ADVERTISEMENT
home / Diet
What to eat if you feel too cold in marathi

जर तुम्हाला लागत असेल जास्त थंडी, तर आहारात करा या पदार्थांचा समावेश

हिवाळ्याला छान सुरूवात झाली आहे. ज्यामुळे वातावरणातील गारवा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. हिवाळ्यात वातावरणात सतत बदल होत असतात. कधी अती थंड तर कधी सामान्य वातावरण असते. जेव्हा थंडी वाढते तेव्हा गारव्यापासून स्वतःचा बचाव करणं प्रत्येकासाठी गरजेचं असतं. काही लोकांना अशक्तपणा अथवा इतर आरोग्य समस्यांमुळे इतरांपेक्षा थंडीचा जास्त त्रास होतो. यासाठीच जाणून घ्या अशा वेळी तुमचा आहार नेमका कसा असावा. ज्यामुळे तुम्हाला थंडीचा त्रास जाणवणार नाही. 

थंडीपासून बचाव करण्यासाठी खा हे पदार्थ

काही पदार्थ उष्ण असतात. त्यामुळे असे पदार्थ आहारात जास्त घेतले तर शरीरात योग्य प्रमाणात उष्णता निर्माण होते आणि थंडीपासून तुमचा बचाव होतो.

हळद 

What to eat if you feel too cold in marathi

हळदीचा वापर नियमित आहारात करायलाच हवा. कारण हळद ही आयुर्वेदिक आणि औषधी आहे. मात्र हळद उष्ण गुणधर्माची असल्यामुळे हळदीचा आहारात वापर केल्यामुळे तुमच्या शरीरात उष्णता निर्माण होते. ज्यामुळे तुम्हाला जास्त थंडी लागत नाही. यासाठी हिवाळ्यात हळदीचे दूध पिणे नक्कीच फायद्याचे ठरेल. शिवाय हळदीमध्ये अॅंटि ऑक्सिडंटअसल्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्तीदेखील यामुळे वाढू लागते. यासाठी वाचा हळदीचे फायदे एवढंच नाही तरहळदीच्या दुधाचे फायदे वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य, करून घ्या फायदा

कांदा

कांदा उष्ण गुणधर्माचा नसून थंड गुणधर्माचा पदार्थ आहे. मात्र कांदा तुमच्या आहारात नेहमीच असायला हवा कारण त्यामध्ये अनेक पोषक घटक अशतात. ज्यामुळे तुमच्या आरोग्य समस्या दूर होतात. कांदा खाण्यामुळे तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि इनफेक्शनपासून तुमचे रक्षण होते. थंडीतील वातावरण जीवजंतूंना पोषक असते सहाजिकच हिवाळ्यात कांदा खाणे नक्कीच फायद्याचे ठरू शकते.

ADVERTISEMENT

हिरवी मिरची

What to eat if you feel too cold in marathi

हिरव्या मिरची शिवाय भारतीय स्वयंपाक पूर्ण होऊ शकत नाही. कारण खाद्यपदार्थांना तिखटपणा देण्यासाठी मिरची फोडणीत टाकली जाते. मात्र मिरचीमुळे अन्न फक्त तिखट होतं असं नाही तर मिरची तुमच्या आरोग्यासाठीदेखील उपयुक्त ठरते. मिरची मध्ये व्हिटॅमिन सी, ई, फायबर्स आणि भरपूर अॅंटि ऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे तुम्ही आजारी पडत नाही. हिवाळ्यात थोडं तिखट खाण्यामुळे थंडीपासून तुमचा बचाव होऊ शकतो.

झणझणीत ठेचा रेसिपी, खास आहेत महाराष्ट्रीयन पद्धती (Thecha Recipe In Marathi)

आलं

आल्याचा वापर आहारात करणं नेहमीच फायद्याचं ठरू शकतं. कारण आलं इम्युनिटी बूस्टर आहे. आल्यामधील गुणधर्म तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढवतात आणि तुम्हाला आजारपणापासून दूर ठेवतात. यासाठी तुम्ही हिवाळ्यात आल्याचा रस, आल्याचा चहा, काढा असे पदार्थ घेऊच शकता. शिवाय अन्नामध्ये आल्याची पेस्ट वापरू शकता. आलं कच्चं खाण्यामुळेही चांगला फायदा होतो. यासाठी आल्याचं लोणचं तुम्ही ट्राय करू शकता. सर्दी, खोकला झाल्यास यामुळे चांगला आराम मिळू शकतो.

शेंगदाणे

What to eat if you feel too cold in marathi

शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन्स असतात. प्रोटिन्स प्रमाणेच शेंगदाणे खाण्यामुळे शरीराला चांगली ऊर्जाही मिळते. शेंगदाणे उष्ण असल्यामुळे शरीराला चांगली ऊब मिळते. मात्र लक्षात ठेवा अती प्रमाणात शेंगदाणे खाऊ नका कारण त्यामुळे तुम्हाला अतीसार, पित्त असे त्रास होण्याची शक्यता असते. 

ADVERTISEMENT

पौष्टिक रेसिपी मराठीतून, चविष्ट आणि करायलाही सोप्या (Paushtik Recipes In Marathi)

16 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT