ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
Urvashi Rautela Stuns In Pure Silk Kanjeevaram Saree in Marathi

कांजीवरम साडीतील उर्वशी रौतेलाच्या दिलखेचक अदा, नववधूसाठी बेस्ट आहे लुक

साडी हा प्रत्येक स्त्रीचा अगदी जीवाभावाचा विषय आहे. साडीत कोणतीही स्त्री नेहमीपेक्षा जास्त सुंदर दिसते असं म्हणतात. सर्व सामान्य स्त्री असो वा एखादी सेलिब्रेटी प्रत्येकीला साडीची भुरळ पडतेच. म्हणूनच बऱ्याचदा अभिनेत्री साडीतील लुक करणं जास्त पसंत करतात. अभिनेत्री अथवा मॉडेल्सने केलेले लुक व्हायरल झाले की ते बऱ्याचदा सणसमारंभ, लग्नकार्यात रिक्रिएट केले जातात. अभिनेत्री उर्वशी रौतेलाचाही असाच एक लुक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पिवळ्या कांजीवरम साडीतील उर्वशी रौतेलाचे सौंदर्य चाहत्यांना अक्षरशः घायाळ करत आहे. तुम्ही तुमच्या लग्नासाठी एखादा ब्रायडल लुक शोधत असाल तर हा लुक तुम्हाला नक्कीच आवडेल. हा लुक तुम्हाला आवडला तर त्यासोबत शेअर करा हे अस्सल मराठमोळे साडी कोट्स (Saree Quotes In Marathi)

उर्वशीच्या कांजीवरममधील दिलखेचक अदा

उर्वशी रौतेला सतत लाइमलाईटमध्ये असते ती तिच्या ग्लॅमरस आणि स्टायलिश लुकमुळे…उर्वशीने चित्रपटात आजवर फार जास्त काम केलं नसलं तरी ती जगभरात एक टॉप मॉडेल म्हणून ओळखली जाते. तिची स्टाईल आणि फॅशन कॅरी करणारा एक खास चाहता वर्ग आहे. चाहत्यांना तिचा प्रत्येक लुक नेहमीच खास वाटतो. आता तर तिच्या या ब्रायडल लुकने चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं आहे. पिवळ्या रंगाची पारंपरिक कांजीवरम साडी, डोक्यावर मांग टिका, कपाळावर टिकली, गजरा, कंबरपट्टा आणि ट्रे़डिशनल ज्वेलरी अशा खास साऊथ इंडियन लुकने तिने चाहत्यांना घायाळ केलं आहे. विशेष म्हणजे उर्वशीने या लुकसाठी नॅचरल मेकअप आणि ग्लॉसी लिपस्टिकचा वापर केला आहे. केसांचा बन बांधून त्यावर गजरा लावत हा लुक कंम्लीट केला आहे. हा लुक एखादी नववधू तिच्या लग्नात नक्कीच रिक्रिएट करू शकते. सोबतच जाणून घ्या नवरीला साडी कशी नेसवावी (How to Drape Saree to Bride), Indian Saree Name List In Marathi | भारतातील विविध साड्यांचे प्रकार, लग्नसराईसाठी साड्यांचे प्रकार (Marathi Wedding Sarees Shalu)खणाच्या साड्या आणि बरंच काही खास तुमच्यासाठी (Khanachi Saree Look In Marathi)

उर्वशीचे आगामी प्रोजेक्ट

उर्वशीने 2015 मध्ये मिस दिवा आणि मिस युनिव्हर्स या स्पर्धा जिंकल्या आणि मॉडेलिंग करिअरमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने अनेक हिंदी, कन्नड आणि बंगाली चित्रपटांमधून स्वतःच्या सौंदर्य आणि अभिनयाची झलक दाखवली. ग्रेट ग्रॅंड मस्ती, काबिल, हेट स्टोरी, पागलपंती, वर्जिन भानुप्रिया अशा चित्रपटांमधून तिने स्वतःची ओळख निर्माण केली. चित्रपटांपेक्षा तिला मॉडेलिंग करिअरमध्ये जास्त यश मिळालं. सोशल मिडियावर तिचे अनेक फॉलोव्हर्स आहेत. लवकरच उर्वशी ब्लॅक रोझ चित्रपटातून उर्वशी तमिळ चित्रपटांमध्ये पदार्पण करत आहे. याशिवाय इनस्पेक्टर अविनाश या वेबसिरिजमध्येही ती झळकणार आहे. ज्यात तिच्यासोबत रणदीप हु्ड्डा मुख्य भूमिकेत असेल. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
22 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT