ADVERTISEMENT
home / Care
जाणून घ्या डोक्यावरील पांढरे केस प्लकरने तोडणं योग्य की अयोग्य 

जाणून घ्या डोक्यावरील पांढरे केस प्लकरने तोडणं योग्य की अयोग्य 

पांढरे केस हे वय वाढण्याचं लक्षण समजलं जातं. कारण पूर्वी फक्त वयस्कर माणसांचे केस पिकलेले असायचे. पण आता तरूण मुलांमुलींचेही केसही पिकलेले दिसतात. कारण आजकाल वयाच्या कोणत्याही टप्प्यावर असलेल्या व्यक्तीला स्पर्धा आणि ताणतणावाला सामोरं जावं लागतं. हा ताण आणि जीवनशैलीत झालेल्या अनेक बदलांमुळे अनेकांचे केस वयाच्या आधीच पिकतात. तरूणपणी पिकलेले केस पाहून संकोचलेली तरूण मुलं-मुली प्लकरने असे पांढरे केस तोडून टाकतात. मात्र असं करणं योग्य की अयोग्य हे अनेकांना माहीत नसतं. कारण असं म्हणतात की, पांढरे केस तोडले तर त्या आजूबाजूचे सर्वच केस पिकतात. जाणून घ्या यात आहे का तथ्य… तसंच जाणून घ्या केस पांढरे होण्याची कारणे | Reason For Greying Hair In Marathi पावसाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स (Monsoon Hair Care Tips In Marathi)

पांढरे केस तोडावेत की तोडू नयेत

म्हातारपणी वयानुसार केसांना नैसर्गिक रंग प्राप्त करणाऱ्या रंगपेशी कमी झाल्यामुळे केस पिकून पांढरे होतात. मात्र आजकाल ताणतणावामुळेही केसांच्या रंगपेशींवर दुष्परिणाम होताना दिसतो. वयस्कर लोकांचे सर्वच केस पांढरे होतात. मात्र तरूणपणांचे केस कमी प्रमाणात पिकतात. कधी कधी तर एखादा केसच पांढरा झालेला दिसून येतो. अशा वेळी तो पांढरा केस तोडू नये असं सांगण्यात येतं. पूर्वीच्या काळी असं सांगितलं जायचं की, पांढरा केस तोडला तर त्याच्या आजूबाजूचे सर्वच केस पांढरे होतात. त्यामुळे घाबरून माणसं पांढरे केस तोडत नसत, मात्र हे सत्य नाही. पांढरे केस अथवा काळे कोणतेही केस असो ते कधीच तोडून अथवा ओढून काढू नये कारण त्यामुळे तुमच्या हेअर फॉलिकल्सचे नुकसान होते. असं केल्यामुळे पुढे तुमच्या केसांची वाढ खुंटते यासाठी केस कधीच ओढून काढू नये.

केसांची कशी राखावी निगा

जर तरूणपणीच तुमचे काही केस पांढरे झाले असतील तर जास्त चिंता करू नका. कारण चिंता केल्यामुळे तुमचे केस अधिक पांढरे होतील. केस पिकण्यामागचं कारण ताणतणाव असण्याची शक्यता आहे. अशा वेळी पांढरे केस लपवण्यासाठी ते डाय करण्याचाही विचार करू नका. कारण त्यामुळे तुमच्या केसांचे अधिक नुकसान होईल. त्यापेक्षा अशा वेळी आहारात पोषकमुल्ये वाढतील,ताणतणावावर नियंत्रण ठेवता येईल, शांत झोप घेता येईल या गोष्टींकडे जास्त लक्ष द्या. कारण यामुळे तुमचे केस पांढरे होणं थांबेल आणि केसांचे आरोग्य सुधारेल. यासाठी Ayurvedic Hair Care Tips In Marathi | आयुर्वेदिक पद्धतीने घ्या केसांची काळजी

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm आले आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
09 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT
good points logo

good points text