प्रत्येक व्यक्ती ही आपल्या राशीनुसार वागत असते. राशीनुसारच व्यक्तीचा स्वभाव आणि गुण ठरत असतात. काही राशीच्या व्यक्तींचे एकमेकांबरोबर खूपच पटते तर काही राशींच्या व्यक्तींबरोबर अजिबातच पटत नाही. आपण कोणाशीही ठरवून मैत्री करत नाही अथवा शत्रुत्व पत्करत नाही. पण राशीनुसार असं होते हे नक्की. प्रत्येक माणसाच्या स्वभावानुसार त्याचे एकमेकांशी पटते अथवा भांडण होत असते. आपण आपल्या राशीनुसार कोणत्या राशींशी मैत्री होऊ शकते आणि कोणत्या राशीच्या व्यक्ती शत्रू होऊ शकतात हे या लेखातून पाहणार आहोत. आपण कितीही नाही म्हटलं तरी हा एक अभ्यास आहे. उगीच काहीतरी वाटेल ते ज्योतिषशास्त्रात सांगितले जात नाही. योग्य गणित मांडून त्याचप्रमाणे राशीनुसार व्यक्तींचा अभ्यास यामध्ये करण्यात येतो. पाहूया नक्की कोणत्या राशीचे कोण मित्र आहेत आणि कोण आहेत शत्रू.
मेष (21 मार्च – 19 एप्रिल)
मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. त्यामुळे या राशीची माणसं ही लीडरशिप करणारी असतात. यांना कोणाचंही इतरांचं वर्चस्व चालत नाही. त्यामुळे या राशीसाठी कर्क, तूळ आणि धनु या तीन राशी मित्र राशी असून मिथुन, सिंह आणि कन्या या तीन राशी शत्रू राशी असतात. मित्र राशींशिवाय मेष रास असणाऱ्या व्यक्तींचं पान हलत नाही. मात्र शत्रू राशीच्या व्यक्तींशी त्यांचं अजिबातच जमत नाही.
वृषभ ( 20 एप्रिल – 20 मे)
Shutterstock
या राशीचा स्वामी शुक्र ग्रह असतो. जो संपत्ती, धन, नाते, सौंदर्यप्रसाधन यासारख्या विषयांवर आपले प्रभुत्व गाजवतो. या व्यक्ती जन्मापासूनच जिद्दी आणि हेकेखोर स्वभावाच्या असतात. त्यामुळे यांना मैत्री आणि शत्रुत्व दोन्ही समजून उमजून करणे आयुष्यात गरजेचे असते. यांच्यासाठी कन्या, मकर आणि कुंभ या राशी मित्र राशी असून वृश्चिक आणि धनु या शत्रु राशी आहेत.
मिथुन (21 मे – 21 जून)
या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. या व्यक्ती एखाद्या राजापेक्षा कमी नाहीत. कोणत्याही व्यक्तीला आपल्याकडे पटकन आकर्षित करून घेण्यात या व्यक्तींचा हात कोणीच धरू शकत नाही. यांच्या या वैशिष्ट्यामुळे बरेच लोक यांच्यावर जळतात. पण यांना आयुष्यात खूपच सांभाळून राहण्याची गरज असते. यांच्यासाठी कन्या, तूळ आणि कुंभ या मित्र राशी असून मेष, कर्क आणि वृश्चिक या शत्रू राशी आहेत.
कर्क (22 जून – 22 जुलै)
या राशीचा स्वामी चंद्र असतो. या व्यक्ती अतिशय उत्तम विचार आणि कमालीच्या कल्पनाशक्ती असणाऱ्या असतात. मात्र या व्यक्ती आपल्या नावडत्या व्यक्तींच्या भावनांची कधीही कदर करत नाहीत. त्यामुळे यांचे शत्रू जास्त असतात. या व्यक्तींच्या तूळ, वृश्चिक, मीन आणि कुंभ या मित्र राशी असून सिंह, मिथुन आणि कन्या या शत्रू राशी आहेत.
सिंह (23 जुलै- 22 ऑगस्ट)
Shutterstock
या राशीचा स्वामी हा सूर्य ग्रह आहे. या व्यक्ती अतिशय उत्साही आणि सकारात्मक विचारांच्या असतात. जिथे जातात तिथे आपली छाप सोडून येतात. कितीही गर्दीमध्ये आपली एक वेगळी छाप सोडायच्या यांच्या या वैशिष्ट्यामुळे यांना जास्त प्रमाणात शत्रू असतात. मेष, वृश्चिक आणि मीन या सिंह राशीच्या मित्र राशी असून तूळ, धनु, कर्क आणि मकर या शत्रू राशी आहेत.
कन्या (23 ऑगस्ट – 22 सप्टेंबर)
या राशीचा स्वामी बुध आहे. मुळातच हा बुद्धीचा ग्रह असल्याने या राशीच्या व्यक्तींना चांगली समज असते आणि यांचे व्यक्तीमत्वही आकर्षक असते. या व्यक्ती मैत्री करतानाही अतिशय विचारपूर्वक करतात. भारंभार मित्र या व्यक्ती करत नाहीत. वृषभ, कुंभ आणि मकर या कन्या राशीच्या मित्र राशी असून धनु, मेष आणि कर्क या परमशत्रू राशी आहेत.
राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली
तूळ (23 सप्टेंबर – 22 ऑक्टोबर)
या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. राग आणि अन्य गोष्टींवर नियंत्रण ठेवणे या व्यक्तींना खूपच चांगले जमते. तसेच सगळ्या गोष्टीमध्ये ताळमेळ साधण्याचा या व्यक्ती प्रयत्न करत असतात. मिथुन, कर्क, कुंभ या राशी तूळ राशीसाठी मित्र राशी आहेत तर धनु आणि मीन या राशींच्या व्यक्तींशी यांचे अजिबातच पटत नाही.
वृश्चिक (23 ऑक्टोबर – 21 नोव्हेंबर)
या राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. या व्यक्ती अतिशय चतुर आणि खूपच स्मार्ट असतात. या व्यक्तींना सर्वगुणसंपन्न म्हणणे अजिबातच चुकीचे ठरणार नाही. प्रत्येक काम या व्यक्ती बारकाईन करतात आणि तेदेखील शांत राहून. या व्यक्ती स्वतः कितीही आरडाओरड करणाऱ्या असल्या तरीही कामात मात्र अतिशय शांत आणि विचारपूर्वक यांची पावलं असतात. या राशीच्या सिंह, कर्क आणि मीन या मित्र राशी असतात तर मकर, मिथुन आणि कन्या या राशीच्या व्यक्ती यांना अजिबातच आवडत नाहीत. यांच्यापासून चार हात लांब राहणंच यांना आवडतं.
धनु (22 नोव्हेंबर – 21 डिसेंबर)
Shutterstock
या राशीचा स्वामी गुरू ग्रह आहे. या व्यक्ती सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंग या गोष्टींवर विश्वास ठेवतात. त्याच आधारावर यांचे आयुष्य असते. यांना अतिशहाणे आणि हेकेखोर लोक अजिबात आवडत नाहीत. त्यामुळेच वृश्चिक, कर्क आणि मीन या तीन राशीच्या व्यक्ती यांच्या मित्र असतात तर वृषभ, मेष आणि तूळ राशीच्या व्यक्ती यांच्या शत्रू राशी आहेत.
जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कोणते पदार्थ ठरतात फायदेशीर आणि घातक
मकर (22 डिसेंबर – 19 जानेवारी)
या राशीचा स्वामी शनि आहे. या व्यक्ती खूपच महत्वाकांक्षी असतात. प्रत्येक काम मनापासून आणि मेहनतीने या व्यक्ती करतात. गर्दीपेक्षा वेगळं काहीतरी करून दाखवण्याची क्षमता यांच्याकडे असते. वृषभ, कन्या, कुंभ या राशी यांच्या मित्र राशी असून सिंह, वृश्चिक आणि मीन या शत्रू राशी आहेत.
कुंभ (20 जानेवारी – 18 फेब्रुवारी)
या राशीचा स्वामी शनि आहे. प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे स्वतःला अॅडजस्ट करणं या व्यक्तींना चांगलंच जमतं. कोणत्याही परस्थितीत जमवून घेणाऱ्या या व्यक्ती आहेत. मात्र कोणतीही चूक या व्यक्तींना चालत नाही. वृषभ, कन्या, कुंभ या राशी यांच्या मित्र राशी असून सिंह, वृश्चिक आणि मीन या शत्रू राशी आहेत.
राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव
मीन ( 19 फेब्रुवारी – 20 मार्च)
या राशीचा स्वामी ग्रह गुरू आहे. या व्यक्ती खूपच काळजी घेणाऱ्या आणि दयाळू असतात. नेहमी दुसऱ्यांची मदत करण्यासाठी पुढे असतात. पण यांच्या स्वभावाचा फायदा उचलणारेही खूप असतात. यांच्यासाठी कर्क, धनु आणि वृश्चिक या मित्र राशी आहेत तर वृषभ, तूळ आणि कुंभ या शत्रू राशी आहेत.