ADVERTISEMENT
home / मनोरंजन
sahvena-anurag

काळजाला भिडणारे ‘साहवेना अनुराग’ संगीतप्रेमींच्या भेटीस

काकस्पर्श, नटसम्राट अशा सर्वोत्कृष्ट कलाकृतीनंतर महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) आणि झी स्टुडिओज घेऊन येत असलेल्या ‘पांघरूण’ या चित्रपटातील  ‘अनोखी गाठ’ (Anokhi Gath) आणि ‘इलुसा हा देह’ ही दोन सुरेल गाणी यापूर्वी प्रदर्शित झाली आहेत. या श्रवणीय गाण्यांना संगीतरसिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या चित्रपटातील ‘साहवेना अनुराग’ (Sahvena Anurag) हे मंत्रमुग्ध करणारे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याला केतकी माटेगावकर हिचा सुमधुर आवाज लाभला असून या गाण्याचे बोल वैभव जोशी यांचे आहेत तर हितेश मोडक यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. ‘पांघरूण’ चित्रपटातील गाणे प्रदर्शित झाले आहे. मराठी चित्रपटातील गाणी ही नेहमीच प्रेक्षकांना भावतात आणि वेगळी गाणी असतील तर नक्कीच त्याकडे अधिक लक्ष वेधले जाते. असेच हे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.  

अधिक वाचा – गायक रोहीत राऊत आणि जुईलीच्या लग्नाची तयारी, लाडाची नवराई

अनोखा कलाविष्कार चित्रपटप्रेमींसाठी

झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर हे एक उत्तम समीकरण आहे आणि त्यातून नेहमीच एक अनोखा कलाविष्कार चित्रपटप्रेमींसाठी सादर होतो. अशीच सुंदर कलाकृती ‘पांघरूण’च्या Panghrun) निमित्ताने पाहायला मिळणारा आहे. स्वातंत्र्यपूर्वीचा काळ, कोकणातील नयनरम्य निसर्गसौंदर्य आणि तिथे घडणारी अनोखी प्रेमकहाणी आपल्याला ‘पांघरूण’ मध्ये पाहायला मिळणार आहे. पुन्हा एक विलक्षण प्रेमकहाणी अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटातील ‘साहवेना अनुराग’ या गाण्याचे बोल थेट काळजाला भिडणारे आहेत. कला आणि प्रतिभेतून आलेला आवेश या गाण्यात चित्रित करण्यात आला आहे. नायिकेच्या मनातील भावना, घालमेल न बोलताही देहबोलीतून व्यक्त होत आहेत. हा सांगितिक खजिना प्रेक्षकांना नक्कीच भावेल. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले असून यात अमोल बावडेकर, गौरी इंगवले, रोहित फाळके, विद्याधर जोशी, सुरेखा तळवलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुमधुर संगीत, भावनिक कथानक यांमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा हा चित्रपट 4 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अधिक वाचा – गहराईयाँ’ ट्रेलरमधील दीपिकाचा बोल्ड सीन पाहून रणवीर सिंहने शेअर केली पोस्ट

ADVERTISEMENT

चित्रपटाचीही उत्सुकता 

महेश मांजरेकरांचे चित्रपट नेहमीच वेगवेगळ्या धाटणीचे आणि उत्सुकता वाढवणारे असतात. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाले ‘नाय वरणभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ वादात अडकला असला तरीही एका वेगळ्या विषयाला हात घालून महेश मांजरेकरांनी पुन्हा एकदा आपल्यातील उत्तम दिग्दर्शकाची साक्ष दिली आहे. तर आता अजून एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट लवकरच फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित करण्यात येत आहे. महेश मांजरेकर काही महिन्यांपूर्वीच कॅन्सरसारख्या आजारातून बरे झाले आहेत. त्यानंतर त्यांनी चित्रपटांचा झपाटाच लावला आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही.  दरम्यान या चित्रपटामध्ये कशी प्रेमकहाणी असणार आणि यातील कलाकारांचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. केवळ चित्रपटच नाही तर या चित्रपटाचे संगीत हेदेखील तितकेच प्रेक्षकांना आकर्षिक करणारे आणि मनाला आनंद देणारे आहे अशीही चर्चा आता रंगू लागली आहे. त्यामुळे सर्वच रसिक प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. 

अधिक वाचा – ब्रेकअपवर व्यक्त झाली अभिनेत्री रुपाली भोसले, म्हणाली…

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

23 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT