ADVERTISEMENT
home / मनोरंजन
rohit-raut-juilee-joglekars-wedding-rituals

गायक रोहित राऊत आणि जुईलीच्या लग्नाची तयारी, लाडाची नवराई

‘सा रे ग म प लिटिल चँप’ मुळे रोहित राऊत (Rohit Shyam Raut) हे नाव मराठी माणसाच्या घराघरात पोहचले. तर आता इंडियन आयडलच्या स्टेजवरून रोहीत हे नाव जगजाहीर झाले. अप्रतिम गायक आणि संगीत दिग्दर्शक म्हणून रोहित आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. गेल्या काही दिवसांपासून रोहित आणि गायिका जुईली जोगळेकर (Juilee Joglekar) एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगली होती. मात्र दोघांनीही कधीच याचा उल्लेख केला नाही. मात्र आता दोघेही लग्नबंधनात अडकत आहे. #rohilee असा हॅशटॅग या जोडीचा असून त्यांच्या ग्रहमख आणि हळदीचे फोटोही सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. रोहित आणि जुईलीचे लग्न पार पडणार असून लाडाची नवराई सजली आहे. जुईलीने शेअर केलेल्या फोटोवर ‘तुला पाहण्यासाठी आतुर आहे’ असा रिप्लाय रोहितने देत आपले प्रेम व्यक्त केले आहे. तर त्यांच्या मित्रमैत्रिणींनीही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. 

अधिक वाचा – ‘विशू’ उलगडणार प्रेमाची अनोखी कहाणी

सोशल मीडियावर केले होते फोटो शेअर

काही दिवसांपासून दोघेही एकमेकांसोबत फोटोही शेअर करत होते. तर आता गेल्या दहा दिवसांपासून आपल्या आयुष्यातील न विसरता येणाऱ्या क्षणांचे फोटो दोघेही शेअर करत आहेत. गेले अनेक वर्ष रोहित आणि जुईली एकमेकांना ओळखत आहेत. तसंच या दोघांचा मित्रमैत्रिणींचा ग्रुपही कॉमन आहे. दोघेही सध्या आपल्या आयुष्यातील रोमँटिक फोटो शेअर करताना दिसून येत आहेत. लग्नाच्या आधीच्या विधींना सुरूवात झाली असून जुईलीचा ग्रहमख विधी पार पडला आहे. तर रोहितने आपल्या लग्नाचा आनंद आपल्या वडिलांना किती आहे याचा फोटो शेअर केला आहे. जो फोटो व्हायरल झाला असून त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. 23 जानेवारीला दोघे लग्नबंधनात अडकणार असून गेल्या काही दिवसांपासून त्यांंनी लग्नाचे काऊंटडाऊन सुरू केले आहे. तर त्यांच्या जवळचे मित्रमैत्रिणी इन्स्टास्टोरीजवर त्यांच्या लग्नविधीचे फोटो त्यांना टॅग करून पोस्ट करत आहेत. तर काही दिवसांपूर्वीच दोघांनी केळवणीचे फोटो शेअर केले होते. आता या दोघांच्या लग्नाच्या फोटोची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 

अधिक वाचा – ब्रेकअपवर व्यक्त झाली अभिनेत्री रुपाली भोसले, म्हणाली...

ADVERTISEMENT

दोघांचेही अफलातून फॅन फॉलोईंग

जुईली आणि रोहित दोघेही गायक आहेत आणि रोहितने तर आपल्या करिअरची सुरूवात अगदी लहानपणापासून केली आहे. रोहितच्या वडिलांनी त्याला आईशिवाय वाढवला असल्याने त्याचा वडिलांवर विशेष जीव आहे हे नेहमीच दिसून आले आहे. रोहितने आपल्या मेहनतीने नाव कमावले आहे. तर जुईलीदेखील उत्तम गायिका असून अनेक रियालिटी शो मध्ये तिने आपल्या आवाजाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. त्यामुळे या दोघांनाही अफलातून फॅन फॉलोईंग आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून दोघं नात्यात असल्याची चर्चा होती. मात्र आता या सर्व चर्चांना पूर्णविराम देत दोघांनीही लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. #rohilee आता एकत्र येत असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना नक्कीच आनंद असणार यात काही शंका नाही. तर आता या दोघांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी सर्वच जण उत्सुक आहेत. 

अधिक वाचा – 80+ Marathi Ukhane For Marriage | मराठी उखाणे खास सणांसाठी

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

21 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT