ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
कोणत्याही कार्यक्रमासाठी आहेत हे आकर्षक ब्लाऊज डिझाईन्स

कोणत्याही कार्यक्रमासाठी आहेत हे आकर्षक ब्लाऊज डिझाईन्स

 

कोणताही हंगाम असो आपल्याकडे अनेक कार्यक्रमांमध्ये साडी ही नेसली जातेच. उन्हाळा असेल तर हलक्या आणि कम्फर्टेबल साड्या नेसल्या जातात. तर थंडीच्या दिवसात बनारसी साडी (Banarasi Saree), कांजिवरम साड्या (Kanjivaram) अशा भारदस्त साड्यांना प्राधान्य देण्यात येतं. पण आता साडीसह वेगवेगळ्या डिझाईन्सच्या ब्लाऊजचाही ट्रेंड सुरू झाला आहे. ग्लॅमरस लुक देणारे हे ब्लाऊज डिझाईन्स कोणाला नकोसे वाटतात का? तर अर्थातच अजिबात नाही. कोणत्याही कार्यक्रमासाठी काही खास आकर्षक ब्लाऊज डिझाईन्स आहेत. जे हमखास तुमचा लुक अप्रतिम दर्शवतात. तुमचा लुक आकर्षक, आखीव आणि रेखीव दर्शविण्यासाठी साड्यांसह तुम्ही नक्की या ब्लाऊज डिझाईन्स (Blouse Designs) चा वापर करावा. अशाच काही ब्लाऊज डिझाईन्सबद्दल आम्ही या लेखातून तुम्हाला सांगणार आहोत. तुम्हीही तुमच्या कोणत्याही खास कार्यक्रमासाठी अशा प्रकारे ब्लाऊज शिऊन अथवा रेडीमेड ब्लाऊज (readymade blouse) घेऊ शकता. 

दोरीवाले ब्लाऊज (Blouse with Less)

दोरीवाले ब्लाऊज (Blouse with Less)

Instagram

 

दोरीवाले ब्लाऊज हा अत्यंत कॉमन ब्लाऊज डिझाईन आहे. पण तरीही याची क्रेझ अर्थात आवड काही कमी झालेली नाही.  लहंगा असो अथवा साडी असो त्यावर दोरी असणारा ब्लाऊज हा नेहमी आकर्षक दिसतो. याचे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. तुम्हाला बॅकलेस ब्लाऊज (Backless Blouse) आवडत नसेल तर तुम्ही डीप बॅकवाला डिझाईन घेऊ शकता अथवा अगदी नियमित ब्लाऊजचा आकार असणारा दोरीचा ब्लाऊज तुम्ही वापरू शकता. ब्लाऊजला बांधलेली दोरी ही ब्लाऊज अधिक आकर्षक दिसायला मदत करते. तसंच याचं फिटिंगही उत्तम करायला या दोरीची मदत होते. तुम्हाला जर डीप नेक ब्लाऊज (Deep Neck Blouse) घालायची आवड असेल तर यासारखा उत्तम पर्याय नाही. कोणत्याही कार्यक्रमात आणि सणासाठ हा ब्लाऊज अत्यंत उठावदारच दिसतो. 

ऑफ शोल्डर ब्लाऊज डिझाईन (Off Shoulder Blouse Design)

ऑफ शोल्डर ब्लाऊज डिझाईन (Off Shoulder Blouse Design)

Instagram

ADVERTISEMENT

 

तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसात एखादा घरचा कार्यक्रम अथवा मैत्रिणीचे लग्न अशा कार्यक्रमांना उपस्थिती लावायची असेल तर तुम्ही ऑफ शोल्डर ब्लाऊज डिझाईनचा वापर करू शकता. यामध्ये तुमच्या साडीला अधिक चांगला लुक येतो. ‘वीरे दी वेडिंग’ मधील करिनाचा लुक असणारा ऑफ शोल्डर ब्लाऊज असो अथाव प्रिया बापटचा हा ब्लाऊज असो तुमच्या साडीचा लुक अधिक चांगला आणि आकर्षक ठरवण्यास फायदेशीर ठरतो. तुम्हाला हवं तर तुम्ही ब्लाऊजच्या वरच्या बाजूला, खांद्याच्या भागावर वेगळी कलाकुसर करून घेऊ शकता. प्रिंटेड आणि पाईपिंग लावलेले ऑफ शोल्डर ब्लाऊज अधिक सुंदर दिसतात. याशिवाय तुम्ही यावर सिक्वेन्स वर्क अथवा इलास्टिक पॅटर्नदेखील करून पाहू शकता. टसल नेकलाईनचा (Tassels Neckline) प्लेन ऑफ शोल्डर ब्लाऊजही साडी अधिक सुंदर आणि आकर्षक करण्यास मदत करतो. खणाचे ब्लाऊज डिझाईन देखील अशा साड्यांवर सुंदर आणि आकर्षक दिसतात.

व्ही नेक ब्लाऊज डिझाईन

व्ही नेक ब्लाऊज डिझाईन

Instagram

 

तुमचा आकार कसाही असो व्ही नेक ब्लाऊज डिझाईन (V Neck Blouse Design) नेहमीच तुमच्या शरीरयष्टीवर उठावदार दिसते. बस्ट लाईननुसार तुमच्या ब्लाऊजची डेप्थ तुम्ही ठरवू शकता. तुमची बस्टलाईन जर लहान असेल तर ब्लाऊजचा आकार लहान ठेवा. ज्या महिलांचे खांदे लांब आहेत आणि बस्टसाईज जास्त आहे त्यांनी ग्लॅमरस लुकसाठी व्ही नेक थोडा अधिक खोल ठेवला तरीही जास्त चांगले दिसते. तुम्हाला हवं तर तुम्ही मागच्या बाजूपेक्षा पुढेही जास्त खोल ठेऊ शकता. तुमच्या साडीनुसार तुम्ही हा व्ही नेक ब्लाऊज शिवा. त्यावर तुम्हाला जर कोणतीही कलाकुसर हवी असेल तर तुम्ही तसंही करून घेऊ शकता. 

की होल बॅक ब्लाऊज डिझाईन (Key Hole Back Blouse Design)

की होल बॅक ब्लाऊज डिझाईन (Key Hole Back Blouse Design)

Instagram

ADVERTISEMENT

 

तुम्हाला चौकौन अथवा गोलकार याशिवाय वेगळा ब्लाऊज हवा असेल तर तुम्ही की होल ब्लाऊज डिझाईनचा वापर करा. हे ब्लाऊज कोणत्याही साडीवर आकर्षकच दिसतात. कोणत्याही कार्यक्रमाला लक्ष वेधून घेणारे हे ब्लाऊज डिझाईन आहे. तुम्ही यामध्ये मोठे आणि सिंगल होल ठेवा. की होल ब्लाऊज डिझाईन्समध्ये तुम्ही गोलाकार, चौकोनी असे कोणत्याही स्वरूपाचे डिझाईन्स ठेऊ शकता. तसंच तुम्हाला अधिक अर्थात मल्टिपल की होल्सवाले डिझाईन्स आवडत असतील तर तुम्ही याचा आकार थोडा लहान ठेऊ शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही पुढे अथवा मागे की होल्स बनवून घ्या. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

07 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT