आपण अनेकदा लोकांना उन्हाळी लागणे असं बोलताना ऐकतो. मात्र प्रत्येकाला त्याचा अर्थ माहीत असतोच असं नाही. उन्हाळी लागण्याची कारणे अनेक आहेत. यासाठी उन्हाळी लागणे म्हणजे काय प्रत्येकाला माहीत असायला हवं. उन्हाळी लागणे (Dysuria or Painful Urination) म्हणजे प्रोस्टेट ग्रंथीना सूज येऊन लघवी करताना दाह जाणवणे. साधारणपणे मूत्रमार्गात इनफेक्शन झाल्यामुळे बऱ्याचदा उन्हाळी लागण्याचा त्रास जाणवतो. कधी कधी एखाद्या गंभीर आजारामुळे अथवा आजारपणात घेतलेल्या अति औषधांमुळेही उन्हाळी लागू शकतात. उन्हाळी लागल्यास लघवीच्या जागी तीव्र वेदना आणि जळजळ जाणवते. उन्हाळी लागल्यावर लघवी करणं खूपच त्रासदायक वाटू लागतं. यासाठी जाणून घ्या उन्हाळी लागण्याची कारणे, उन्हाळी लागणे लक्षणे आणि उन्हाळी लागणे घरगुती उपाय (Unhali Lagne Gharguti Upay) सोबतच वाचा लघवीच्या जागी जळजळ होणे घरगुती उपाय | Urine Infection Home Remedies In Marathi
Table of Contents
उन्हाळी लागण्याची कारणे – Unhali Causes In Marathi
या आरोग्य समस्येची कारणे समजल्यास उन्हाळी लागणे उपाय करणं जास्त सोपं जातं. यासाठी जाणून घ्या ही काही उन्हाळी लागण्याची महत्त्वाची कारणे
युरिनरी ट्रॅक इनफेक्शन आहे उन्हाळी लागण्याचे कारण
उन्हाळी लागण्याचं मुख्य कारण युरिनरी ट्रॅक इनफेक्शन (Urinary Tract Infection) म्हणजेच मूत्रमार्गात झालेलं इनफेक्शन असू शकतं. कारण जर तुमच्या मूत्र विसर्जित करण्याच्या मार्गात कुठेही इनफेक्शन झालं तर त्यामुळे लघवीला जळजळ आणि वेदना जाणवू शकतात. अशा परिस्थितीत वारंवार लघवीला होणं, लघवी करताना वेदना होणं अथवा लघवीवाटे रक्त पडण्याची जास्त शक्यता असते. पुरुषांच्या तुलनेत महिलांना हा त्रास जास्त प्रमामात जाणवतो कारण महिलांचा मूत्रमार्ग हा पुरूषांपेक्षा लहान असतो ज्यामुळे त्या भागात सहज जीवजंतूंचा प्रवेश होतो.
सेक्सुअली ट्रान्समिटेड इनफेक्शन असू शकते उन्हाळी लागण्याचे कारण
सेक्सुअली ट्रान्समिटेड इनफेक्शन (Sexually Transmitte) म्हणजेच यौनसंबधांमधून पसरलेले आजार लघवीच्या संसर्गासाठी जास्त प्रमाणात कारणीभूत ठरतात.अशा प्रकारचे एखादे संक्रमण जर झाले तर तुम्हाला लघवीला जळजळ जाणवते आणि त्या जागी प्रचंड वेदना होतात. बऱ्याचदा अशा वेळी योनी मार्ग अथवा पुरूषांच्या जननेंद्रियातून स्त्राव बाहेर पडू लागतो. प्रायव्हेट पार्टवर लालसर चट्टे आणि फोड येतात. मात्र असे संक्रमण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार करणं गरजेचं आहे.
प्रोस्टेट इनफेक्शन उन्हाळी लागण्याचे कारण असू शकते
(Prostate Infection) प्रोस्टेट इनफेक्शनचा त्रास पुरूषांना होतो. कारण जेव्हा त्यांच्या मूत्रमार्गाला इनफेक्शन होते तेव्हा त्याला प्रोस्टेटिस असं म्हणतात. या परिस्थितीत प्रोस्टेट ग्रंथी सूजते आणि खूप वेदना होतात. बऱ्याचदा चुकीच्या असुरक्षित सेक्समुळेही पुरुषांना हा त्रास जाणवू शकतो. मूत्रमार्ग सूजल्यामुळे लघवी करणं कठीण होतं. त्यामुळे या समस्येकडे मुळीच दुर्लक्ष करू नये. वेळीच योग्य ते उपचार करणं गरजेचं आहे.
