेक्षा वेगळा असणं ही अत्यंत कॉमन बाब आहे. पण याविषयी चर्चा होत नसल्याने बऱ्याच महिलांना याची माहिती नसते. तर काहींना वाटतं हे केवळ आपल्याच बाबतीत घडलं आहे. पण असं अजिबात नाही. स्तनांच्या आकारामध्ये समानता नसणे हे सामान्य शारीरिक परिवर्तनाचे लक्षण आहे. यामध्ये काहीच चुकीचे नाही. पण तरीही असं का असा प्रश्न मनात येणं साहजिक आहे. स्तनांचा आकार समान नसण्याची नक्की काय कारणे (reasons to know why your both boobs shape different from each other) आहेत ते आपण या लेखातून जाणून घेऊया. तसंच स्तनांचा आकार तुम्ही समसमान करू शकता का असाही प्रश्न असतो. या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखातून नक्की मिळतील.
हार्मोनल बदल
Shutterstock
किशोरावस्थेत जेव्हा शरीरामध्ये हार्मोनल बदल सुरू होतात तेव्हा स्तनांच्या आकारामध्ये बदल होणे हे साहजिक आहे. या बदलामुळे एक स्तन हा दुसऱ्या स्तनाच्या आधी वाढायला लागतो. वास्तविक जेव्हा वाढ होत असते तेव्हा एकाच वेळी दोन्हीची वाढ थांबूही शकते. कधी कधी दोन्ही स्तनांमधला फरक कळूनही येत नाही. पण काही जणींच्या बाबतीत यातील आकाराचे अंतर सहज लक्षात येते. त्यामुळे बघायला आणि त्याची काळजी घेतानाही थोडंसं विचित्र वाटतं. पण हे अत्यंत कॉमन हे मुळात लक्षात घ्या.
स्तनांच्या बाजूची चरबी वाढू न देण्यासाठी ब्रा घालताना टाळा या चुका
स्तनपान करणाऱ्या महिला
Shutterstock
स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये विशेषतः स्तनांचा आकाराची असमानता दिसून येते. कारण कधी कधी आपल्या मुलांना महिला केवळ एकाच बाजूच्या स्तनाने दूध पाजताना दिसतात. त्यामुळे तो स्तन अधिक ओढला जातो. दुसऱ्या स्तनाचा वापर न झाल्याने त्याचा आकार आहे तसाच राहतो. त्यामुळे स्तनामध्ये अंतर वाढते. दूध पाजणाऱ्या महिलांनी आपल्या दोन्ही स्तनांचा आकार सुडौल राखण्यासाठी बाळाला दोन्ही स्तनांमधून दूध देण्याची गरज आहे. एकाच स्तनाने बाळाला दूध पाजू नये.
स्तनांचा सैलसरपणा कसा कराल दूर, सोपे घरगुती उपाय (Home Remedies For Sagging Breast)
स्तनामध्ये गाठीची समस्या
स्तनांमध्ये गाठ होणे, स्तनांमध्ये कडकपणा निर्माण होणे हेदेखील एक कारण आहे. या स्तनांच्या गाठी सहसा कॅन्सरच्या असतात असं मानलं जातं. वास्तविक कॅन्सरच्या स्थितीमुळेही या गाठी निर्माण होऊ शकतात. स्तनावर एखादा आघात झाला तरीही स्तनांमध्ये गाठी निर्माण होऊ शकतात. त्यामुळेदेखील स्तनांच्या आकारात फरक येऊ शकतो. त्यामुळे याची काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. अशावेळी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. पण तुम्हाला जर वाटले की, अचानक तुमच्या स्तनांच्या आकारात बदल होतो आहे तर ही चिंतेची गोष्ट आहे आणि अशावेळी त्वरीत तुम्ही डॉक्टरांकडे जायला हवे.
सुडौल आणि आकर्षक स्तन मिळवण्यासाठी करा घरगुती उपाय – How To Increase Breast Size In Marathi
अनुवंशिकताही आहे एक कारण
अधिक केसमध्ये स्तनांमधील अंतराचा विकास नक्की का याचे काही कारण सापडत नाही. पण काही बाबतीत हे अनुवंशिक कारणही असू शकते. आपल्या जिन्समधून आलेली गुणसूत्रही याला कारणीभूत ठरतात. तुमच्या आईकडून हे वारसाहक्काने तुम्हाला मिळू शकते. त्यामुळे तुम्ही यावर वेगळा विचार करत बसण्याची गरज नाही.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक