सिने क्षेत्रात काम करणाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी मिळणे हे काही नवे नाही. आता या यादीमध्ये आणखी एका अभिनेत्याचे नाव जोडले गेले आहे. लॉकडाऊनच्या या काळात घरातच आपल्या कुटुंबासोबत असताना त्याच्या घरी अचानक एक फोन आला. या फोन कॉलमधून त्याचे घर बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी देण्यात आली. या धमकीनंतर अचानक सगळ्या यंत्रणा कामाला लागल्या. हा साऊथ स्टार आणखी कोणी नसून हा साऊथ सुपरस्टार विजय आहे. याआधी विजयच्या मृत्यूच्या बातमीने ट्विटरवर खळबळ माजवली होती.#ripvijay हा हॅशटॅग सगळीकडे ट्रेंड होऊ लागला आणि आता या नव्या फोन कॉलमुळे नवा गोंधळ उडाला आहे.
नेपोटिझम करु पाहणाऱ्याला मनसे देणार दणका, कलाकारांना मनसेचा दिलासा
बॉम्बने उडवण्याची दिली धमकी
अभिनेता विजयला त्याच्या घरच्या फोनवर 4 जुलैच्या मध्यरात्री एक अज्ञात फोन आला. या फोनवरुन त्याला त्याचे घर बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. ही धमकी ऐकताच त्याचे तातडीने पोलिसांना फोन केले. पोलिसांनीही कोणताही वेळ न घालवता याचा शोध घ्यायला सुरुवात केली. तामिळनाडू पोलिसांनी तातडीने बॉम्ब स्क्वॉड पाठवून घराची तपासणी करण्यात आली. पण या तपासणीमध्ये कोणताही बॉम्ब आढळला नाही. त्यामुळे या धमकीचा धोका टळला होता हे नक्की!
फोन करणाऱ्या व्यक्तीला दिली समज
मध्यरात्री फोन करुन अशा पद्धतीने धमकी देणाऱ्या माणसाचा शोध ज्यावेळी घेण्यात आला. त्यावेळी धमकी देणारी व्यक्ती 21 वर्षांची आहे असे कळले. त्याची चौकशी केल्यानंतर या तरुणाचे मानसिक संतुलन बिघलडलेले असून त्याने आतापर्यंत अनेकांना अशापद्धतीचे फोन केले आहे. बड्या असामींना फोन करुन त्यांना धमकी देण्याचे काम ही व्यक्ती नेहमीच करत आली आहे. याच तरुणाने या आधी जयललिता, नारायणस्वामी आणि किरण बेदी यांनाही फोन करुन अशा प्रकारची धमकी दिली आहे. त्याचे मानसिक स्वास्थ्य पाहता त्याला या आधीही आणि यावेळीही समज देऊन सोडण्यात आले आहे.
वाढीव वीजबिलामुळे बॉलीवूड स्टारही झाले हैराण
विजयच्या मृत्यूच्या बातमीनेही उडवला होतो गोंधळ
#ThalapathyVijay fans woke up to the hashtag #RIPVijay trending by #ThalaAjith fans, and quickly started posting #LongLiveVijay to overtake the former — will there ever be an end to these fan wars?
https://t.co/d7gK5Ra6U4— The Hindu Cinema (@TheHinduCinema) July 29, 2019
विजयच्या बाबतीत ही दुसरी महत्वाची घटना या काही काळामध्ये घडली आहे. या आधीसुद्धा विजयच्या मृत्यूच्या बातमीने सगळ्यांना गोंधळात पाडले होते. एक असे ट्विट जे यासाठी कारणीभूत ठरले. #ripvijay हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला आणि अचानक अनेकांनी त्याला श्रद्धांजली द्यायला सुरुवात केली. कोणतीही शहानिशा न करता अनेकांना त्याच्या निधनाची बातमी खरी वाटू लागली. पण विजय संदर्भात ही अफवा पसरवण्यात आली होती. साऊथच्या दोन सुपरस्टारच्या फॅन्सनी हा सगळा गोंधळ निर्माण केला. विजयच्या चाहत्यांना बुचकाळ्यात पाडण्यासाठी त्यांनी ही गोष्ट केली होती. या दोन फॅन्सच्या लढाईमध्ये त्यांनी चक्क विजयलाच मारुन टाकले. पण नंतर हा हॅशटॅगही काढून टाकण्यात आला.
आता या नव्या गोष्टीमुळे विजय आणि त्याच्या कुटुंबांना नाहक त्रास झाला आणि त्याहूनही अधिक पोलीस यंत्रणेला. देशात कोरोनाशी दोन हात करताना पोलिसांची तारांबळ उडत आहे. त्यात अशा गोष्टीमुळे उगाचच यंत्रणेवर भार पडत आहे.
अभिनेत्री अमृता रावचा गणेशोत्सवाबाबत ‘हा’ सल्ला पर्यावरणासाठी आहे मोलाचा