सोशल मीडियावर सध्या सोलोगॅमी (Sologamy) हा विषय जोरदार चर्चेत आहे. याचं कारण गुजरातमध्ये राहणारी क्षमा बिंदु आहे. क्षमाने सोलोगॅमीचा निर्णय घेतला आणि सगळीकडे या विषयाची जोरदार चर्चा सुरू झाली. या आधी मोनोगॅमी म्हणजेच बहुविवाह आणि पोलोगॅमी म्हणजे एक विवाह याविषयी चर्चा होत असे. पण आता लोकांना सोलोगॅमी विषयी जाणून घेण्याची उत्सुकता दिसून येत आहे. परदेशात ही संकल्पना नवीन नाही मात्र भारतात मात्र अशा घटना फार नाहीत. यासाठीच जाणून घ्या सोलोगॅमी म्हणजे नेमकं काय आणि महिलांमध्ये या विषयाची ओढ का निर्माण होतेय.
सोलोगॅमी म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वतःशीच लग्न करणं. काही जण याला ऑटोगॅमी असंही म्हणतात. सोलोगॅमी करणाऱ्या लोकांचे स्वतःवर इतकं प्रेम असतं की त्यांना स्वतःशीच लग्न करावंसं वाटतं. याला सेल्फ मॅरेज म्हणजेच स्व-विवाह असंही आपण म्हणू शकतो. आजकाल जगभरातील अनेक महिलांना सोलोगॅमी करण्याबद्दल आकर्षण वाटत आहे. काही दिवसांपूर्वीच 24 वर्षांची क्षमा बिंदु हिने सोलोगॅमी करण्याचा निर्णय जाहीर केला. गुजरात मध्ये राहणारी क्षमा 11 जूनला धुमधडाक्यात स्वतःशीच लग्न करणार आहे. क्षमाच्या मते सोलोगॅमी करून ती स्वतःचं अस्तित्त्व मान्य करणार आहे. स्वतःला स्वीकारण्यासाठी तिने हा मोठा निर्णय घेतलेला आहे. क्षमा फक्त स्वतःशी लग्नच करणार नाही तर ती स्वतःसोबतच हनिमूनलाही जाणार आहे. विशेष म्हणजे क्षमाच्या पालकांचा आणि नातेवाईकांचा या निर्णयाला पूर्ण पाठिंबा आहे. नव्वदच्या दशकामध्ये लिंडा बेकर नावाच्या एका महिलेने 1993 साली असं लग्न करून सोलोगॅमीची पद्धत सुरू केली. त्यानंतर अनेक देशांमध्ये लोकांनी सोलोगॅमीचा निर्णय घेतला. सध्या भारतात क्षमामुळे या विषयाला पुन्हा उधाण आलं आहे.
लग्नसंस्था ही एक सामाजिक, सुंदर व्यवस्था असताना, महिला आजकाल सोलोगॅमी म्हणजेच स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय का घेत आहेत असा प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाला आहे. यामागे निर्दशनास आलेली ही काही महत्त्वाची कारणे
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक