ADVERTISEMENT
home / Mental Health
अतिविचार करण्याच्या सवयीमुळे आहात हैराण, करा ‘हे’ उपाय

अतिविचार करण्याच्या सवयीमुळे आहात हैराण, करा ‘हे’ उपाय

काही जणांना अगदी किरकोळ गोष्टींवरूनही अतिविचार करण्याची सवय असते. अतिविचारांमुळे आपल्या कित्येक महत्त्वाच्या कामांवरही परिणाम होतो. उदाहरणार्थ कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रीत होत नाही, भूक लागत नाही, झोप येत नाही, नैराश्य येते. महत्त्वाचीच कामे नाही तर अगदी सामान्य क्रियांमध्येही अतिविचार करण्यामुळे अडथळे निर्माण होतात. दिवस कसाबसा सरतो, पण रात्रीच्या वेळेस मात्र झोपताना बराच त्रास होतो. कारण दिवसभर केलेल्या कामांमुळे थकल्यानंतरही रात्रीची झोप काही केल्या येत नाही. सतत विचार-चिंता करण्यामुळे आपल्या मेंदूसह संपूर्ण शरीरावर दुष्परिणाम होतात.

खाली नमूद केलेल्या दोन कारणांमुळे मेंदूचे कार्य बिघडते, परिणाम संपूर्ण शरीरावर वाईट परिणाम होतो :

1. भूतकाळात घडलेल्या गोष्टींवर विचार करणे
भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींवर जेव्हा आपण सतत विचार करतो, तेव्हा आपली नकारात्मक विचारसणी अधिक प्रभावी ठरते. नकारात्मक विचारांमुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होऊ शकतात.

2. सतत भविष्याचा विचार करणे
ज्या प्रमाणे काही जणांना भूतकाळात घडलेल्या गोष्टींवर चिंतन करण्याची सवय असते. तसंच काहींना सतत भविष्याची चिंताही सतावते. यामुळे वर्तमानात काय घडतंय याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष होते.

ADVERTISEMENT

(वाचा : वजन वाढवायचं आहे, करा खिशाला परवडणारे ‘हे’ घरगुती उपाय)

नेमके कोणत्या कारणांमुळे अतिविचार करण्याची समस्या उद्भवते ?

आपल्या आसपास घडणाऱ्या कित्येक घटना सतत डोक्यात आणून लोक अतिविचार करू लागतात. या घटना खालील प्रकारच्या असू शकतात :

– जेव्हा तुमचं एखाद्या व्यक्तिसोबत भांडण होते, तेव्हा नकळत आपण समोरच्याच मन तर दुखावलं नाही ना? या विचारानं आपला मेंदू ग्रासला जातो.

ADVERTISEMENT

– जेव्हा एखाद्यासोबत वादविवाद करताना आपण कसे जिंकू शकलो असतो, हा विचार करण्यात आपण वेळ वाया घालवतो.

– आपल्या नियंत्रणात नसलेल्या गोष्टींवर अधिक विचार केला जातो.

– लोक आपल्याबाबत काय म्हणत आहेत? ते आपल्या कामाबाबत काय म्हणत आहेत? अशा निरर्थक गोष्टींचा आपण विचार करतो.

– एखाद्याच्या सोबतीनं आपण खूप काही चांगल्या गोष्ट घडवू शकतो, मनात अशी इच्छा बाळगतो. पण बहुतांश वेळा प्रत्यक्षात असं काही घडणं शक्य देखील नसतं. 

ADVERTISEMENT

– स्वतःच्या चुकीच्या निर्णयावर वारंवार विचार करतो.

– तुम्ही स्वतःच भूतकाळात गुंतून राहण्यास मनावर सक्ती करता.

(वाचा : चंचल मन एकाग्र ठेवण्यासाठी करा ‘या’ 5 योगासनांचा सराव)

ADVERTISEMENT

अतिविचाराच्या सवयीपासून अशी मिळवा सुटका

करिअर, प्रेम, मैत्री, संसार अशा अनेक गोष्टींमुळे नैराश्य, अतिविचार करण्याची समस्या निर्माण होते. अतिविचारांच्या त्रासातून सुटका हवी असल्यास खालील उपाय करून पाहा.

1. समस्येच्या निराकरणाचा अभ्यास करा
समस्येचं निराकरण व्हावं, यासाठी तुम्ही विशेष उपाययोजना राबवू शकता. एखाद्या अडचणीसंदर्भात विचार करताना, अतिविचार न करता समस्येचे निराकरण कसे करू शकता यावर जास्त भर द्या.

2. आपल्या विचारांवर चिंतन करा
वास्तविकरित्या काही समस्या नियंत्रणात आणणं आपल्या हातात आहे की नाही? याचा निर्णय घेण्याचा प्रयत्न करा. ही रणनीती तुमचे अतिविचार थांबवण्यात मदत करेल.

3. विचार करताना स्वतःला पारखा
एखाद्या गोष्टीचा विचार करताना स्वतःलाही पारखून पाहा. एखाद्या परिस्थितीत आपण कशा पद्धतीनं प्रतिक्रिया व्यक्त करतो, आपण कसं वागतो, या गोष्टींचं तुम्ही स्वतः निरिक्षण करून पाहा. यानंतर संबंधित गोष्टीवर जास्त विचार करणं योग्य आहे की अयोग्य? हे देखील ठरवा.

ADVERTISEMENT

4. ध्यानधारणा
ध्यानधारणेमुळे आपण चंचल मन नियंत्रित करू शकतो, असं संशोधनकर्त्यांचं म्हणणं आहे. यामुळे ज्या गोष्टी, विचार महत्त्वपूर्ण नाहीत… त्यापासून विभक्त होण्यास तुम्हाला मदत मिळते. मन शांत करण्यासाठी कमीतकमी 20 मिनिटांसाठी ध्यानधारणा करावी.

5. अन्य गोष्टींमध्ये मन गुंतवा
तुम्हाला ज्या गोष्टींमुळे त्रास होतोय, त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात करा. दुर्लक्ष करण्याची सवय प्रभावी ठरू शकते. मैदानी खेळ खेळा, चित्र काढा, एखादी नवी कला शिका, पोहोयला जा अशा निरनिराळ्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करा.

(वाचा : चिंतामुक्त होण्यासाठी करा ही पाच योगासने)

हे देखील वाचा :

ADVERTISEMENT

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

08 Jan 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT