जर तुम्हाला निरोगी आणि फिट राहायचं असेल, वजन कमी करायचं असेल अथवा चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो हवा असेल कर वेगन डाएट (vegan diet) तुमच्यासाठी अगदी परफेक्ट डाएट आहे. आजकाल फिटनेससाठी अनेकजण हे डाएट फॉलो करत असतात. खरंतर वेगन डाएट हे केवळ एक डाएट नसून एक प्रकारची जीवनशैलीच आहे. आजकाल अनेक सेलिब्रेटी देखील सध्या या नव्या जीवनशैलीचा अवलंब करत आहेत. मात्र वेगन डाएटबाबत अनेक समज आणि गैरसमज आहेत. नावावरून हे डाएट म्हणजे नॉनव्हेज न खाता फक्त व्हेज खाणं अस काहीजणांना वाटत असतं. मात्र हे मुळीच खरं नाही. जर तुम्हालादेखील वेगन व्हायचं असेल तर काही गोष्टी तुम्हाला माहीत असायलाच हव्या.
जाणून घ्या वेगन डाएट कसं करतात
वेगन डाएटमध्ये केवळ फळं, भाज्या, तृणधान्य, डाळी, सुकामेवा यांचा समावेश केला जातो. मात्र एवढंच नाही तर या डाएटमध्ये दूध आणि दुधापासून तयार केलेले खाद्यपदार्थ म्हणजेच प्राण्यांपासून तयार केलेले पदार्थ टाळले जातात. वेगन डाएट हे शाकाहारी आहारापेक्षा थोडं अधिकच काटेकोरपणे पाळावं लागणारं एक डाएट आहे. या डाएटमुळे तुम्हाला पोषक तत्त्व भरपुर प्रमाणात मिळू शकतात. वेगन डाएटचे अनेक चांगले फायदे असले तरी जर तुम्ही वेगन होण्याचा विचार करत असाल तर या गोष्टी जरूर लक्षात ठेवा.
Vegan diat करण्यापूर्वी या गोष्टी जरूर लक्षात ठेवा
- या डाएटमधील सर्वच गोष्टी पौष्टिक असतील असं नाही. त्यामुळे जर तुम्हाला वेगन डाएट फॉलो करायचे असेल तर त्याबाबत सर्व गोष्टी आधीच समजून घ्या
- वेगन डाएटमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो आणि तुमच्या शरीराला कोणत्या गोष्टी खाणं गरजेचं आहे हे तज्ञांकडून समजावून घ्या.
- तुमच्या कुटुंब आणि मित्रमंडळींना वेगन डाएट आणि त्याबाबत पाळायच्या गोष्टींबाबत आधीच माहिती द्या.
- जर तुम्हाला ही जीवनशैली आचरणात आणताना काही आरोग्य समस्या जाणवत असतील तर तुम्हाला हे डाएट सूट होत नसून ते तुम्हाला बंद करण्याची गरज आहे हे ओळखा.
- जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर तुम्ही वेगन डाएट करू शकत नाही. कारण व्हिटॅमिन बी तुम्हाला डेअरी प्रॉडक्टस आणि अंड्यामधुन मिळू शकतं. अती परिश्रम करण्याऱ्या लोकांसाठी वेगन डाएट योग्य नाही. कारण या डाएटमधून त्यांच्या शरीराची झालेली झीज भरून निघू शकत नाही.
- वेगन डाएट सुरू करण्यापूर्वी काही दिवस आधीच याबाबत नीट विचार करा. कारण एखाद्या सकाळी अचानक उठून अथवा कोणीतरी करतंय म्हणून तुम्ही या डाएटला सुरूवात करू शकत नाही.
- या डाएटमुळे तुम्ही तुमच्या एखाद्या फेव्हरेट हॉटेल अथवा रेस्टॉरंटमध्ये काहीही खाऊ शकत नाही.
- मित्रमंडळी अथवा कुटुंबासोबत पार्टीला जाण्यापूर्वी तुम्हाला दहा वेळा विचार करावा लागू शकतो. कारण जर तिथे तुमच्यासाठी खाण्यायोग्य खाद्यपदार्थ नसतील तर तुम्हाला उपाशी राहवं लागेल.
- वेगन डाएट तुम्हाला एक अनामिक आनंद नक्कीच देऊ शकतं. ज्यामुळे तुम्ही सतत प्रसन्न राहू शकता.
- वेगन डाएट मधून तुम्हाला पुरेसे प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळू शकत नाहीत.
- त्यामुळे प्रोटिन्स मिळतील असे वेगन डाएटमधील इतर पर्याय शोधून काढा ज्यामुळे तुमच्या शरीराचं योग्य पोषण होईल.
- या डाएटमुळे तुमचं वारंवार जंकफूड खाण्यापासून बचाव होऊ शकतो.
- वेगन डाएट करताना तुम्हाला पुरेसे पाणी पिणं गरजेचं आहे. कारण तुम्ही या डाएटमधून मोठ्या प्रमाणावर फायबर्स घेत असता. जर तुम्ही फायबर घेताना योग्य प्रमाणात पाणी प्यायला नाही तर तुम्हाला आरोग्य समस्यांना तोडं द्यावं लागू शकतं.
- सतत पोट फुगण्याची समस्या, अॅसिडिटी, गॅसचा त्रास होत असेल तर तुम्ही हे डाएट फार काळ करू शकत नाही.
- तुम्हाला तुमचा आहार योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेवर घेण्याची सवय लावणं गरजेचं आहे.
- योग्य पोषण न झाल्यास तुम्हाला हॉर्मोनल असतुंलनाला सामोरं जावं लागू शकतं.
अधिक वाचा
डाएट करायचा विचार करुनही होत नाही डाएट,जाणून घ्या कारणं
डाएट न करताही कमी करता येऊ शकते वजन, वाचा टीप्स
जाणून घ्या नव्या Eco-Keto Diet बद्दल
फोटोसौजन्य – इन्साग्राम