निरोगी जीवनशैलीसाठी प्रत्येकाच्या आहारात योग्य पोषणमुल्यं असणं गरजेचं आहे. मात्र जेव्हा तुम्ही गरोदर असता तेव्हा पोषक आहाराची गरज सर्वात जास्त असते. कारण या काळात तुम्हाला तुमच्यासोबतच तुमच्या बाळाच्या पोषणाची तितकीच काळजी करावी लागते. योग्य आणि संतुलित आहारातून तुम्हाला आवश्यक पोषणमुल्यं मिळत असतात. बाळाच्या योग्य वाढ आणि विकासासाठी तुमच्या शरीराला मुबलक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची गरज असते. काही फळांचा आहारात समावेश केल्यामुळे तुमच्या गर्भाचे पोषण योग्य पद्धतीने होते.
सफरचंद –
असं म्हणतात की, “An apple a day keeps the doctor away” म्हणजेच जर तुमच्या आहारात सफरचंद असेल तर तुम्हाला कमीत कमी आरोग्य समस्या होऊ शकतात. याचं कारण असं की सफरचंदामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फायबर्स आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतात. एका संशोधनानुसार जर गरोदर महिलेने दररोज सफरचंद खाल्लं तर तिच्या बाळाला भविष्यात अस्थमा आणि अॅलर्जी होण्याचा धोका कमी असतो.
Shutterstock
डाळिंब –
डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स, प्रोटिन्स, साखर, व्हिटॅमिन सी, के, फोलॅट, पोटॅशियम असतात. दररोज डाळिंबाचे दाणे खाण्याने तुमच्या शरीराला काय चांगले फायदे मिळतात. एका संशोधनानुसार गरोदर महिलांनी जर डाळिंबाचा रस अथवा दाणे आहारातून घेतले तर बाळाच्या नाळेबाबत होणाऱ्या समस्या होण्याचा धोका कमी होतो.
केळं –
केळ्यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन B6, फायबर्स, कार्बोहायड्रेट आणि व्हिटॅमिन सी असतं. केळं हे एक स्वस्त आणि आरोग्यासाठी मस्त फळ आहे. दररोज केळं खाण्याचे अनेक चांगले फायदे शरीरावर होतात. जर गरोदर महिलांच्या आहारात केळ्याचा समावेश असेल तर बाळाचं पोषण योग्य प्रकारे होतं.
Shutterstock
पेरू –
पेरूमध्ये मुबलक अॅंटि ऑक्सिडंट, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, फायबर्स असे गुणधर्म असतात. ज्यामुळे गरोदर महिला आणि त्यांच्या गर्भाच्या वाढीसाठी पेरू खाणं फायदेशीर ठरतं. पेरू खाण्यामुळे अपचनाचा त्रास कमी होतो, रिलॅक्स वाटतं, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
किवी –
किवी हे आंबटगोड चवीचं फळ खायला कोणाला आवडणार नाही. शिवाय या पोषकमुल्यदेखील भरपूर असतात. यातील व्हिटॅमिन सीमुळे अँटिऑक्सिडंट भरपूर असतात. गरोदर महिलांनी किवी खाल्यामुळे त्यांचे आरोग्य समस्या आणि अॅलर्जीपासून संरक्षण होते. साधारण 100 ग्रॅम किवीमध्ये 154 टक्के इतक्या प्रमाणात विटामिन सी असतं. ज्यामुळे त्यांच्या प्रतिकारशक्तीत वाढ होते.
Shutterstock
पेअर –
पेअर खाण्यामुळे तुमचे योग्य प्रमाणात पोषण होते. कारण यात पोटॅशियम, फायबर्स, फोलेट असतं ज्यामुळे तुम्हाला गरोदरपणात अपचनाचा त्रास होत नाही. शिवाय यातील पोषक घटकांमुळे बाळाची वाढ आणि विकास होण्यास मदत होते.
सीताफळ –
सिताफळ हे अतिशय उपयुक्त असं फळ आहे. सिताफळ खाण्यासाठी जितकं स्वादिष्ट लागतं तितकंच ते तुमच्या आरोग्यासाठी उत्तम असतं. सिताफळ हे पित्तानाशक, पौष्टिक, रक्तवर्धक, वातदोष कमी करणारं असं फळ आहे.गरोदर महिलांनी सिताफळ खाल्यास त्यांच्या गर्भाची वाढ चांगली होते.
अॅवोकॅडो –
अॅवोकॅडो हे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के आणि बी, मोनोसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड. फायबर्स, पोटॅशियम आणि लोहयुक्त फळ आहे. अॅवोकॅडो खाण्यामुळे तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं. गरोदरपणी तुम्हाला दुप्पट आहाराची गरज असते. ज्यामुळे थोड्या थोड्यावेळाने काही तरी पोषक पदार्थ खाणं गरजेचं असतं. अशावेळी अॅवोकॅडो खाण्यामुळे तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो.
Shutterstock
स्टॉबेरी –
स्टॉबेरीजमध्ये व्हिटॅमिन सी, चांगले कार्बोहायड्रेड, फायबर्स असतात. शिवाय यातील अॅंटि ऑक्सिडंटमुळे तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढते. स्टॉबेरी हे रसदार फळ असल्यामुळे तुमचे शरीर डिहायड्रेट होत नाही. यासाठी गरोदरपणात स्टॉबेरीज जरूर खा.
कलिंगड –
कलिंगडामधील व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए मुळे तुमच्या शरीराला पोषक घटकह मिळतात. कलिंगडामधील फायबर्समुळे तुमच्या शरीरातील पचनसंस्था सुरळीत राहते. बऱ्याचदा गरोदरपणात अपचनाच्या समस्या जाणवू शकतात. सहाजिकच प्रेग्नंन्सी दरम्यान कलिंगड खाण्यामुळे तुम्हाला अपचनाचा त्रास कमी होऊ शकतो.
Shutterstock
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
हे ही वाचा –
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.
अधिक वाचा –
गरोदरपणात का गळतात केस, जाणून घ्या कारणं
गरोदरपणात चुकूनही खाऊ नका हे पदार्थ
जाणून घ्या गरोदरपणात बाळाची वाढ कशी होते