थंडीच्या दिवसात गरमागरम आलं घातलेला चहा प्यायला कोणाला नाही आवडत. त्यामुळे बऱ्याचदा भरपूर आलं घालून चहा केला जातो. तसंच आल्यातील अनेक औषधीय गुणांमुळेही त्याचा आहारात वापर केला जातो. जसं पोटात गडबड असल्यास किंवा उलटी, मळमळ होत असल्यास आल्याचं चाटण दिलं जातं. पण म्हणतात ना कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात घेतल्यास ती आरोग्यासाठी हानीकारक असते. त्याप्रमाणेच इतरवेळी आरोग्यदायी ठरणारं आलं जास्त प्रमाणात सेवन केल्यास तुमची तब्येत बिघडूही शकते.
Canva
- ब्लड प्रेशर
आलं ब्लड प्रेशर कमी करण्यात मदत करतं. पण जर तुम्हाला लो ब्लड प्रेशर असल्यास तुम्हाला जास्त प्रमाणातील आलं हे नक्कीच आरोग्यदायी ठरणार नाही.
- डायरिया
आलं पोट साफ करण्यासही मदत करतं. आल्यामधील रस अन्नपचनास मदत करतं. पण आल्याची ही विशेष बाब तेव्हा वाईट ठरते जेव्हा आलं मोठ्या प्रमाणात खाल्लं जातं. त्यामुळे अशा परिस्थितीत डायरिया होण्याचा धोका असतो.
- गॅस ब्लोटिंग
आल्यामुळे जास्त गॅस आणि ब्लोटिंगची समस्याही जाणवते. त्यामुळे आल्याचा वापर चहात किंवा खाण्यात केल्यास मर्यादित प्रमाणात करा.
- जळजळ
जास्त आलं घातलेला चहा किंवा भाजी यांचा जास्त वापर पोटामध्ये जळजळ होण्याची समस्या निर्माण करतो. ज्यावर वेळ पडल्यास तुम्हाला औषधही घ्यावं लागू शकतं.
- हृदयासाठी नाही चांगलं
आल्यातील तत्त्वं तुमचं रक्त पातळ करतात. जास्त प्रमाणातील आलं या प्रक्रियेला जलद करून हृदयासाठी समस्या निर्माण करू शकतं. तसंच आल्यातील ब्लड प्रेशर कमी करण्याची क्वालिटीही हृदयावर दबाव टाकू शकते.
- गर्भावस्थेतही आलं जरा जपूनच
गर्भावस्थेदरम्यान आल्याचं सेवन गर्भवती महिलांना होणारा उलटी आणि मळमळ यांचा त्रास कमी करण्यास उपयोगी ठरतं. पण याच आल्याचं जास्त प्रमाणात सेवन केल्यास ते उष्ण प्रकृतीचं असल्याने गर्भपाताचाही धोका असतो.
Canva
गरम पाणी पिणाऱ्यांनो वेळीच व्हा सावध, तुमचं आरोग्य आहे धोक्यात
उपवासाच्या दिवसात चहा-कॉफी पिणं योग्य की अयोग्य
त्यामुळे पुढच्या वेळी चहामध्ये आलं घालताना किंवा एखाद्या आजारावर आल्याचा वापर करताना तो योग्य प्रमाणात करा. ज्यामुळे आल्याच्या औषधी गुणांचा उपयोग होईल आणि दुष्परिणामही जाणवणार नाहीत.
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.