ADVERTISEMENT
home / घर आणि बगीचा
लहान घरदेखील वाटेल प्रशस्त आणि मोठं, फॉलो करा या सोप्या टिप्स

लहान घरदेखील वाटेल प्रशस्त आणि मोठं, फॉलो करा या सोप्या टिप्स

आपलं घर अलिशान आणि प्रशस्त असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र कधी कधी बजेटमुळे तर कधी कधी जागेअभावी अनेकांना लहान घरातच समाधान मानावं लागतं. मात्र जरी तुमचं घर लहान असलं तरी योग्य सजावट करून तुम्ही ते प्रशस्त करू शकता. लहान घरदेखील अगदी छोटे छोटे बदल करून सूटसुटीत आणि  मोकळं ठेवता येऊ शकतं. यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरातील फर्निचर आणि इतर सामान जितकं कमी ठेवता येईल तितकं कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे तुमच्या घरात अडचण होणार नाही. त्याचप्रमाणे घराचा आकार मोकळा दिसण्यासाठी तुम्हाला घरात फक्त या पाच गोष्टींमध्ये बदल करावे लागतील. यासाठी जाणून घ्या कोणते पाच बदल करून तुम्ही तुमचे घर प्रशस्त करू  शकता. 

भिंतींचा रंग –

जर तुम्हाला तुमचे घर मोठे आणि प्रशस्त दिसावे असं वाटत असेल तर कधीच घरातील भिंतींना गडद रंग देऊ नका. कारण गदड छटा असलेल्या रंगांमुळे तुमच्या घराचा आकार डोळ्यांना लहान झाल्यासारखा वाटतो. त्यापेक्षा घराच्या भिंतींना सौम्य छटा असलेले रंग द्या. ज्यामुळे तुमचं घर आकाराने मोठं आहे असं तुम्हाला वाटेल. यासाठी तुमच्या आवडीच्या रंगाच्या सौम्य छटा असलेले रंग निवडा. ब्राईट कलर्स आणि प्रकाश योजनेचा योग्य वापर करा. कारण यामुळे तुमचे घर जास्त प्रकाशमय दिसेल.  सहाजिकच यामुळे ते मोठं आहे असं तुम्हाला वाटू लागेल. 

Instagram

ADVERTISEMENT

प्रकाश योजना-

घरात सुख समाधान नांदण्यासाठी घर नेहमी हवेशीर आणि प्रकाशमय  असावं. मात्र यासाठी एसी अथवा कृत्रिम लाईट्सचा वापर करण्यापेक्षा घरात जास्तीत जास्त सुर्याचा प्रकाश येईल अशी योजना करणं जास्त फायदेशीर आहे. कारण नैसर्गिक प्रकाशामुळे तुमचं घर प्रशस्ततर वाटेलच शिवाय घरात सतत सकारात्मक ऊर्जा नांदेल. म्हणूनच शक्य असल्यास घराच्या खिडक्या मोकळ्या ठेवा.

Instagram

अॅडजस्टेबल फर्निचर –

घरात नेहमी फर्निचर कमीत कमी असेल याची काळजी घ्यायला हवी. कारण जर तुमचं घर लहान असेल तर अवाढव्य फर्निचर तुमच्या घरातील सर्व जागा व्यापून टाकेल. आजकाल बाजारात अॅडजस्ट करता येतील अशा फर्निचरचे  प्रकार उपलब्ध असतात. असं फर्निचर काम झाल्यावर पुन्हा फोल्ड करून ठेवता येतं. शिवाय अशाप्रकारे एकाच फर्निचरचा तुम्ही अनेक गोष्टींसाठी वापर करू शकता. त्यामुळे घरासाठी असं फर्निचर विकत घ्या ज्यामुळे तुमचं घर मोकळं दिसेल. 

ADVERTISEMENT

Instagram

आरशाचा वापर –

आजकाल घराचा आकार मोठा दिसावा यासाठी इंटेरिअरमध्ये आरशाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. तुम्ही देखील तुमच्या घराच्या इंटेरिअरमध्ये ही युक्ती वापरू शकता. भिंतीवर आरशाचा वापर केल्यामुळे घर खूप मोठं, प्रशस्त आणि मोकळं आहे असं वाटू शकतं. 

ADVERTISEMENT

Instagram

मोठ्या एक्सेसरीज –

बऱ्याचदा  घर सजवण्यासाठी आपण छोट्या छोट्या पेंटिग्ज, फ्रेम्स, पोस्टरचा वापर करतो. मात्र असं न करता एकाच मोठया एक्सेसरीजचा वापर करा. जसं की भिंतींवर एकच मोठं पोस्टर, फ्रेम लावा. ज्यामुळे सर्व फोकस तिच्यावर होईल आणि भिंत आणि घर मोठं वाटू लागेल.

Instagram

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

नैसर्गिक पद्धतीने घर निर्जंतूक करण्याच्या सोप्या टिप्स

घराची सजावट करून द्या घराला नवा लुक, करा स्वस्तात मस्त सजावट (Home Decor Ideas In Marathi)

ADVERTISEMENT

घराच्या सौदर्यांत भर टाकणाऱ्या ‘कॉटन आणि हँडलूम’ पडद्यांच्या टेंडविषयी बरंच काही… (Curtains For Home Decoration In Marathi)

स्वप्नातलं घर साकारायचंय, ही घ्या मुंबईतील बेस्ट इंटिरिअर डिझायनर्सची यादी

10 Jul 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT