ADVERTISEMENT
home / मनोरंजन
story-of-laagir-releasing-14-january

जीव लावणारं कुणी असलं तर, होतोच आपण प्रेमात लागिरं

कॉलेजमधील प्रेमकथा  आणि या प्रेमाला असलेली गावच्या राजकारणाची किनार अशी “स्टोरी ऑफ लागिरं” या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट 14 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, उत्तम अभिनय, श्रवणीय गाणी, नेत्रसुखद छायांकन यांचा मिलाफ या चित्रपटात झाला आहे. “स्टोरी ऑफ लागिरं” चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच झाला आहे. रोहित राव नरसिंगे, चैताली चव्हाण, ऋतुजा अंद्रे, मोहन जाधव, सोमनाथ येलनूरे यांच्यासह अभिनेते  संजय खापरे, मिलिंद दास्ताने, प्रेमाकिरण या अनुभवी कलाकारांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. 

अधिक वाचा – काजल अग्रवाल होणार आई, सोशल मीडियावर केले शेअर

ग्रामीण पार्श्वभूमीवरील प्रेमकथा 

ग्रामीण पार्श्वभूमीवर घडणारी प्रेमकथा या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. प्रेम, राजकारण, गावातील हेवेदावे, तीव्र सत्तासंघर्ष असे अनेक पदर या चित्रपटाच्या कथेला असल्याचा अंदाज ट्रेलरमधून बांधता येतो. नव्या दमाच्या कलाकारांचा उत्तम अभिनय हे चित्रपटाचं वैशिष्ट्य आहेच. त्याशिवाय श्रवणीय गाणी आणि उत्तम छायांकनामुळे हा ट्रेलर लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे आता 14 जानेवारीला  “स्टोरी ऑफ लागिरं” चित्रपटगृहात जाऊन पाहावा लागेल. आपल्याकडे आजही ग्रामीण भाग आणि तिथल्या कथांची नाळ ही जोडली गेली आहे. मराठी प्रेक्षकांना ग्रामीण कथा आणि त्यातील उत्कटता आजही आवडते. त्यामुळे या चित्रपटामध्ये नक्की काय वेगळे असणार याचीही उत्सुकता आता लागून राहिली आहे. 

तसंच काही नवे चेहरे आणि जुन्या चेहऱ्यांचा मेळ आणि यांच्यातील अभिनयाची जुगलबंदीही प्रेक्षकांना या चित्रपटातून दिसून येणार आहे. जीव लावणं आणि प्रेम करणं या दोन्ही गोष्टी अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. आजही आपल्याकडे अनेक ठिकाणी प्रेमाला विरोध दिसून येतो. इतकंच नाही तर घराणेशाही अथवा विरोधामुळे प्रेमामध्ये जोडप्यांनी एकमेकांसाठी घर सोडून देणे अथवा एकमेकांसाठी मरणे या गोष्टी ग्रामीण भागात खूपच घडत असलेल्या दिसून येतात. नेमका या चित्रपटाचा प्रेमकथा हा विषय असला तरीही नक्की कोणती कथा आहे हे मात्र चित्रपट पाहिल्यानंतरच प्रेक्षकांना कळून येईल. ट्रेलरवरून याचा अंदाज प्रेक्षक सध्या काढण्याचा प्रयत्न नक्कीच करत आहेत. मात्र पुन्हा एकदा दर्जेदार मराठी चित्रपट पाहता येईल हे नक्की!

ADVERTISEMENT

अधिक वाचा – काजोलची निसा आता दिसते खूपच हॉट, काजोललाही टाकले मागे

चित्रपटाचे ट्रेलर झाले लाँच 

“स्टोरी ऑफ लागिरं” या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला. रॉयल समृद्धी असोसिएट्स आणि स्वरुप सावंत प्रस्तुतकर्ते  असून जी. के. फिल्म्स क्रिएशन्स व मीडियावर्कस् स्टुडियो यांनी निर्मिती केली आहे.  बी. एन. मेश्राम चित्रपटाचे निर्माते, यामिनी वाघडे सहनिर्मात्या आहेत. रोहित राव नरसिंगे यानी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. मंगेश गाडेकर यांनी छायांकन, सनी-सुशांत आणि सिद्धेश कुलकर्णी -अतुल जोशी यांची संगीत, निहार राजहंस, बी. गोपानारायण यांनी गीतलेखन, अनिल मदनसुरी यांनी संकलनाची जबाबदारी निभावली तर  मीडिया वर्क्स स्टुडिओने पोस्ट प्रॉडक्शनची जबाबदारी निभावली आहे. प्रेक्षकांनाही आता चित्रपटाची आतुरता लागली आहे. सध्या मराठी चित्रपटांना पुन्हा एकदा थिएटरमध्ये चांगले सुगीचे दिवस आले आहेत असं म्हणावं लागेल. 

अधिक वाचा – कोणाच्या आठवणीने व्याकूळ झाली सारा अली खान, शेअर केले फोटो

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
04 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT