सकाळी घाई गडबडीत केस धुण्यापेक्षा काहींना रात्रीच केस धुण्याची सवय असते. सकाळी उठून केस धुणे, केस वाळवणे आणि त्यानंतर सगळी तयारी करुन कामासाठी बाहेर पडणे हे सगळेच डोक्याला ताप होऊन बसते. म्हणूनच अनेक जण रात्रीच केस धुवून झोपतात. पण वेळ वाचवण्यासाठी तुम्ही जर असे करत असाल तर मग तुमच्या केसांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तुम्ही असे करत असाल तर तुमच्या सुंदर केसांना काय धोका पोहचू शकतो ते तुम्हाला माहीत आहे का? मग तुम्हाला हे माहीत असायला हवं.
केसांच्या उत्तम वाढीसाठी घरच्या घरी तयार करा ‘गव्हांकुर’
कोंडा
shutterstock
जर तुम्ही रात्री केस धूत असाल तर तुम्हाला सगळ्यात आधी जो त्रास होईल तो म्हणजे कोंड्याचा. कारण केस धुतल्यानंतर ते वाळवणं देखील तितकचं महत्वाचं असतं. जर तुम्ही तुमचे केस वाळवत नसाल तर तुमच्या स्काल्प अधिक कोरडी होण्याची शक्यता असते. कोरड्या स्काल्पलाच आपण कोंडा असा म्हणतो. जर तुम्ही असे करणे थांबवले नाही तर हा त्रास जास्त होऊ शकतो. त्यातच जर तुम्हाला अनुवंशिक कोंडा असेल तर तुम्ही रात्री केस धुणे बंद करायला हवे.
फंगस रिअॅक्शन
केस ओले राहिले तर तुम्हाला आणखी एक त्रास होऊ शकतो तो म्हणजे फंगस रिअॅक्शनचा. ओलावा कुठेही राहिला तर त्या ठिकाणी बुरशी येऊ शकते आणि बुरशीमुळे एखादी गोष्ट खराब झालेली तुम्ही पाहिली असेलच. केसांच्या बाबतीतही अगदी तसेच आहे. याचे कारण असे की, काहींना केस धुवून तसेच झोपायची सवय असते. जर तुमच्या केसात अगदी जराही ओलावा राहिला तरी देखील तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुमच्या स्काल्पवर ओलाव्यामुळे बुरशी येऊ शकते. तुमच्या केसांसाठी आवश्यक असलेली छिद्र बंद होतात. त्यामुळे केसांच्या अन्य समस्या वाढू शकतात.
केसगळती
shutterstock
ओल्या केसांमध्ये कंगवा फिरवणे चांगले नाहीच. पण तुम्ही तुमच्या ओल्या केसात झोपून गेलात तर तुमच्या केसांचा 100% गुंता होतो. गुंता झालेले केस विंचरणे तर त्याहून अधिक कठीण असते. जर तुम्ही ओले केस विंचरुन किंवा गुंता झालेले केस विंचरण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला केसगळतीचा त्रास हा हमखास होऊ शकतो. काही जण केसांना टॉवेल बांधून झोपल्यामुळेही असा त्रास होऊ शकतो. तुमच्या केस नाजूक होतात आणि त्यामुळे तुमचे कसे गळू शकतात.
डोकेदुखी
काहींना ओलावा अजिबात सहन होत नाही. डोकं जरा जर ओलं राहिलं तरी त्यांना डोकेदुखीचा त्रास होतो. जर तुम्हालाही डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही रात्रीच्यावेळी केस अजिबात धुवायला नको.
केस पांढरे झालेत तर ट्राय करा 6 घरगुती उपाय
रात्री केस धुताना लक्षात ठेवा ही गोष्ट
- जर तुम्ही रात्री केस धुत असाल तर ते कोरडे करा.
- जर तुमच्याकडे ड्रायर असेल तर तुम्ही तुमचे केस कोरडे करुन घ्या.
- रात्री केस धुणे अगदीच अपरिहार्य असेल तर तुम्ही ते संध्याकाळीच धुवा जेणे करुन ते ओले राहणार नाही.
- केस पटकन वाळवण्यासाठी ते झटकू नका.
- केस वाळल्यानंतर त्यांना सीरम लावून मगच केस विंचरा.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.