ADVERTISEMENT
home / आरोग्य
प्रत्येकीला माहीत असायलाच हव्या या व्हजानयल स्वच्छतेबाबत महत्त्वाच्या टिप्स

प्रत्येकीला माहीत असायलाच हव्या या व्हजानयल स्वच्छतेबाबत महत्त्वाच्या टिप्स

मासिक पाळीप्रमाणेच व्हजायना अथवा योनीबाबत सर्वांसमोर बोलण्याचा आजही अनेकांना संकोच वाटतो. समाजात महिलांनी अशा गोष्टी सार्वजनिक ठिकाणी  बोलणं चांगलं समजलं जात नाही. त्यामुळे महिला त्यांच्या अनेक समस्या गुप्त ठेवतात. एवढंच नाही तर अनेकींना व्हजायनल स्वच्छतेबाबत माहीत देखील नसतं. वास्तविक योनी अथवा व्हजायना हा प्रत्येक स्त्री मध्ये असलेला एक अवयव आहे. जो शरीरातील इतर अवयवांप्रमाणेच अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे लहानपणापासूनच मुलींना व्हजायना कशी स्वच्छ ठेवावी याबाबत प्रशिक्षण घरातूनच मिळायला हवं. कारण जर व्हजायना स्वच्छ ठेवली नाही तर अनेक आजार आणि आरोग्य समस्यांना महिलांना तोंड द्यावं लागू शकतं. यासाठी जाणून घ्या व्हजायनल स्वच्छतेबाबत काही खास गोष्टी…

व्हजानल स्वच्छतेबाबत या गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्या

यासाठी प्रत्येकीला शारीरिक स्वच्छतेप्रमाणेच व्हजायना कशी स्वच्छ ठेवायची हे माहीत असायला हवं.

व्हजायना स्वच्छ ठेवण्याची योग्य पद्धत

अंघोळ करताना, सौचाला गेल्यावर, मासिक पाळीच्या काळात व्हजायना योग्य पद्धतीने स्वच्छ करायला हवी. बऱ्याच जणींना व्हजायना कशी स्वच्छ करावी हे माहीत नसतं. योनी मार्ग स्वच्छ करण्याची सोपी पद्धत म्हणजे पुढून मागच्या दिशेने ती धुवून आणि पुसून स्वच्छ करावी. योनीमार्गाच्या जवळच गुद्दवार असते. म्हणून ती स्वच्छ करताना नेहमी योनीमार्गाकडून गुद्दवाराकडे स्वच्छ करावे. गुद्दवार म्हणजे सौचाची जागा. या मार्गातून पोटातील मळ बाहेर येत असल्यामुळे त्या दिशेने योनीमार्गाकडे स्वच्छता केली तर इनफेक्शन होण्याची शक्यता दाट असते. यासाठी आधी योनी मार्ग स्वच्छ करावा मग गुद्दवार स्वच्छ करावे. यासोबतच वाचा जाणून घ्या योनीच्या बाबतीतील महत्त्वाची माहिती | Yoni Information In Marathi

व्हजायनल स्वच्छतेसाठी साबण कधीच वापरू नका 

अंघोळीसाठी वापरला जाणारा साधारण साबण तुम्ही थेट व्हजायना स्वच्छ करण्यासाठी वापरू शकत नाही. कारण त्यामध्ये असलेले हार्श केमिकल्स तुमचा योनीमार्ग अधिक कोरडा करतात. साबणामधील सुंगध आणि इतर घटकांमुळे योनीमार्गातील चांगले बॅक्टरिया नष्ट होतात जे योनी मार्गाचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी गरजेचे असतात. व्हजायनल भागातील पीएच बॅलन्स टिकून राहण्यासाठी तुम्ही योग्य अशा इंटिमेट वॉशचा वापर करू शकता. कोमट पाणी अथवा खास योनी मार्गाच्या स्वच्छतेसाठी तयार केलेले इंटिमेट वॉश योनी मार्गाच्या स्वच्छतेसाठी योग्य असतात. यासाठी आम्ही तुम्हाला सूचवत आहोत… सिरोना नॅचरल इंटिमेट वॉश. जे 100% नैसर्गिक घटकांपासून तयार करण्यात आलेले आहे. या इंटिमेट वॉशने तुम्ही दिवसातून एकदा अथवा दोनदा तुमचा योनीमार्ग स्वच्छ करू शकता. इंटिमेट वॉश वापरण्याआधी तुमचा योनी मार्ग स्वच्छ पाण्याने धुवा. त्यानंतर इंटिमेट वॉश तुमच्या हातावर पंप करा आणि तुमच्या तळहाताने ते तुमच्या योनीमार्गावर लावा. नंतर कोमट पाण्याने योनीमार्ग स्वच्छ धुवा. योनीमार्गाच्या स्वच्छतेसोबत जाणून घ्या लघवीच्या जागी खाज येणे घरगुती उपाय | Vaginal Itching Home Remedies In Marathi

ADVERTISEMENT

व्हजानयल इनफेक्शनकडे दुर्लक्ष करू नका

महिलांना व्हजायना कशी स्वच्छ करावी हे माहीत नसल्यामुळे बऱ्याचजा इनफेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. शिवाय भारतात महिलांसाठी स्वच्छतागृहे नसतात, शिवाय अनेक ठिकाणी स्वच्छतागृहे घाणेरड्या स्थितीत असतात. अशा स्वच्छतागृहांचा वापर केल्यामुळेही योनीमार्गात इनफेक्शन होण्याचा धोका असतो. जर प्रत्येकीला व्हजानल इनफेक्शनबाबत योग्य माहिती असेल तर त्यावर वेळीच उपचार करणं सोपं जातं. जर योगीमार्गातून जास्त पिवळसर, चिकट स्त्राव येत असेल, सतत खाज येत असेल अथवा घाणेरडा वास येत असेल तर त्वरीत याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

अंडर गारमेंट ठेवा स्वच्छ आणि कोरडे

प्रत्येकवेळी लघवीला अथवा सौचाला गेल्यानंतर व्हजायना स्वच्छ तर करावीच पण ती कोरडीदेखील करावी. कारण असं केलं नाही तर तुमचे अंडर गारमेंट ओले होतात. ज्यामुळे व्हजायनल इनफेक्शन होण्याची शक्यता वाढते. यासाठीच लघवीला अथवा सौचाला गेल्यानंतर स्वच्छ आणि मऊ कापडाने अथवा टॉयलेट पेपरने तो भाग पुसून काढा. मात्र लक्षात ठेवा टॉयलेट पेपरचा अती वापर करू नका कारण योनीमार्ग फार कोरडा झाला तरी इनफेक्शन होण्याची शक्यता वाढते. कारण व्हजायना निरोगी राहण्यासाठी व्हजायनल स्त्रावाची गरज असते.

योगीमार्गावर घरगुती उपचार करणे टाळा

महिलांना बऱ्याचदा योनीमार्गाच्या इनफेक्शन अथवा इतर समस्यांबद्दल डॉक्टरांशी बोलण्याचा संकोच वाटतो. त्यामुळे योनीमार्गाला खाज येत असेल अथवा इनफेक्शन असेल तर त्या स्वतःच काहीतरी घरगुती उपचार करतात. मात्र लक्षात ठेवा तुमच्या योनीमार्गात नेमकी कोणती समस्या आहे हे समजूनच उपचार करायला हवेत. त्यामुळे घरगुती उपचारांनी आराम मिळाला नाही तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मासिक पाळीत दर चार तासांनी सॅनिटरी पॅड बदला

मासिक पाळीच्या काळात स्वच्छता राखणं खूप गरजेचं असतं. कारण जर या काळात स्वच्छता राखली नाही तर त्याचा थेट परिणाम तुमच्या व्हजायनावर होतो. यासाठी तज्ञ्ज सांगतात की दर चार तासांनी पॅड बदलणं गरजेचं आहे. जर तुम्ही टॅम्पॉन वापरत असाल तर दर सहा तासांनी ते बदलणं गरजेचं आहे. आजकाल मासिक पाळी सुखकर व्हावी यासाठी खास मॅन्स्ट्रुअल कप विकत मिळतात. जर तुम्ही मॅन्स्ट्रुअल कप वापरत असाल तर प्रत्येकवेळी ते योग्य पद्धतीने स्वच्छ करणं आणि योनीमार्गाची स्वच्छता राखणं खूप गरजेचं आहे.मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी सिरोनाचे मेन्स्ट्रुअल कप खूपच चांगले आहेत. कारण यामुळे तुम्ही नेहमीच्या मासिक पाळीच्या दिवसांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह आणि फ्रेश राहता. शिवाय यामुळे तुम्हाला तुमच्या योनीमार्गाची स्वच्छता राखणं जास्त सुलभ होतं. 

ADVERTISEMENT

सेक्सनंतर नेहमी व्हजायना स्वच्छ करा

सेक्स केल्यावर प्रत्येकवेळी व्हजायना स्वच्छ करण्याची सवय तुम्ही स्वतःला लावायला हवी. कारण स्पर्म आणि कंडोमचा योनीमार्गाला स्पर्श झाल्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू लागते. जर तुम्ही सेक्सनंतर व्हजायना स्वच्छ केली नाही तर इनफेक्शनचा धोका वाढण्याची शक्यता असते. यासाठी तुमच्या पार्टनरला माहीत असायला हव्या व्हजायनाबाबतच्या ’11’ गोष्टी

आम्ही सांगितलेल्या या व्हजायनल हायजिन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि तुम्ही आम्ही सूचवलेले प्रॉडक्ट वापरले का हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

14 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT