अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आणि पोषक घटक असतात. यासाठीच दिवसभरात एक ते दोन अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो. सकाळी नाश्त्यामध्ये उकडलेलं अंडं खाण्याची अनेकांना सवय असते. उकडलेल्या अंड्यापासून अंड्याचे अनेक प्रकार बनवता येतात. मात्र त्यासाठी अंडी योग्य पद्धतीने उकडता यायला हवीत. बऱ्याचदा अंडी उकडताना ती पाण्यात फुटतात आणि त्यामुळे ती खाण्यात मजा येत नाही अथवा तुम्हाला एखादा खास पदार्थ बनवायचा असेल तर त्याचा वापर होत नाही. यासाठी जाणून घ्या अंडी उकडण्याची योग्य पद्धत…त्यासोबतच जाणून घ्या अंडी खाण्याचे फायदे | Benefits of Eating Eggs In Marathi

अंडी उकडण्यासाठी सोप्या टिप्स
अंडी उकडणं फारच सोपं आहे असं आपल्याला वाटतं. पण जर अंडी योग्य पद्धतीने उकडली नाहीत तर तुम्हाला त्याचा हवा तसा वापर करता येत नाही. यासाठी या टिप्स तुमच्या नक्कीच फायद्याच्या ठरतील.
- अंडी उकडण्याआधी ती फ्रीजमधून बाहेर काढा आणि नॉर्मल तापमानावर येऊ द्या मगच ती पाण्यात टाकून उकडण्यास ठेवा.
- अंडी उकडण्यासाठी ती थेट थंड पाण्यात टाकू नका. पाण्याला उकळ आली की मग गॅस कमी करा आणि एका मोठ्या चमच्याने अंडी अलगद पाण्यात सोडा.
- अंडी उकडताना ती पाण्यात पूर्ण पणे बुडतील याची काळजी घ्या. शिवाय गॅसची आंच नेहमी मध्यम ठेवा आणि अंडी फक्त दहा मिनीटेच उकडा.
- दहा मिनीट अंडी उकडली की त्यानंतर गॅस बंद करा आणि पुन्हा पाणी थंड होईपर्यंत अंडी पाण्यातच ठेवा.
- जर तुम्हाला अंडी जास्त उकडायची नसतील तर तुम्ही पाच ते सहा मिनीटे अंडी उकडू शकता. पण जर तुम्हाला हार्ड बॉईल अंडं खायला आवडत असेल तर मग कमीत कमी पंधरा मिनीटे अंडी उकडायला हवीत.
उकडलेली अंडी सोलण्यासाठी टिप्स
जसं अंडी उकडताना काळजी घ्यायला हवी तशीच काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही अंडी परफेक्ट सोलू शकता.
- पाण्यात चमचाभर मीठ टाका आणि मग पाणी उकळू द्या. उकळ आली की पाण्यात अंडी सोडा. पाण्यात मीठ टाकलं की उकडलेली अंडी सहज सोलता येतात.
- अंडी पाण्यातून बाहेर काढल्यावर ती लगेच थंड पाण्यात टाका ज्यामुळे सोलणं सोपं जाईल.
- उकडलेली अंडी तळहातावर घ्या आणि दोन्ही हातानी ती रोल करा. ज्यामुळे ती सोलणं सहज आणि सोपं होईल.
- उकडलेलं अंडं एखाद्या ग्लासात टाका आणि त्यात थोडं पाणी टाकून ग्लासाचे तोंड हाताने बंद करा. ग्लास जोरात हलवल्यानंतर अंड्याची साल आपोआप बाजूला होईल.
आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेल्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट करून जरूर सांगा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक