ADVERTISEMENT
home / Planning
जाणून घ्या लग्नापूर्वी केल्या जाणाऱ्या तिलक /टिळा समारंभाविषयी

जाणून घ्या लग्नापूर्वी केल्या जाणाऱ्या तिलक /टिळा समारंभाविषयी

घरात लगीनघाई सुरु झाली की, वेगवेगळ्या कार्यक्रमांना सुरुवात होते. लग्न ठरवताना आणि लग्नानंतर घरात बरेच छोटेखानी समारंभ असतात. लग्नासाठी एखादे स्थळ पसंत केल्यानंतर पहिल्यांदा मुलीच्या किंवा मुलाच्या घरी जाऊन लग्नाची बोलणी केली जाते. ही बोलणी केल्यानंतर लग्न ठरवण्यासाठी किंवा लग्न ठरले हे सांगण्यासाठी एक छोटेखानी समारंभ केला जातो. तो म्हणजे तिलक समारंभ किंवा टिळा समांरभ… हा समारंभ काही लोकांमध्येच केला जातो. त्याामुळे सगळ्यांनाच याची माहिती असतेच असे नाही. लग्न ठरले हे सांगण्यासाठी केल्या जाणाऱ्या या समारंभाविषयी जाणून घेऊया अत्यंत महत्वाची अशी माहिती

लग्नाचे विधी झाल्यावर खेळा असे गेम्स, येईल धमाल

तिलक समारंभ म्हणजे नक्की काय?

तिलक समारंभ

Instagram

ADVERTISEMENT

एखादे स्थळ पाहून आल्यानंतर त्या स्थळाला तुमची पसंती असेल आणि तुम्ही हे नाते पुढे नेऊ इच्छित असाल असावेळी तिलक समारंभ केला जातो. तिलक समारंभाच्यावेळी दोन्ही कुटुंबातील जवळच्या आणि महत्वाच्या व्यक्तींना बोलावले जाते. मुलाच्या घरातील होणाऱ्या सुनेला ओवाळू तिची ओटी भरतात. घरातील महिला मुलीची ओटी भरुन हे कार्य करतात. हा छोटेखानी सोहळा दोन कुटुंबातील नाते संबंध दृढ करण्यासाठी केला जातो. अनेकदा लोकं यालाच साखरपूडा असे म्हणतात. पण हा सोहळा साखरपूडा नव्हे. साखरपुडा समारंभात एकमेकांना अंगठी घालून हे नाते आणखी पुढे नेले जाते. पण तिलक समांरभाला फक्त तिलक लावून लग्न ठरवून ठेवले असे होते.

तिलक समारंभासाठी भन्नाट आयडिया

लग्न हा एकदाच होणारा असा सोहळा आहे. यामधील प्रत्येक छोटेखानी सोहळे हे लक्षात राहण्यासारखे व्हायला हवे. तुम्हालाही तुमचा तिलक समारंभ असाच लक्षात राहणारा करायचा असेल तर तुमच्यासाठी भन्नाट आयडिया 

  • थोडासा मोठा तिलक समारंभ करायचा असेल आणि घरात न करता तुम्हाला या कार्यक्रमाचा आनंद लुटायचा असेल तर तुम्ही छोटासा हॉल घेऊन हा सोहळा करु शकता.  तेथे तुम्हाला थोडेसे डेकोरेशन करुन आणि फोटो काढून हा कार्यक्रम लक्षात राहील असा करता येऊ शकतो. 
  • घरीच तुम्हाला हा सोहळा करायचा असेल तरी देखील तुम्ही थोडेसे डेकोरेशन करुनही हा कार्यक्रम करु शकता. घरी कार्यक्रम करताना तुम्हाला स्नॅक्सपासून सगळ्या गोष्टींची तयारी करायची असते. अशी तयारी तुम्ही केली तर तुम्हाला तो मस्त एन्जॉय करता येईल. 
  • तिलक समारंभाची नववधू म्हणून तुम्ही तयारी करत असाल तर या खास दिवसाची आठवण म्हणून तुम्ही छान कपड्यांची निवड करा. साडी किंवा एखादा सुंदर ड्रेसही या सोहळ्याला छान दिसतो. जर तुम्हाला हा सोहळा अधिक चांगला करायचा असेल तर तुम्ही त्या पद्धतीनेही तयारी करु शकता. 

लग्नानंतर एकत्र कुटुंबात राहायचं आहे, मग या गोष्टी ठेवा लक्षात

हे ही असू द्या लक्षात

एखादा कार्यक्रम कशापद्धतीने साजरा करायचे हे प्रत्येकावर अवलंबून असते.  तुम्ही अगदी घरगुतीपद्धतीने कमीत कमी खर्च करुनही करु शकता. पण साधारणपणे याची तयारी करताना नारळ, ओटी, फुलं, भेटवस्तू अशा काही गोष्टींची तयारी ही आधीपासूनच करुन ठेवा म्हणजे आयत्यावेळी गोंधळ होत नाही.  शिवाय हा सोहळा फार मोठा सोहळा नसल्यामुळे फार गोंधळूनही जाऊ नका.

ADVERTISEMENT

लग्नाची पहिली पायरी असा हा छोटेखानी सोहळा आहे तो तुम्ही नक्कीच आनंदाने आणि वेगळ्या उत्साहाने साजरा करायला हवा.

लग्नात सुंदर दिसण्यासाठी सर्व नववधूंनी फॉलो कराव्यात या हेल्थ टिप्स

16 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT