हरयाणाची शान म्हणून सपना चौधरी ओळखली जाते. तिच्या तुफानी डान्स परफॉर्मन्समुळे ती कायमच चर्चेत असते आणि आता तिचा आणखी एक तुफानी डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘तू चीझ लाजवाब’ या गाण्यावर ती ठुमकताना दिसत आहे. ही तीच सपना चौधरी आहे जिला तुम्ही big boss मध्ये पाहिले आहे. तिच्या या डान्स व्हिडिओनंतर पुन्हा एकदा सपना चौधरी चर्चेत आली आहे.
ट्रेडिंग व्हिडिओमध्ये कायम असते सपना चौधरी
सपना चौधरीच्या डान्सची तारीफ तर नेहमीच केली जाते. ती ज्या ज्या ठिकाणी जाऊन परफॉर्म करते तिथे तिचे लाखो चाहते तिकिट काढून येतात. त्या प्रत्येक कार्यक्रमातील तिचे डान्स व्हिडिओ युट्युबवर टाकले जातात आणि बघता बघता हे व्हिडिओ युट्युबच्या ट्रेंडिग व्हिडिओच्या यादीमध्ये येतात. त्यामुळेच ती कायम हिट असते असे म्हणायला हवे.
मुलींना आवडतात वयस्क पुरुष, चित्रपट मालिकांमध्येही दाखवला जात आहे हा ट्रेंड
नेहमी असते पूर्ण कपड्यात
आता डान्स म्हटल्यावर अनेकांच्या डोळ्यासमोर आयटम गर्ल या उभ्या राहतात. अर्धनग्न अवस्थेत नाचत असलेल्या आयटम गर्ल अनेकांना पाहायला आवडत नाही. पण सपना चौधरी ही हरयाणातील अशी डान्सर आहे जी नेहमीच पूर्ण कपड्यात आपली नृत्यकला सादर करते. कायमच पंजाबी ड्रेस घातलेली सपना त्यामुळेच अनेकांना आवडते. त्यामुळेच तिचे देशपातळीवर फॅन आहेत. तिच्या इन्स्टग्राम प्रोफाईलवर गेल्यानंतरही तुम्हाला तिचे भारतीय पेहरावातील कपडेच अधिक दिसतील.
नुकताच केला एक चित्रपट
सपनाने स्टेज शो तर गाजवले आहेच. पण तिला चित्रपटातही काम करण्याची इच्छा होती. तिने नुकताच एक चित्रपट केला. Dosti ke side effects असे या चित्रपटाचे नाव होते. त्या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत होती. 14 डिसेंबर 2018 रोजी हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाची फार काही चर्चा झाली नसली. तरी हरयाणातील तिच्या फॅन्सनी मात्र या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला.
‘अखियाँ का काजल’
हो ही ती सपना चौधरी आहे जिचे एक गाणे तर सुपर डुपर हिट आहे. तेरी अखियाँ क्यो काजल हे तिचं गाणं आणि त्यावरील तिचे ठुमके.. म्हणजे सगळ्यांना घायल करणारे होते. अजूनही सपना चौधरी म्हटलं की हेच गाणं अनेकांना आठवतं.
आता पाहायला मिळणार रिंकूचा ‘मेकअप’ अवतार
Big Boss मुळे मिळाली ओळख
सपना चौधरीला खरी ओळख मिळाली ती सलमान खानच्या Big Boss या रिअॅलिटी शोमुळे. सपना चौधरी या आधीदेखील प्रसिद्ध होती. म्हणजे ती हरयाणा, पंजाब, राजस्थान या ठिकाणी स्टेज परफॉर्मन्स करत होती. तिच्या प्रसिद्धीमुळेच तिला या शोमध्ये येण्याची संधी मिळाली. या शोमध्येही ती बराच वेळ टिकून होती. या शो नंतर ती देशभरातील घराघरात पोहोचली.तिच्या प्रसिद्धीत तिप्पट वाढ झाली असे म्हणायला हवे.
(सौजन्य- Instagram, youtube)