मुलींची पंचविशी उलटली असेल आणि तिचं लग्न झालं नसेल तर तिच्यासाठी एक प्रश्न ठरलेला असतो. ‘मग लग्न कधी करतेस?’मला तर या प्रश्नांनी नुसते भांडावून सोडले आहे. माझा पंचविसावा वाढदिवस मी साजराही केला नाही अगदी त्या दिवसांपासून लोकांनी हा प्रश्न विचारायचा अगदी सपाटाच लावला आहे. तुमच्या बाबतीतही असे काही होत असेल आणि तुम्हालाही या प्रश्नांची उत्तरे देण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्हाला आता एक दीर्घ श्वास घेऊन काही गोष्टींची तयारी करण्याची गरज आहे. या प्रश्नांनी नाराज होण्यापेक्षा किंवा कोणावर रागावण्यापेक्षाही या गोष्टीला सामोरे जाण्यासाठी तयार राहा. अशांना कधी कधी त्याचवेळी उत्तर दिलेली बरी असतात किंवा मनात तुमच्या तुम्हीच काही गोष्टी स्पष्ट करणे गरजेचे असते. असा प्रश्न विचारल्यानंतर साधारण काही भावना मनात येणे स्वाभाविक आहे. काहींनी त्यांचे हेच अनुभव आमच्यासोबत शेअर केले आहे.
Table of Contents
नाते दृढ करणाऱ्या या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहीत हव्यात
तू तेरा देख
माझं वय आता 29 आहे आणि अजून माझं लग्न झालेलं नाही. लग्न करायचं नाही. असं काहीही माझ्या डोक्यात नाही. लग्नाचे माझे प्रयत्न सुरु आहेत.आता नाही करायचं होतं लव्ह मॅरेज म्हणूनच राहिले. घरातल्यांच्या अपेक्षा त्यात माझ्या अपेक्षा असं सगळं शोधताना माझं वय वाढत गेलं. हे मला कळत होतं. पण कदाचित माझे योग जुळत नसावे कदाचित काय करु? पण माझ्या आईच्या काही मैत्रिणी फारच खोचक आहेत. आता त्यांच्या मुली माझ्यापेक्षा वयाने फारच लहान आहेत आत त्यांची लग्न झाली हा माझा दोष आहे का? पण नाही. पण प्रत्येकवेळी त्या आल्या की, माझ्या लग्नाचा अगदी हमखास विषय काढणार. चार मोठी मोठी वाक्यं माझ्यासमोर बोलून दाखवणार त्या क्षणी मला असं वाटत ‘तू तेरा देख ना’ माझ्या लग्नापेक्षा जरा तुम्ही तुमच्या वाढत्या वजनाकडे लक्ष दिले तर बरं होईल. कसं आहे ना आता चामडी वाढायला जागा नाही. याच्या पलीकडे जाल तर फुटालच तुम्ही…असे मनापासून सांगावेसे वाटते. माझ्या 30 व्या वाढदिवशी या काकूंनी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला फोन केला (शुभेच्छा कसल्या वयाची आठवण करुन द्यायलाच हा फोन असतो अगदी दरवर्षी) पण त्या दिवशी माझा मूड फारच छान होता.मी ठरवलचं होतं. आता जर मला कोणी लग्नाचं विचारलं तर सडेतोड उत्तर द्यायचं. याच काकूंच्या नशीबात माझं बोलणं होतं. मी कानाला रिसिव्हर लावून शुभेच्छा ऐकून घेतल्या. त्या काही बोलणार एवढ्यात मीच म्हणाले, ‘ काकू माझ्या लग्नाची चिंता करत असाल तर सोडून द्या. जरा तुम्ही तुमच्याच घरी लक्ष द्या. कसं आहे ना तुमचा मुलगा लग्न होऊनही माझ्यशी फार जवळीक करायला पाहतो. म्हणजे मी सांगते तुम्हाला कसं आहे ना नाहीतर तुम्हीच माझ्या सासूबाई व्हाल.’ मग काय मला पुन्हा कधीच हा फोन आला नाही.
कोण तुम्ही?
हल्ली जो तो उठवतो आणि मला लग्नाचं विचारतो. माझा लग्न करण्याचा अजून काही पत्ता नाही. करिअर करुन ते करण्याचा पक्का निर्णय मी घेतला आहे. पण घरचे सोडा आता ऑफिसमधीलही आता मला बोलू लागले आहेत. मी मॅनेजर पदाला कामाला आहे. मला चांगला 6 आकडी पगार आहे. पण त्याचं कौतुक सोडून लोकांना माझ्या तिशी ओलांडल्याचं दु:ख अनेकांच्या चेहऱ्यावर असतं. म्हणजे आता जर मी लग्न केलं नाही. तर या सगळ्यांना मला कायमचं पोसावं लागणार. अरे कोण तुम्ही? मला माझं खासगी आयुष्य आहे की नाही. अरे माझ्या आयुष्याची ध्येय काही वेगळी आहेत. माझ्या तोडीचा मुलगा मला सापडला नाही. माझ्या या ध्येयाला समजून घेणारा एकही मुलगा मला सध्या दिसत नाही. आता माझ्या या फार शोधण्याच्या वृत्तीत माझी तिशी उलटून गेली. पण आयुष्य जगण्यासाठी मला जे हवयं ते मी कमवून ठेवत आह. आता लग्न झालं नाहीच. पण मला माझ्या आयुष्याच्या सेकंड इनिंगमध्ये जरी चांगला नवरा मिळाला तरी मी अगदी आनंदाने लग्न करीन.त्यावेळी समदा तुम्ही जीवंत असाल तर तुम्हाला मी नक्की लग्नाला बोलवीन.
आणा चांगला नवरा शोधून
अरे यार या लग्नाच्या प्रश्नांनी मला आता कंटाळा आणला आहे. माझी एक मैत्रीण आता गरोदर आहे. तिला आता लवकरच बाळ होणार आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. पण तिच्या आनंदाच्या बातमीने इतरांनी माझा जीव नकोसा करुन ठेवला आहे. काय सांगू? म्हणे तिचं आता सगळं मार्गी लागलं पण मी अजून आहे तशीच आहे. नोकरी, करिअर घडवण्यात माझं वय निघून गेलं आहे आणि आता माझ्याकडे वाढत्या वयाशिवाय काहीच नाही म्हणे. आता जो कोणी मला माझ्या लग्नाबाबत विचारतो. त्याला मी एकच सांगते. काकू- काका अहो चांगला नवरा शोधून आणा मला. मी त्याचीच वाट पाहत आहे. चांगला नवरा मिळाला की, लगेच लग्न करुन टाकीन आणि मग काय अगदी एका वर्षाच्या आत तुम्हाला हातात आणून बाळ आणून देईल.तुम्ही सगळे माझ्या बाळाची काळजी घ्यायला समर्थ आहात. त्यामुळे लग्न झाल्या झाल्या लगेच चान्स घेईन. ही अशी स्टोरी मी सगळ्यांनाच बनवून सांगते.आतून मला इतकं हसायला येत असतं. पण मला विचारणे असे तोंड करतात की, किती निर्लज्ज मुलगी आहे ही. पण मला आता हे चालतं.
#Breakup नंतरच तुम्हाला कळते नात्याची खरी किंमत
काय म्हणता खरंचं
हा हा हा काय म्हणता माझं लग्नाचं वय झालं अरे बापरे मला तर माहीतच नव्हतं मुळी. तुम्ही सांगितलं आणि आठवण झाली बघा. लोकांचा इतरांच्या लग्नाला घेऊन हा प्रॉब्लेम का असतो ना अगदीच कळत नाही. म्हणजे एखाद्याचं लग्न नसेल होतं किंवा त्यांना समजा लग्नच करायचं नसेल. तर तुमची जबरदस्ती का? आता आमच्या वर्गातील अनेक मुलींची लग्न झाली आहेत. त्यांना छान लहान मुलं आहेत. आम्हाला पण वाटतं की, आमचे कुटुंब असावे. पण काही गोष्टी जुळून येत नाहीत. त्यामुळे लग्न होत नाही. पण समजून घेण्याइतके तुम्ही मोठे नाही. त्यामुळे आता तुम्हाला काय बोलावे असा प्रश्न पडतो.पण मी तरी आता या अशा लोकांकडे दुर्लक्ष करायचे ठरवले आहे. इतके की, ते बोलत असतील तर आपण फक्त.. अय्या खरचं की काय? इतकीच प्रतिक्रिया देण्याचे ठरवले आहे. Keep calm and relax हा मंत्र मी माझ्या लग्नाच्या प्रश्नांसाठी राखून ठेवला आहे.
sex नंतर रिलेशनशीपमध्ये होतात हे बदल
जमलं तर तुम्हीच करा ना पुन्हा लग्न
मी फारच उद्धट मुलगी आहे असे सगळेच म्हणतात आणि आता मला त्याचे काहीच वाईट वाटत नाही. मी फक्त लग्नाच्या प्रश्नांवरुन लोकांशी उलट बोलते या कारणामुळे लोकांना मी उद्धट वाटते. एकदा झालं असं की, आमच्या इथे एक साधारण 50 वर्षांची बाई आहे. ती कायम मला भेटली की, एकच प्रश्न विचारते. लग्नाचं काय मग? कोणी पाहिलं आहे की नाही. आता या बाईला मी काय सांगू असे मला होते. कोणता मुलगा माझ्यासोबत दिसायची खोटी की, या बाईने मला त्रास दिला म्हणून समजायचे. पण एकदा मी तर फारच हद्द केली. मी माझ्या एक मित्रासोबत घरी परतत असताना या सो कॉल्ड काकू मला भेटल्याच. आता सोबत माझा मित्र त्याला हे काय माहीत नाही? त्या समोरुन येतानाच मी ठरवलं की, फक्त हसून निघायचं. पण कसलं काय त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून मला थांबवलचं. मी एक दीर्घ श्वास घेऊन आता ऐकायला तयार व्हा. असे म्हणून एक सुस्कारा सोडला. तोच प्रश्न लग्न कधी करतेस? हा मुलगा पाहून ठेवला आहेस का?? आता तर माझं डोक सटकलचं… त्या काही बोलायच्या आत मी म्हणाले… काकू कदाचित तुम्हालाच लग्न करायची खूप हौस आहे वाटतं. मग दुसऱ्या लग्नाचा काही विचार केला आहे का? केला नसेल तर करा.. लहान मुलगा हवा असेल तर हा माझा मित्र आहेच. तुम्हालाही तो आवडला असेल. मग कधी करता लग्न याच्याशी. असे भडाभडा बोलले. त्यांचा चेहरा तेव्हा रागाने लालबूंद झाला होता. त्या रागानेच बघून निघून गेल्या. त्यांना मागे वळून म्हटले, पुन्हा हा टुकार प्रश्न विचाराल तर तुमच्या दुसऱ्या लग्नाची बातमी गावभर पसरवीन
हा हा हा काहींचे अनुभव फारच विचित्र आहेत नाही का? पण या प्रश्नांनी खरचं हैराण व्हायला होते. जर काकू- मावशी- आत्या तुम्ही असा प्रश्न विचारताना जरा सावधान!