ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
उर्मिला मातोंडकरचा कमबॅक, बारा वर्षांनंतर करणार चित्रपटात काम

उर्मिला मातोंडकरचा कमबॅक, बारा वर्षांनंतर करणार चित्रपटात काम

रंगीला फेम उर्मिला मातोंडकरचे चाहते अनेक आहेत. 2019 मध्ये उर्मिलाने राजकारणात पाय ठेवला आणि सर्वांना आश्चर्यचकितच केलं होतं. तिचा राजकारणातील वावर पाहून आता ती पुन्हा अभिनयाकडे वळणार नाही असंच सर्वांना वाटत होतं. मात्र राजकारणात सक्रिय झालेल्या उर्मिलाने तिच्या चाहत्यांना पुन्हा एकदा सुखद धक्का देण्याचं ठरवलं आहे. होय, ती परत येतेय. उर्मिला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. जवळजवळ बारा वर्षांनी ती पु्न्हा बॉलीवूडमध्ये कमबॅक करत आहे. बॉलीवूडमध्ये कमबॅकसोबत ती डिजिटल माध्यमातही तिचं नशीब आजमवणार आहे. कारण ती लवकरच एका बॉलीवूड चित्रपट आणि वेबसिरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

उर्मिला परत येतेय

उर्मिला मातोंडकरने तिच्या उमेदीच्या काळात बॉलीवूडला एका पेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. रंगीला, जुदाई, चमत्कार, सत्या, जानम समजा करो, प्यार तूने क्या किया, भूत, पिंजर अशा अनेक चित्रपटासाठी तिच्या अभिनयाचं  खास कौतुकही झालं होतं. 2018 साली इरफान खानसोबत ब्लॅकमेल या चित्रपटातील एका गाण्यात ती शेवटची दिसली होती. यात तिने एक आयटम डान्स ‘बेवफा ब्युटी’ केला होता.पण ते काम फक्त एका गाण्यापुरतंच मर्यादित होतं. गेल्या बारा वर्षात तिने कोणत्याच चित्रपटात मुख्य भूमिका साकारली नव्हती. 2008 साली तिने ‘ईएमआय’ या चित्रपटात शेवटचं काम केलं होतं. 2019 साली तिने अचानक राजकारणात प्रवेश केला. त्यातही दोन पक्षात एकापाठोपाठ पदार्पण केलं ज्यामुळे तिचा राजकारणातील दबदबा चांगलाच वाढला. तिचं राजकारणात असं सहज वावरणं पाहून ती पुन्हा अभिनयाकडे वळेल असं वाटत नव्हतं. मात्र तिने पुन्हा एकदा चाहत्यांना तिच्या अभिनयाचा जलवा दाखवण्याचं ठरवलं आहे. विशेष म्हणजे तिने स्वतः ही गोष्ट स्वतः चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

उर्मिला कोणत्या चित्रपटातून करणार कमबॅक

उर्मिलाने खरंतर मागच्या वर्षी एक वेबसिरिज साईन केली होती. कारण तिला बॉलीवूड नाही तर डिजिटल माध्यमात पदार्पण करत अभिनयात कमबॅक करायचा होता. मात्र कोरोना व्हायरसमुळे ही वेबसिरिज अडकून पडली. जर कोरोना महामारी आली नसती तर ही वेबसिरिज एव्हाना प्रदर्शितही झाली असती. आता तिचं हे प्रोजेक्ट काही विशेष परवानगीसाठी अडकून पडलं आहे. त्यामुळे उर्मिला देखील या वेबसिरिजचं शूटिंग कधी सुरू होणार याच प्रतिक्षेत आहे. वेबसिरिज सुरू होईल तेव्हा होईल पण त्याआधी तिने एक बॉलीवूड चित्रपटही साईन केला आहे. त्यामुळे उर्मिला लवकरच सर्वांना मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.  तिच्या मते हा चित्रपट नेहमीपेक्षा वेगळा असणार आहे आणि ती यातून काहीतरी खास प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. उर्मिला म्हणतेय की ती फक्त आता स्वतःसाठी नाही तर प्रेक्षकांनाही आवडेल अशा प्रोजेक्टमध्ये काम करणार आहे.त्यामुळे लवकरच हा चित्रपट कोणता ते ती सर्वांसमोर जाहीर करणार आहे. माध्यम कोणतंही असलं तरी त्यातून उर्मिलाचा खास अभिनय आणि अदा पाहायला मिळतील यातंच तिच्या  चाहत्यांना समाधान आहे. 

फोटोसौजन्य – इन्साग्राम

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

खुर्चीसाठी राजकारणात होणारे डावपेच लवकरच ‘खुर्ची’ या सिनेमातून प्रेक्षकांसमोर

माधुरी दीक्षितचा डिजिटल डेब्यू, अनामिकाचा घेणार शोध

बॉलीवूड अभिनेत्री ज्यांनी निर्मितीच्या क्षेत्रातही घेतली उत्तुंग भरारी

ADVERTISEMENT
09 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT