Advertisement

बॉलीवूड

बॉलीवूडच्या अभिनेत्रींनाही भुरळ घातली आहे नव्या फ्लोरल साड्यांनी

Dipali NaphadeDipali Naphade  |  Apr 1, 2020
बॉलीवूडच्या अभिनेत्रींनाही भुरळ घातली आहे नव्या फ्लोरल साड्यांनी

Advertisement

बॉलीवूडच्या अभिनेत्री या अगदी  साड्यांपासून ते मॉडर्न कपड्यांपर्यंत नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असतात. साडी हा खरं तर अगदी सामान्यांच्याही आवडीचा विषय मग अभिनेत्री तरी कशा मागे राहतील. सध्या फ्लोरल साड्यांचा ट्रेंड दिसून येत आहे. बऱ्याच अभिनेत्री या फ्लोरल साड्यांच्या प्रेमात असल्याचं दिसून येत आहे. सध्या सगळेच घरात आहेत. पण तरीही अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी गेल्या महिन्याभरापूर्वी काही कार्यक्रमांना हजेरी लावली होती आणि त्यांना त्यावेळी पसंती दिली होती ती फ्लोरल साडीला. ही साडी अतिशय हलकी असून सांभाळायला तर उत्कृष्ट आहेच. पण त्याशिवाय ही दिसायलाही स्टायलिश दिसते. पाहूया कोणकोणत्या अभिनेत्रींना पाडली आहे या फ्लोरल साडीची भुरळ. 

1. काजोल

काजोल बरेचदा आपल्याला साडीमध्ये दिसते. सध्या काजोलही फ्लोरल साडीच्या प्रेमात आहे. तुम्हाला जर संपूर्ण साडीवर केवळ फुलं आवडत नसतील तर तुम्हाला काजोलसारखी फ्लोरल साडी नक्कीच आवडेल. तोरानीची निळ्या रंगाची ही फ्लोरल साडी काजोलने नेसली आहे. इतर नेहमीच्या फ्लोरल प्रिंट्सपेक्षा यावर झाड्यांच्या फांद्या आणि पक्षांसह विविध फुलं डिझाईन करण्यात आली आहेत. काजोलचा हा लुक खूपच अप्रतिम असून प्रत्येकालाच आवडेल असा आहे. 

2. कतरिना कैफ

उन्हाळ्याच्या दिवसात पेस्टल्स नेहमीच उत्कृष्ट ठरते. कतरिनाने नेसलेली ही साडी गडद आणि फिकट अशा गुलाबी रंगाची असून यावर गडद आणि फिकट अशाच रंगाचे फ्लोरल प्रिंट्स आहेत. त्यामुळे ही साधी आणि सिंपल असली तरीही स्टायलिश दिसत आहे. त्याप्रमाणेच ती कतरिनाने अप्रतिमरित्या कॅरी केली आहे. याबरोबर तुम्ही अगदी फिकट मेकअप टच दिलात तर तुम्हीही सुंदर दिसाल

अजय देवगणच्या निसाला कोरोनाची लागण, काय म्हणाला अजय

3. प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्रा ही कोणत्याही कपड्यांमध्ये अगदी  बिनधास्त वावरते. तिचा आत्मविश्वास झळकतो. प्रियांकाने नेसलेली ही काळी फ्लोरल प्रिंटची साडी तुम्ही कोणत्याही कार्यक्रमासाठी वापरू शकता. यावरील पांढऱ्या, गुलाबी आणि पीच रंगामुळे या साडीची शोभा अधिक वाढवली आहे. तुम्हालाही फ्लोरल साडीची भुरळ पडली असेल तर तुम्ही अशा तऱ्हेच्या साड्या नक्कीच निवडू शकता. 

4. दीपिका पादुकोण

अशी अभिनेत्री जी साडीमध्ये खूपच सुंदर दिसते. दीपिकाने नेसलेल्या या साडीवर चंकी फ्लोरल प्रिंट्स आहेत. अर्थात यावरील प्रिंट्स मोठे असले तरीही दीपिकाला ते शोभून दिसत आहे. तुम्ही जर उंच असाल तर तुम्ही अशी मोठे फ्लोरल प्रिंट्स असणारी साडी नक्कीच छानपैकी कॅरी करू शकता. 

होम क्वारंटाईनमध्ये फिट राहण्यासाठी ‘या’ अभिनेत्री करत आहेत योगा

5. अनुष्का शर्मा

शिमरी बॉर्डर असणारी अनुष्का शर्माची ही फ्लोरल प्रिंट साडी तुम्ही जर नववधू असाल तर तुम्हाला नक्कीच शोभून दिसेल. घरच्या कोणत्याही कार्यक्रमांना तुम्हाला वर्षभरात अशा स्वरूपाची साडी नेसता येईल. या साड्या सांभाळायला अतिशय सहज असतात. जडही नसतात.  त्यामुळे तुम्हाला साडीमध्ये कसं वावरायचं असा प्रश्नही उद्भवणार नाही. 

6. करिना कपूर

Instagram

करिना कपूर ही बॉलीवूडमधील दिवा आहे. करिना जी फॅशन करते ती आजची तरूण पिढीही अजूनही फॉलो करते. करिनाने नेसलेली ही फ्लोरल प्रिंटची साडी अतिशय हलकी असून असा फिकट रंग तिच्यावर उठून दिसत आहे. तुम्हालाही जास्त फुलं असणारी साडी आवडत नसेल तर तुम्ही अशा स्वरूपाची साडी नक्की नेसू शकता.

स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बरचं लग्न तुटण्याच्या मार्गावर

7. माधुरी दीक्षित

बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित आजही साडीमध्ये दिसली की लाखो लोकांची धडकन थांबते असं म्हणतात. माधुरी साडीमध्ये अतिशय सुंदर दिसते. अशाच या काळ्या रंगाच्या फ्लोरल साडीमध्ये माधुरीचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. तुम्हालाही अशा सुशोभित साड्या आवडत असतील तर तुम्ही नक्की या साड्या ट्राय करा.