ADVERTISEMENT
home / आरोग्य
weight will be reduced even while sleeping at night just follow these tips

रात्री झोपेतही होईल वजन कमी, फक्त झोपण्यापूर्वी करा या टिप्स फॉलो

वाढणारे वजन ही आजकाल अनेकांची डोकेदुखी ठरत आहे. कोरोनाच्या काळात तर सतत घरी राहून, वर्क फ्रॉम होममुळे, बैठ्या जीवनशैलीमुळे वजन वाढण्याचे प्रमाण जास्त झाले आहे. ज्यामुळे सर्व जण सध्या फक्त  वजन कसे कमी करता येईल याचाच विचार करताना दिसतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही अनेक उपाय करता पण त्यामुळे तुमचे वजन कमी होतेच असं नाही. कारण प्रत्येकाच्या शरीराची ठेवण आणि जीवनशैली निरनिराळी असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्हाला सूट होईल असाच उपाय करायला हवा. थोडक्यात निराश न होता वजन कमी करण्याचा प्रयत्न करणं हेच आपल्या हातात आहे. तुम्हाला कदाचित ऐकून आश्चर्य वाटेल की, तुम्ही रात्री झोपूनही तुमचे वजन कमी करू शकता. जाणून घ्या त्यासाठी काय करायला हवं. 

शांत आणि निवांत झोप घ्या

वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमची झोप पू्र्ण करणंही तितकंच गरजेचं आहे. कारण तज्ञ्जांच्या मते शांत झोपणं हे तुमच्या संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी गरजेचं आहे. झोपल्यामुळे मेंदूला चांगला आराम मिळतो. अपुरी झोप तुमच्या वजन वाढण्याला कारणीभूत असू शकते. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर आधी शांत आणि पुरेशी झोप घ्या. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात हमखास केल्या जातात या चुका

थंड आणि अंधार असलेल्या ठिकाणी झोपा

काही संशोधनात असं आढळून आलं आहे की जे लोक जास्त तापमान आणि उजेड असलेल्या खोलीत झोपतात त्यांची झोप पूर्ण होत नाही. ज्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर आणि वजनावर होतो. यासाठी झोपताना खोली नेहमी थंड वातावरणाची आणि काळोख असलेली असावी. ज्यामुळे तुमची झोप पूर्ण होईल आणि वजन नियंत्रणात राहील. 

जेवणाची वेळ पाळा 

झोपण्यापूर्वी तुम्ही किती वेळ आधी जेवता हे देखील तुमच्या वजन वाढण्याचे एक कारण असू शकते. त्यामुळे तुमची जेवणाची वेळ जर तुम्ही नीट पाळली नाही तर झोपताना तुमचे वजन वाढू अथवा कमी होऊ शकते. वजन कमी करण्यासाठी झोपण्यापूर्वी कमीत कमी दोन तास आधी जेवा. जर तुमची जीवनशैली उशीरा जेवण्याची आणि त्यानंतर लगेच झोपण्याची असेल तर तुमचे वजन वाढण्याची दाट शक्यता आहे. शिवाय रात्रीचे जेवण खूप हलके आणि पचण्यास योग्य असेल याची काळजी घ्या. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहिल. यासोबतच जाणून घ्या तुमचे वजन अचानक कमी होऊ लागले आहे का

ADVERTISEMENT

गॅझेटचा वापर कमी करा 

शांत झोपेसाठी कमीत कमी अर्धा तास आधी मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही बंद करायला हवा. मात्र जर तुम्ही रात्री झोपेपर्यंत गॅजेटचा वापर केला तर त्यातून येणाऱ्या प्रकाश लहरी तुमच्या मेंदूवर परिणाम करतात. याचा परिणाम तुमच्या झोपेवर होतो. काही संशोधनात असं आढळलं आहे की रात्री गॅझेट वापरण्यामुळे झोप कमी आणि भुक जास्त लागते. सहाजिकच यामुळे तुमचे वजन वाढण्याची शक्यता असते. यासाठी वजन कमी करायचं आहे मग हा नियम मुळीच डावलू नका. यासोबतच त्वरित बदला बेड टीची सवय, वजनासह वाढू शकतो ताणतणाव

13 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT