ADVERTISEMENT
home / Recipes
Chapati Recipe In Marathi

चपाती कशी बनवतात सोप्या टिप्स | Chapati Recipe In Marathi

पोळ्या (चपात्या) तर रोज आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. पण प्रत्येक जण वेगळ्या पोळ्या बनवत असतं. काही जण पोळ्या करायला जातात तेव्हा गोलाकार आणि मऊ पोळ्या त्यांना बनवता येत नाहीत. कितीही प्रयत्न केले तरी चपात्या गोलाकार होतात पण मऊ होत नाहीत असंही काही जणांच्या बाबतीत घडतं. खरं तर गोल आणि मऊ पोळ्या (Chapati In Marathi) बनवण्याची खास टेक्निक आहे. सगळ्यांनाच ती जमते असं नाही. पण तुम्हाला कायम अशा पोळ्या बनवायच्या (Chapati Recipe In Marathi) असतील तर आमच्याकडे नक्कीच त्याच्या काही खास टिप्स आहेत ज्या आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत. यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पोळीचे पीठ आणि पाण्याचे प्रमाण. हे अतिशय योग्य असायला हवे. जेव्हा ही कणीक जास्त वेळ तुम्ही तिंबून ठेवाल तितकी अधिक चांगली. पिठात पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर पोळी लाटताना ती चिकटेल आणि पाण्याचं प्रमाण कमी झालं तर पोळी भाजताना ती कडक होईल आणि नंतर चिवट होईल. त्यामुळे नक्की काय टिप्स आपण मऊ आणि गोलाकार पोळीसाठी (Chapati Mau Honyasathi Upay) वापरायच्या हे या लेखातून पाहूया. अर्थात गोलाकार चपाती कशी बनवतात याच्या काही खास टिप्स. 

मऊ चपातीची खास रेसिपी | Chapati Recipe In Marathi

Chapati Recipe In Marathi
Chapati Recipe In Marathi

मऊ चपाती कशी करावी अथवा चपाती कशी बनवावी यासाठी काही खास गोष्टी करणे आवश्यक आहे. काही जणांना चपाती बनवता येत नाही. मग अशा व्यक्तींसाठी खास टिप्स. सर्वात पहिल्यांदा आवश्यक आहे ते म्हणजे चपातीसाठी कणीक भिजवणे. ही कणीक जर नीट भिजली नाही तर पोळ्या अर्थात चपाती नीट बनवता येणार नाहीत. त्यामुळे आधी घडीच्या पोळ्या किंवा मऊ चपातीसाठी कणीक कशी हवी ते पाहूया. 

घडीच्या पोळ्या किंवा मऊ चपातीसाठी कणीक

Chapati Recipe In Marathi
Chapati Recipe In Marathi

सर्वात आधी लक्ष द्यायला हवं ते आपल्या पिठाकडे. इथे आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स देत आहोत ज्या युक्ती वापरून तुम्ही पोळ्या केल्यात तर त्या नक्कीच मऊ होतील आणि चिवट होणार नाहीत. 

  • कणीक मळताना पीठ घ्याल त्याच्या मध्ये खड्डा करून पाणी घाला. एक वाटी पीठ असेल तर अर्ध्यापेक्षा अगदी थोडं कमी वाटीत पाणी घ्या आणि पीठ भिजवा. या पिठाच्या पोळ्या अगदी मऊ आणि फुगणाऱ्या होतील. 
  • पीठ कोणत्याही गिरणीतील असो वा रेडीमेड असो कणीक भिजवत असताना पीठ आधी चाळून घ्या. कारण कितीही ब्रँडेड असलं तरीही त्यामध्ये काही प्रमाणात चर असते.
  • पोळ्या अर्थात चपाती बनवायची घाई करू नका. तुम्ही कणीक भिजवल्यानंतर किमान 10 मिनिट्स तरी त्यावर कपडा घालून तिंबत ठेवा. कणीक थोडा वेळ तिंबत ठेवल्यास, तुमच्या पोळ्या अधिक मऊ होतात. त्यामुळे आधी पोळ्यांची कणीक भिजवा आणि मग भाजी करायला घ्या. तोपर्यंत कणीक व्यवस्थित भिजेल आणि मगच पोळ्या करायला घ्या. यामुळे तुमचा स्वयंपाकघरातील वेळही वाचेल आणि कणीकही व्यवस्थित भिजून पोळ्या मऊ आणि मुलायम होतील. जास्त वेळ नसेल तर किमान 5-7 मिनिट्स तरी तुम्ही कणीक भिजवून ठेवा. त्याचा नक्कीच चांगला परिणाम होतो.
  • पोळीच्या कणकेत थोडं तूप अथवा तेल घाला आणि मग ते कपड्याने अर्धा तास झाकून ठेवा. असं केल्यामुळे पिठाचा वरचा थर कधीही कोरडा पडत नाही आणि पोळ्या अर्थात चपात्या अतिशय मऊ होतात. शिवाय काही जणांच्या पोळ्या फुगत नसतील तर त्यांनी हा उपाय नक्की करून पाहावा
  • तुम्हाला पोळी अगदीच मऊ हवी असेल तर तुम्ही कणीक भिजवताना त्यात दूध अथवा थोडंसं दही घालू शकता (तुम्हाला आवडत असल्यास)

गोल आणि मऊ चपाती कशी लाटावी

गोल आणि मऊ चपाती बनविण्याची एक ट्रिक असते. त्याप्रमाणे तुम्ही वापर केल्यास, तुम्हाला कधीही त्रास होणार नाही. जाणून घ्या सोपी पद्धत

ADVERTISEMENT
  • पोळ्या अर्थात चपाती करायला घेताना पीठ पुन्हा एकदा नीट मळून घ्यावे
  • पोळी लाटताना ती केवळ दोनच वेळा परता. जास्त वेळा परतवली तर ती फुगत नाही आणि त्याचा आकारही गोल येत नाही
  • लाटल्यानंतर पोळी जास्त वेळ तशीच ठेवू नका. असं केल्यास, कधीही पोळी फुगणार नाही त्याशिवाय भाजून काढल्यानंतर ती चिवट होते

मऊ चपातीसाठी ती कशी भाजावी

चपाती कशी भाजायची याचेही टेक्निक आहे. अन्यथा चपाती काही वेळात चिवट होते अथवा भाजताना करपते. त्यामुळे काही गोष्टी लक्षात ठेऊन त्याप्रमाणे चपाती भाजा 

  • कधीही अति आच अथवा मंद आचेवर पोळी शेकू नका. पोळी भाजण्यासाठी तव्याखालील गॅस हा कायम मध्यम आचेवर ठेवा
  • पोळी जेव्हा तुम्ही तव्यावर टाकता तेव्हा पहिली बाजू ही साधारण 30 सेकंदात परता जर तुम्हाला पोळी मऊ हवी असेल
  • पोळीवर परतत असताना जास्त पीठ लागले असेल तर ते कापडाने पुसून घ्या.  पीठ तसेच ठेऊ नका. पोळी दिसायला अतिशय घाण दिसेल पीठ तसेच ठेवल्यास, त्यामुळे भाजताना याकडे विशेष लक्ष द्या
  • पोळी लाटताना चिकटू नये म्हणून आपण त्यावर अतिरिक्त पीठ लावतो. पण लाटताना काही पीठ तसंच राहते. भाजताना मात्र तुम्ही हे अतिरिक्त पीठ कपड्याने झाडून काढा. कारण हे पीठ भाजताना जळते आणि मग पोळी अधिक काळी होते. अशी पोळी कडवट लागते आणि नंतर चिवट होते. मऊ राहात नाही. त्यामुळे पोळ्या करताना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. 

मऊ चपाती कशी बनवायची टिप्स | Tips For Soft Chapati

चपाती कशी बनवतात
चपाती कशी बनवतात

मऊ चपाती कशी बनवायची याच्या काही सोप्या टिप्स आहेत. तुम्ही या वापरून पोळी केली तर हमखास ती मऊच होणार. 

  • तुम्हाला मऊ पोळ्या हव्या असतील तर तुम्ही कणीक भिजवताना पाणी कोमट करून घ्या. तुमच्या पोळ्या जर मऊ होत नसतील तर तुम्ही या हॅकचा वापर नक्की करून पाहा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पिठामध्ये अर्धा चमचा तेल आधीच घालू शकता आणि मग कणीक भिजवा. ही अतियश उपयुक्त किचन हॅक आहे. लक्षात ठेवा. मऊ पोळ्या करण्यासाठी कशी कणीक भिजवावी हेदेखील महत्त्वाचे आहे
  • पोळी भाजताना गॅस मध्यम आचेवर ठेऊ नका. त्यामुळे पोळ्या अधिक चिवट होतात. मऊ पोळ्यांसाठी गॅस नेहमी मोठा ठेवा आणि पोळी पटकन परता. गोल आणि मऊ पोळ्या करण्यासाठी या सोप्या टिप्स वापरा
  • फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेच्या पोळ्या सहसा करून नयेत. यामुळे शरीराला हानी पोहचते. सर्वात पहिले हे लक्षात ठेवा की, भिजलेली कणीक ही जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेऊ नका. दुपारची कणीक तुम्ही रात्रीसाठी वापरू शकता. मात्र आज भिजवलेली कणीक दुसऱ्या दिवशी अर्थात 24 तासानंतर वापरणे योग्य नाही. त्यामुळे कणीक भिजवून जास्त उरणार नाही याची काळजी घ्या. 

मऊ पोळ्या खाण्याचे फायदे | Benefits Of Soft Chapati In Marathi

पोळी खाण्याचे अनेक फायदे आहेत. नक्की काय आहेत हे फायदे जाणून घ्या. गव्हाच्या चपातीमध्ये 57 कॅलरी असतात. पोळीला तूप लावल्याने कॅलरी वाढतात. मात्र तूप न लावता पोळी खाल्ल्यास त्याचाही फायदा होतो. यामध्ये लोह, कॅल्शियम, सेलिनियम, पोटॅशियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी याची मदत मिळते. पोळीवर तूप लावून खाण्याचे अप्रतिम फायदे होतात.

  • चपातीमध्ये अजिबात कोलेस्ट्रॉल नसते. त्यामुळे हृदयाशी संबंधित समस्यांना दूर राखण्यास मदत करते. 
  • यामध्ये असणारे सेलेनियम हे शरीरातील कॅन्सरची शक्यता धुसर करते. 
  • पोळीमधील लोहाचे प्रमाण रक्तातील कमतरता दूर करण्यास कमी ठरते. 
  • यामधील प्रोटीन आणि कॅल्शियम हे हाडांना अधिक मजबूत करतात आणि सांधेदुखीचा त्रास असेल तर पोळी नियमित खाण्याचा फायदा होतो 
  • मधुमेही व्यक्तींसाठी पोळी खाणे चांगले आहे. चपाती खाल्ल्याने शरीरातील इन्शुलिन आणि ग्लुकोजची पातळी नियंत्रित राहाते. त्यामुळे मधुमेहाची पातळी वाढत नाही. 
  • पोटॅशियम असल्याने रक्तदाबाची पातळी नॉर्मल ठेवण्यास याची मदत होते. 
  • फायबरचे प्रमाण चपातीमध्ये अधिक असल्याने किडनी स्टोन अर्थात मुतखडा होण्यापासून रक्षण मिळते. तसंच फायबर आणि कार्बोहायड्रेट असल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत मिळते.

प्रश्नोत्तरे | FAQ’s

1. दिवसातून किती पोळी खावी?
दिवसातून तुम्ही तुमच्या शरीराच्या उंची आणि जाडीनुसार पोळी खाण्याचे प्रमाण ठरवावे. मात्र योग्य आहार आहे की नाही हे पाहून मगच पोळीचेही सेवन करावे. 

ADVERTISEMENT

2. शिळी पोळी खाण्याचे फायदे आहेत का?
हो ज्याप्रमाणे ताजी पोळी खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्याचप्रमाणे शिळी पोळी खाण्याचेही फायदे आहेत. मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होऊ देऊ नये. 

3. पोळीमुळे शरीरात एनर्जी मिळते का?
हो. आपल्यापैकी काही व्यक्तींना थोडंसं काम केलं तरी थकायला होतं. अशा व्यक्तींसाठी पोळी म्हणजे एनर्जी बूस्टरचं काम करते. वास्तविक या पोळीमध्ये कार्बोहायड्रेड्स असतात जे तुमच्या शरीरातील कमतरता पूर्ण करतात. ज्यामुळे तुमच्या शरीराला लगेज एनर्जी मिळते आणि तुम्हाला उत्साही वाटतं.

18 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT