कोरोनामुळे सध्या मॉल अथवा दुकानात शॉपिंग करणं शक्य नाही. अनेक ठिकाणी लॉकडाऊन असल्यामुळे मॉल आणि दुकाने बंद आहेत. मात्र तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी ऑनलाईन खरेदी करू शकता. कारण ऑनलाईन शॉपिंगमध्ये कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन न करता खरेदी करता येते. ऑनलाईन कपडे अथवा इतर गोष्टी घेणं शक्य आहे. मात्र बऱ्याचदा ऑनलाईन शूज खरेदी करताना अनेक प्रश्न निर्माण होतात. यासाठीच फॉलो करा या टिप्स आणि बिनधास्त खरेदी करा ऑनलाईन फूटवेअर
साईज योग्य असायला हवी –
ऑनलाईन शूज खरेदी करताना तुम्हाला तुमच्या पायाची साईज माहीत असायला हवी. कारण जर साईज चुकीची ऑर्डर केली तर तुमची समस्या अधिकच वाढू शकते. आजकाल कोरोनामुळे रिर्टन पॉलिसी बऱ्याच ठिकाणी दिली जात नाही. यासाठी आधी तुमच्या पायाची साईज समजून घ्या आणि मगच ऑनलाईन खरेदी करा. शिवाय प्रत्येक ब्रॅंडची साईज वेगवेगळी असते. प्रॉडक्ट शेजारी शूजच्या साईजबाबत माहिती दिलेली असते. ती नीट वाचा आणि मगत ऑर्डर बूक करा.
pexels
पॉलिसी चेक करा –
ऑनलाईन शूज खरेदी करताना तुम्हाला खरेदी बाबत असलेली पॉलिसी चेक करायला हवी. अनेक कंपन्या रिर्टन पॉलिसी देतात. ज्यामुळे जरी तुमची साईज चुकली तरी तुम्ही ती बदलून घेऊ शकता. मात्र सध्या कोरोनामुळे काही ठिकाणी रिर्टन पॉलीसी उपलब्ध नाही. त्यामुळे पॉलिसी चेक करूनच खरेदीचा निर्णय घ्या.
प्रॉडक्टवरील माहिती नीट वाचा –
ऑनलाईन खरेदी करताना प्रत्येक वस्तूसोबत त्याची संपूर्ण माहिती देण्यात येते. जसं की फूटवेअर कोणत्या घटकांपासून तयार केलेले आहेत. हिल्स किती मोठे आहेत वगैरे. जर तुम्ही हे डिटेल्स व्सवस्थित वाचले तर तुम्ही तुमच्यासाठी योग्य तेच फूटवेअर निवडू शकता. शिवाय समजा जर तुम्हाला चुकीचं प्रॉडक्ट मिळालं तर तुम्ही कस्टमर केअरसोबत संपर्क साधून याबाबत कम्लेंट करू शकता.
फूटवेअर स्टाईल –
तुम्ही विकत घेत असलेल्या स्टाईलचे फूटवेअर तुमच्यासाठी योग्य आहेत का हे तुम्हाला त्या प्रॉडक्टशेजारी असलेली माहिती आणि रिव्हू वाचून समजू शकते. इतरांच्या अनुभवाचा फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी योग्य स्टाईलचे फूटवेअर ऑनलाईन शॉपिंग करून घेऊ शकता. जर तुम्ही पहिल्यांदाच वेगळ्या स्टाईलचे फूटवेअर खरेदी करणार असाल तर आधी एकच पेअर खरेदी करा. जर तुम्हाला ती स्टाईल आवडली तर तुम्ही आणखी फूटवेअर नक्कीच खरेदी करू शकता.
पार्सल येताच शूज ट्राय करा –
तुमच्याकडे ऑनलाईन पार्सलची डिलिव्हरी होताच तुम्ही तुमचे फूटवेअर ट्राय करायला हवेत. ज्यामुळे तुम्हाला ते व्यवस्थित येत आहेत की नाही ते समजेल. समजा जर तुम्हाला फूटवेअर नीट फिट होत नसतील आणि विक्रेता तुम्हाला रिर्टन पॉलिसी देत असेल तर ते लगेच बदलून घेता येतील.
pexels
सुरक्षित पेमेंट –
वेबसाईट अथवा एखाद्या अॅपवरून फूटवेअर खरेदी करताना पेमेंटसाठी सुरक्षित पर्याय आहे का हे आधी तपासून घ्या आणि मगच पेमेंट करा. कारण जर तुमच्यासाठी सुरक्षित पेमेंटचा पर्याय उपलब्ध नसेल तर खरेदी करू नका. आधी कस्टमर केअरसोबत संपर्क साधा आणि चौकशी करून घ्या. कारण आजकाल ऑनलाईन शॉपिंगमधून फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत. तेव्हा योग्य ठिकाणी आणि सावधपणेच खरेदी करा.
फोटोसौजन्य – pexels
अधिक वाचा
नाजूक स्टोन वर्क केलेल्या साड्यांची अशी घ्या काळजी