मुतखडा आहे उन्हाळी लागण्याचे कारण
(Kidney Stones) मुतखडा म्हणजेच किडनीस्टोन होण्याची अनेक कारणं असू शकतात. मात्र किडनीस्टोन असल्यास तुम्हाला उन्हाळी लागण्याची शक्यता दाट असते. मुतखडा झाल्यामुळे तुमची लघवी व्यवस्थित बाहेर पडत नाही ज्यामुळे तिचा रंग बदलतो. अशा वेळी ताप येणं, उलट्या होणं अशा अनेक समस्या जाणवू शकतात. मात्र यासाठी वेळीच मुतखड्याची लक्षणं, कारणं आणि योग्य उपचार तुम्हाला माहीत असायला हवे. जाणून घ्या मुतखडा पडण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies For Kidney Stone In Marathi)
काही औषधोपचार (Medication)
एखाद्या गंभीर आजारपणात घेतलेल्या औषधांचा परिणाम उन्हाळी लागणं असू शकतं. कारण अशा आजारांमध्ये देण्यात येणारी औषधे ही जास्त स्ट्रॉंग असतात. त्यातील उष्ण घटक तुमच्या शरीराला सहन होत नाहीत ज्यामुळे तुम्हाला उन्हाळी लागण्याचा त्रास सहन करावा लागतो. यासाठी औषधोपचार घेणं जरी गरजेचं असलं तरी त्याचा दुष्परिणाम टाळ्यासाठी तुम्ही काही घरगुती उपचार नक्कीच करू शकता.
उन्हाळी लागणे लक्षणे – Unhali Symptoms In Marathi
उन्हाळी लागणं म्हणजे काय हे समजण्यासाठी तुम्हाला ही काही उन्हाळी लागणे लक्षणे माहीत असायला हवीत. ज्यामुळे त्वरीत योग्य उपचार करता येतात.
- लघवी करताना प्रचंड दाह आणि वेदना जाणवणे
- इनफेक्शन असल्यामुळे उन्हाळी झाल्यास पुरूषांच्या पेनिस आणि महिलांना व्हजायनामधून चिकट दुर्गंधीयुक्त स्त्राव बाहेर पडण्याची शक्यता असते
- जांघेत वेदना जाणवतात आणि अंग दुखू लागते, बऱ्याचदा पाठ आणि कंबरेत वेदना जाणवतात.
- उन्हाळी लागल्यास लघवीचा रंग बदलून गडद होतो आणि दुर्गंधीयुक्त फेसाळणारी लघवी होते.
- वारंवार लघवीला येणे मात्र लघवी करताना काही थेंब बाहेर पडणे आणि खूप वेदना होणे. यासाठी लघवीच्या जागी खाज येणे घरगुती उपाय | Vaginal Itching Home Remedies In Marathi तुम्हाला माहीत असायला हवेत.
- ताप येणं, उलटी होणं, बद्धकोष्ठता ही या समस्येची आणखी काही लक्षणे असू शकतात.
- सेक्स करताना असह्य वेदना जाणवणे.
उन्हाळी लागणे घरगुती उपाय – Unhali Lagne Upay Marathi
उन्हाळी लागल्यास डॉक्टर तुम्हाला अँटी बायोटिक्सचा डोस देतात. पण असे अनेक घरगुती उपाय (Unhali Lagne Upay) आहेत ज्यामुळे तुमचा त्रास कमी होऊ शकतो.
भरपूर पाणी पिणे हा उत्तम उन्हाळी लागण्यावर उपाय आहे
भरपूर पाणी प्यायलं तर त्या पाण्यावाटे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. साहजिकच उन्हाळी थांबवण्याचा हा एक सोपा उपाय आहे. यासाठीच जर उन्हाळी सुरू असेल अशा वेळी तुम्ही हायड्रेट राहणं गरजेचं ठरतं. माणसाने हायड्रेट राहण्यासाठी दिवसभरात कमीत कमी दोन ते तीन लीटर पाणी प्यायला हवं. कारण त्यामुळे शरीरातील सर्व क्रिया सुरळीत पणे सुरू राहतात. आपल्या शरीराला सर्व कार्य व्यवस्थित करण्यासाठी पुरेशा पाण्याची गरज असते. पण जर तुम्ही पाणी कमी प्यायला तर तुमचं शरीर डिहायड्रेट होतं आणि शरीरातील टॉक्सिन्स वाढू लागतात. असं झालं तर उन्हाळीचा अधिकच त्रास जाणवू शकतो. यासोबतच वाचा दररोज गरम पाणी पिण्याचे फायदे (Warm Water Benefits In Marathi)
प्रो बायोटिक्स घेणे – उन्हाळी लागण्यावर उपाय
उन्हाळी लागणं म्हणजे मूत्रमार्गात इनफेक्शन होणं. आपल्या शरीराला अशा जीवजंतूना नष्ट करण्यासाठी हेल्दी बॅक्टेरियाची गरज असते. कधी कधी उन्हाळी लागणं हे तुम्ही घेतलेल्या उष्ण औषधांचा दुष्परिणामही असू शकतो. त्यामुळे अशा वेळी युरिनरी इनफेक्शन बरे करण्यासाठी तुम्ही योग्य प्रमाणात दही खायला हवं. कारण दह्यातून तुमच्या शरीराला पुरेसे प्रोबायोटिक्स मिळतात. आंबवलेले पदार्थ जसे की इडली, डोसा, आंबोळी, ढोकळा यातूनही तुम्हाला प्रोबायोटिक्स मिळतात.
लवंग तेलाचा वापर उन्हाळी लागण्यावर उपाय केला जातो
पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी अथवा पोटाचे आरोग्य राखण्यासाठी केला जाणारा हा एक जुना घरगुती उपाय आहे. कारण लवंग तेलामुळे तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढते. शिवाय लवंग अॅंटि इनफ्लैमटरी आणि अॅंटि मायक्रोबायल देखील आहे. ज्यामुळे तुमच्या मूत्रमार्गातील इनफेक्शन पटकन बरे होते.यासाठी वाचा लवंग तेलाचे फायदे मराठीतून (Lavang Oil Benefits in Marathi). मात्र लक्षात ठेवा की, जास्त प्रमाणात लवंग तेल पोटातून घेऊ नका. कारण आठवड्यातून एका पेक्षा जास्त वेळा लवंगतेल पोटात घेतल्यास इतर दुष्परिणाम जाणवू शकतात.
व्हिटॅमिन सी युक्त आहार घेणे – उन्हाळी लागणे उपाय
शारीरिक आरोग्य राखण्याचा सोपा मार्ग म्हणजे नेहमी संतुलित आहार घेणे. कारण तुमच्या आहारातून तुमच्या अनेक शारीरिक समस्या कमी होऊ शकतात. जर तुम्हाला उन्हाळीचा त्रास सुरू असेल तर अशा वेळी तुम्ही व्हिटॅमिन सी युक्त आहार घ्यायला हवा.कारण यामुळे तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि सर्व समस्या दूर होतात. उन्हाळी लागल्यास तुम्ही संत्री, पपई, पेरू, आंबा, किवी, स्टॉबेरी अशी फळं खायला हवी.
वेलची चघळा
वेलची शरीरासाठी फायदेशीर आणि पचनासाठी उत्तम असते. वेलचीमुळे तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते. वेलची खाण्यामुळे तुम्हाला लघवी योग्य प्रमाणात होते. ज्यामुळे तुमच्या शरीरातून सर्व टॉक्सिन्स बाहेर टाकली जातात. वेलचीमुळे बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते. यासाठी वेलची तोंडात ठेवून चघळा अथवा दूधात वेलची पावडर मिसळून ते प्या ज्यामुळे उन्हाळीचा त्रास कमी होईल.
उन्हाळी लागणे औषधोपचार (Unhali Lagne Medicine)
घरगुती उपचार करून जर आराम मिळाला नाही तर तुम्हाला यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो. अशा वेळी तुम्हाला काही उपचार देण्यात येतात.
- उन्हाळी लागल्यास जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता. सर्वात आधी डॉक्टर तुम्हाला अॅंटि बायोटिक्सचे (Unhali Lagne Medicine) काही डोस देतात. ज्या कारणामुळे तुम्हाला उन्हाळी लागली आहेत त्यानुसार तुम्हाला औषधे दिली जातात.
- औषधांसोबतच प्रायव्हेट पार्टवर होणारी जळजळ आणि वेदना कमी करण्यासाठी काही मलम आमि इतर औषधे दिली जातात. ज्यामुळे त्या भागावर काही काळासाठी थंडावा जाणवतो.
- यासोबतच जर एखाद्याला ताप, उलटी असा त्रास होत असेल तर त्यानुसार त्यावर योग्य ते उपचार करावे लागतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीवर उन्हाळी लागणं कमी करण्यासाठी समान उपचार करता येत नाहीत.
FAQ’s – उन्हाळी लागणे आणि काही निवडक प्रश्न
प्रश्न – घरगुती उपाय करून उन्हाळी लागणे बरं होतं का ?
उत्तर – उन्हाळी लागण्याची कारणं अनेक असतात. त्यानुसार तुम्हाला उपचार करावे लागतात. जर तुम्हाला युरिनरी ट्रॅकमध्ये झालेले इनफेक्शन कमी प्रमाणात असेल तर काही घरगुती उपचारांनी लगेच आराम मिळतो. मात्र जास्त प्रमाणात असेल तर डॉक्टरांचा सल्ला आणि वैद्यकीय मदतीची गरज असू शकते.
प्रश्न –लघवीची जळजळ पटकन बरी करण्याचा सोपा उपाय कोणता ?
उत्तर – लघवीची जळजळ पटकन कमी करण्याचा सोपा मार्ग म्हणजे भरपूर पाणी पिणे, कारण पाण्यावाटे तुमच्या शरीरातील सर्व विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. ज्यामुळे उन्हाळीचा त्रास कमी होतो.
प्रश्न – लिंबू पाणीमुळे लघवीचा दाह होतो का ?
उत्तर – लिंबामध्ये जास्त प्रमाणात सायट्रिक अॅसिड असते. ज्यामुळे तुमचा उन्हाळीचा त्रास वाढून लघवीचा दाह अधिक वाढू शकतो.
Conclusion – उन्हाळी लागणे उपाय
उन्हाळी लागणे म्हणजे काय हे तुम्हाला आम्ही शेअर केलेल्या माहितीवरून समजलेच असेल, तेव्हा जर तुम्हाला अशी काही लक्षणे जाणवली तर त्यानुसार योग्य औषधोपचार करा आणि निरोगी राहा.