अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा काही महिन्यांपासून वाईट काळ सुरू आहे. ठग सुरेश चंद्रशेखरसोबत नाव जोडल्यापासून ती ईडीच्या रडारवर आहेच. यातच आता पुन्हा एकदा जॅकलिनच्या चाहत्यांसाठी धक्का देणारी गोष्ट समोर आली आहे. जॅकलिनचा तिच्या आगामी चित्रपट ‘दी घोस्ट’मधून पत्ता कट झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अक्किनेनी नागार्जुनच्या ‘दी घोस्ट’ चित्रपटात आता जॅकलिन ऐवजी सोनल चौहान झळकणार आहे.
‘पठाण’मध्ये स्वतः स्टंट्स करणार दीपिका पादुकोण
लवकरच होणार अधिकृत घोषणा
दी घोस्ट चित्रपटातून जॅकलिनला वगळण्यात आल्यामुळे तिचे चाहते नक्कीच नाराज झाले असतील. पण यामुळे जन्नत फेम सोनल चौहानचे चाहते मात्र नक्कीच खुश झाले आहेत. इन्स्टाग्रामवर सोनल चौहानचा बिनधास्त अवतार चाहत्यांना नेहमीच भावत आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दी घोस्टच्या निर्मात्यांना आता नागार्जुनसोबत सोनल चौहान परफेक्ट वाटत आहे. शिवाय आतापर्यंत ही जोडी प्रेक्षकांनी कधीच पाहिलेली नाही. त्यामुळे या फ्रेश जोडीला प्रेक्षक चांगली पसंती देतील असं त्यांचे मत आहे. सोनल चौहानचा असलेला चाहतावर्ग पाहता ही नवी केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे.
ब्रेकअपच्या चर्चा नुसत्या अफवा,मलायका-अर्जुन पुन्हा एकत्र
जॅकलिन फर्नांडिसचा घोस्टमधून का झाला पत्ता कट
मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये आता जॅकलिन फर्नांडिससुद्धा अकडली आहे. सध्या तिची या केसमध्ये सतत चौकशी केली जात आहे. त्यामुळे या काळात जॅकलिन भारताबाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळेच जॅकलिनला नव्या चित्रपटांच्या ऑफर मिळत नाही आहेत. शिवाय हातात असलेले चित्रपटही तिच्याकडून काढून घेतले जाण्याची शक्यता आहे. कारण बरेचसे चित्रपट परदेशात शूट केले जातात. मात्र आता काही दिवस जॅकलिन भारताबाहेर जाऊ शकत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याच कारणासाठी जॅकलिनने दी घोस्टमधली ऑफर स्वतःहून नाकारली आहे. याआधी काजल अग्रवालला दी घोस्टची ऑफर देण्यात आली होती. मात्र तिनेही प्रेगन्सीच्या कारणामुळे ही ऑफर नाकारली होती. त्यानंतर जॅकलिनच्या नावाची चर्चा होऊ लागली. मात्र आता निर्मांत्यांनी या भूमिकेसाठी सोनल चौहानला अप्रोच केलं आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल आणि घोस्टच्या शूटिंगला सुरुवात होईल.
हिंदीमध्ये झळकतोय आता हा नवा मराठमोळा चेहरा, मिळत आहेत नवे कॅम्पेन्स