बी-टाऊनमध्ये सध्या अनेक सेलिब्रेटीजच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. ज्यामध्ये राजकुमार राव- पत्रलेखा, आलिया भट- रणबीर कपूर आणि कतरिना कैफ- विकी कौशल यांचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या तीनही कपलच्या घरी सध्या लग्नाची तयारी सुरू आहे. कतरिना आणि विकीचे लग्न पुढच्या महिन्यात डिसेंबरमध्ये राजस्थानमध्ये होण्याची चर्चा आहे. राजस्थानच्या एका रॉयल पॅलेसमध्ये हे ग्रॅंड वेडिंग होणार आहे. यासाठी कतरिना आणि विकीला पुढच्या महिन्यात शूटिंगमधून सुट्टी हवी आहे.
राजकुमार राव आणि पत्रलेखाच्या लग्नाची तयारी सुरू, या ठिकाणी पार पडणार विवाहसोहळा
सलमानने दिलं कतरिनाला खास गिफ्ट
कतरिना आता विकीच्या प्रेमात बुडाली असली तरी तिचं आधी सलमान खानसोबतही अफेअर होतं. कतरिना जेव्हा इंडस्ट्रीमध्ये नवीन होती तेव्हा सलमानने कतरिनाला खूप मदत केली होती. एकत्र काम करता करता दोघांमध्ये प्रेमाचं नातं निर्माण झालं होतं. अनेक वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. मात्र कालांतराने त्यांचे नातं तुटलं त्यानंतर कतरिना रणबीर कपूरला डेट करू लागली. असं असूनही सलमान आणि कतरिनाची मैत्री मात्र कायम टिकली. रणबीरसोबतही कतरिनाचे नाते जास्त काळ टिकू शकले नाही. आता कतरिनाला तिच्या आयुष्यात खरे प्रेम मिळाले आहे. त्यामुळे बॉलीवूडचा भाईजान खूश झाला आहे. चाहत्यांना जरी कतरिना आणि सलमान ही जोडी आवडत असली तरी कतरिनाने खऱ्या आयुष्यासाठी विकी कौशलची निवड केलेली आहे. सलमानने यासाठी कतरिनाला खास लग्नाचं गिफ्टही दिलं आहे. सलमान खानने कतरिनाच्या लग्नासाठी त्याच्या आगामी चित्रपट ‘टायगर 3’ चं शूटिंग चक्क पुढे ढकललं आहे. ज्यामुळे कतरिना आणि विकी लग्नासाठी पुरेसा वेळ नक्कीच काढू शकतात.
सध्या जिथे तिथे होतेय कतरिनाच्या टिप टिप बरसा पानीची चर्चा, रविना म्हणाली
सलमानने स्वीकारलं का कतरिना – विकीचं नातं
सलमान आणि कतरिना ही जोडी बॉलीवूड चित्रपटातील एक सुपरहिट जोडी आहे. जेव्हा जेव्हा चाहते या दोघांना एकत्र पाहतात तेव्हा त्यांना कतरिनाने सलमानसोबत लग्न करायला हवं असं वाटतं. पण कतरिना आता विकीच्या प्रेमात पडली आहे. एकदा एका कार्यक्रमात सलमान समोर कतरिनाला विकीने प्रपोज करण्याची अॅक्टिंग केली होती. तेव्हा सलमानने ‘ हे पाहून मी बेशुद्ध झालो आहे’ अशी प्रतिक्रिया दिली होती. हे सगळं त्याने मजेत केलं असलं तरी सलमानचंही कतरिनासोबत मैत्रीपलीकडचं नातं नक्कीच होतं. सलमानला आयुष्यात लग्नच करायचं नसल्यामुळे त्याने मोठ्या मनाने कतरिना आणि विकीचं नातं स्वीकारलं आहे. एवढंच नाही तर त्यांच्या लग्नासाठी आणि कतरिनाच्या सुट्टीसाठी त्याने शूटिंग पुढे ढकलण्याचा खास निर्णयही घेतला आहे.