श्रीकृष्ण जन्माष्टमी (Janmashtami 2021) हा आपल्याकडे उत्साहाचा सण म्हणून साजरा करण्यात येतो. श्रावण महिन्यात अनेक सण साजरे होतात. त्यामधील जन्माष्टमी हा अगदी उत्साहाचा आणि आपलासा वाटणारा सण. लहान मुलांच्या बाललीला आणि दहीहंडी आणि गोकुळाष्टमीबद्दल माहिती आपल्या सगळ्यांना आहेच. यावर्षी हा सण येत आहे 30 ऑगस्ट, 2021 रोजी. या सणाचा पूजा विधी आणि इत्यंभूत माहितीदेखील आपल्याला आम्ही याआधी दिली आहे. श्रीकृष्णाची भक्ती केल्याने सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. हल्ली सोशल मीडियाचे जग आहे. त्यामुळे अगदी एकमेकांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा संदेशही पाठवले जातात. पण यावर्षी ज्योतिषशास्त्रानुसार जन्माष्टमीला एक अद्भुत संयोग जुळून येत आहे याबद्दल तुम्हाला माहीत आहे का? काय आहे हा अद्भुत संयोग तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का? तर नक्की वाचा हा लेख.
यावेळी जुळून येत आहे दुर्लभ संयोग
2021 मधील 30 ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी (Shri Krishna Janmashtami) देशभरात साजरी करण्यात येणार आहे. सोमवारी येणाऱ्या या सणाचा एक दुर्लभ संयोग मानण्यात येत आहे. यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भाद्र कृष्ण पक्ष, रोहिणी नक्षत्र, मध्यरात्री अष्टमी तिथी, वृषभ राशीमध्ये चंद्र आणि सोमवार असा संयोग जुळून येत आहे. हा कृष्णाच्या जन्माच्या वेळचा संयोग असून केवळ 1 वाजून 59 मिनिटांपर्यंतच अष्टमी तिथी राहणार आहे. तर जवळपास 101 वर्षानंतर हा योग जुळून येत आहे. भाद्रपद महिन्याच्या अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात येते.
असा अद्भुत संयोग असल्याने यावेळी कृष्णासाठी केलेला उपवास अर्थात व्रत हे खास असेल असे सांगण्यात येत आहे. या अद्भुत संयोगामध्ये श्रीकृष्णाची पूजा केल्याने तुमच्यावरील संकटे आणि त्रासातून मुक्ती मिळण्यास मदत होईल असेही ज्योतिषशास्त्रानुसार सांगण्यात आले आहे. इतकंच नाही तर जे आत्मा प्रेत योनिमध्ये भटकत असतील त्यांनाही या योगामुळे मुक्ती मिळेल असंही शास्त्रानुसार सांगण्यात आले आहे. (याबाबत कोणताही ठोस पुरावा नाही आणि आम्ही अंधश्रद्धेला नक्कीच पाठिंबा देत नाही. मात्र ज्योतिषशास्त्रानुसार ज्या बाबी सांगण्यात आल्या आहेत, त्याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत). तसंच तुम्ही केलेल्या पापातून तुम्हाला मुक्त होण्यासाठी हा अत्यंत शुभ दिवस मानला गेला आहे. याशिवाय संतती प्राप्तीसाठी बालस्वरूप गोपाळकृष्णाचे या दिवशी पूजन केल्यास, तुमची मनोकामना पूर्ण होते असेही सांगितले गेले आहे.
दिवस आहे अत्यंत शुभ
यावर्षी जन्माष्टमीच्या दिवशी आलेला हा दुर्लभ आणि अद्भुत योग श्रीकृष्णाच्या भक्तांसाठी पर्वणीच आहे. कृष्णाचा जन्म हा रोहिणी नक्षत्रावर झाला होता आणि अष्टमी तिथी, वृषभ राशीतील चंद्र हा योग पुन्हा एकदा यादिवशी येत आहे. त्यामुळे सर्वात शुभ दिवस मानला गेला आहे. त्याशिवाय हा योग सोमवारी आल्यामुळे अधिक शुभ मानण्यात येत आहे. ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचा सोमवार हा आवडता वार असल्याचे मानण्यात येते. म्हणूनच हा संयोगही दुर्मिळ आहे असे मानण्यात आले आहे. त्याशिवाय असा योग हा 101 वर्षांनी भक्तांना अनुभवायला मिळणार असल्याचेही ज्योतिषशास्त्रानुसार सांगण्यात आले आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक