ADVERTISEMENT
home / आरोग्य
उन्हाळा सुरू होताच थंड पाणी पिण्यास केली आहे सुरूवात, मग हे वाचाच

उन्हाळा सुरू होताच थंड पाणी पिण्यास केली आहे सुरूवात, मग हे वाचाच

उन्हाळा सुरू होताच अंगातून घामाचा धारा आणि अंगाची उन्हाने काहिली होऊ लागते. मात्र अशा वेळी उन्हाच्या त्रासापासून वाचण्यासाठी आणि थंडावा मिळण्यासाठी अनेक लोक फ्रीजचं, बर्फाचं गारेगार पाणी पितात. थंडगार पाणी पिल्यानंतर काही सेंकद बरं वाटतं. मात्र फ्रीजचं पाणी शरीरासाठी मुळीच हिताचं नसतं. यासाठी आरोग्य तज्ञ्ज या काळात साधं पाणी पिण्याचा सल्ला देतात. या काळात माठातील थंड पाणी पिणंदेखील फायदेशीर ठरतं. मात्र तरिही लोकांना फ्रीजचं थंड पाणी पिणंच जास्त आवडतं. फ्रीजचं पाणी पिणं म्हणजे आजारपणाला आमंत्रणच असतं. यासाठी जाणून घ्या थंड पाणी पिणं आरोग्यासाठी का हिताचं नाही. यासोबतच नारळपाणी पिण्याचे फायदे वाचाल तर थक्क व्हाल (Coconut Water Benefits In Marathi)

थंड पाण्यामुळे पचनशक्ती कमजोर होते

एका हेल्थ रिपोर्ट नुसान  थंड पाणी पिण्याचे अनेक दुष्परिणाम होतात. थंड पाण्यामुळे पचनशक्तीवर परिणाम होतो. जेव्हा तुम्ही थंड पाण्याने तुमचा चेहरा धुता तेव्हा तुमची त्वचा ताणली जाते. मग विचार करा जेव्हा तुम्ही थंड पाणी पित असाल तेव्हा तुमच्या नाजूक आतड्यांवर काय परिणाम होत असेल. 

बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो

आजकाल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे तुमच्या पचनशक्तीवर परिणाम होतो आणि बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो. मात्र काही संशोधनानुसार यामागे थंड पाणी पिण्याची सवयदेखील कारणीभूत असते. कारण थंड पाणी पिण्यामुळ तुमच्या आतड्यांमध्ये अन्न न पचता अडकून राहतं. ज्यामुळे बद्धकोष्ठता होते. यासाठी वाचा दररोज गरम पाणी पिण्याचे फायदे (Warm Water Benefits In Marathi)

ह्रदयाचे ठोके मंद होतात

शारीरिक कार्य सुरळीत राहण्यासाठी ह्रदयाचे कार्य सुरळीत राहणं गरजेचं आहे. मात्र जर तुम्ही वारंवार थंड पाणी पित असाल तर तुमच्या शरीरातील तापमानात बदल होतो. ज्यामुळे तुमच्या ह्रदयाचे ठोके कमी होतात.

ADVERTISEMENT

डोकेदुखी जाणवते

उन्हाळ्यात जर तुम्हाला सतत डोके दुखण्याचा त्रास होत असेल. तर यामागे तुमचं थंड पाणी पिणं कारणीभूत असू शकतं. बर्फ अथवा थंड पाणी गळ्यातून खाली जाताना त्याचा परिणाम तुमच्या डोक्यावर होतो. कारण बर्फ अथवा पाण्याचा थंडावा तुमच्या नसांवर परिणाम करतात. ज्यामुळे मेंदूला चुकीचा संदेश मिळतो आणि डोकेदुखी जाणवते. वाचा त्वरीत परिणामासाठी करा डोकेदुखी घरगुती उपाय (Dokedukhi Var Gharguti Upay)
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

05 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT